पूर्व कॅबिनेट मंत्री श्रीकांत शर्मा ला हि बातमी लिहण्यात येत पर्यंत भाजप उत्तर प्रदेश चे अध्यक्ष बनवण्यात आले नव्हते. सोशल मीडिया वरील व्हायरल बातमीचे स्वतः श्रीकांत शर्मा आणि भाजप उत्तर प्रदेश प्रवक्त्याने खंडन केले आहे.
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर एक पोस्ट व्हायरल होत आहे. ह्यात यूजर्स दावा करत आहेत कि पूर्व कॅबिनेट मंत्री श्रीकांत शर्मा ह्यांना भारतीय जनता पार्टी उत्तर प्रदेश चा अध्यक्ष बनवले गेले आहे. सोशल मीडिया वर काही यूजर्स श्रीकांत शर्मा ह्यांचे अभिनंदन करत आहे. विश्वास न्यूज ला आपल्या तपासात कळले कि हि बातमी फाईल होत पर्यंत तरी श्रीकांत शर्मा उत्तर प्रदेश चे भाजप चे प्रदेश अध्यक्ष नव्हते बनले. श्रीकांत शर्मा आणि भाजप च्या उत्तर प्रदेश प्रवक्ता ने हि अफवा असल्याचे सांगितले.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर ‘अपना जिला कुशीनगर’ ने 3 एप्रिल 2022 रोजी हि पोस्ट केली आणि लिहले:
पूर्व कैबिनेट मंत्री श्रीकांत शर्मा को भारतीय जनता पार्टी उत्तर प्रदेश का अध्यक्ष बनाया गया ।
तपास:
व्हायरल दाव्याचा तपास आम्ही सगळ्यात आधी किवर्ड सर्च पासून सुरु केला. आम्हाला 3 एप्रिल रोजी जागरण मध्ये प्रकाशित झालेल्या बातमी ची लिंक मिळाली. ह्या प्रमाणे, रविवारी अचानक सोशल मीडिया वर श्रीकांत शर्मा हे भाजप चे उत्तर प्रदेश चे अध्यक्ष बनल्याची बातमी सोशल मीडिया वर व्हायरल झाली त्यानंतर समर्थकांनी त्यांचे अभिनंदन केले. ह्या बातमीला श्रीकांत शर्मा ह्यांनी निराधार असल्याचे सांगितले. सध्या अशी कुठलीच सूचना नाही असे देखील ते म्हणाले.
आम्ही श्रीकांत शर्मा ह्यांचे ट्विटर अकाउंट तपासले, पण आम्हाला अशी कुठलिच सूचना मिळाली नाही.
ह्या बाबतीत आम्ही पूर्व कॅबिनेट मंत्री श्रीकांत शर्मा ह्यांना संपर्क केला. त्यांचे म्हणणे होते कि अशी अजून कुठलीच सूचना नाही, हे सगळं अफवा आहे. उत्तर प्रदेश भाजप चे प्रवक्ता अवनीश त्यागी ह्यांनी देखील म्हंटले कि अजून अशी कुठलीच घोषणा झाली नाही, सध्या असे काही नाही.
पोस्ट शेअर करणाऱ्या फेसबुक पेज ‘अपना जिला कुशीनगर‘ ला स्कॅन केले असता आम्हाला कळले कि 19 जनवरी 2021 हा पेज बनवण्यात आला आणि त्याला 1 लाख 92 हजार लोकं फॉलो करतात.
निष्कर्ष: पूर्व कॅबिनेट मंत्री श्रीकांत शर्मा ला हि बातमी लिहण्यात येत पर्यंत भाजप उत्तर प्रदेश चे अध्यक्ष बनवण्यात आले नव्हते. सोशल मीडिया वरील व्हायरल बातमीचे स्वतः श्रीकांत शर्मा आणि भाजप उत्तर प्रदेश प्रवक्त्याने खंडन केले आहे.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923