Fact Check: गुरुद्वारा मधील हाथ धुताना चे पीएम मोदी ह्यांचे चित्र खोट्या दाव्यासह व्हायरल

विश्वास न्यूजच्या तपासात पीएम मोदींबाबत करण्यात आलेला दावा खोटा निघाला. व्हायरल झालेला फोटो गुरूद्वाराच्या प्रवेशद्वारावर हात धुतानाचा आहे, शौचालयात नाही. चुकीचा दावा करून हे छायाचित्र व्हायरल केले जात आहे.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये ते हात धुताना दिसत आहे. आता सोशल मीडिया यूजर्स हा फोटो शेअर करत दावा करत आहेत की, पंतप्रधान मोदींचा हा फोटो टॉयलेटमध्ये काढण्यात आला आहे. अनेक यूजर्स हा दावा खरा मानून फोटो व्हायरल करत आहेत. विश्वास न्यूजने या दाव्याची सखोल चौकशी केली असता हा व्हायरल दावा खोटा असल्याचे आढळून आले. व्हायरल झालेले चित्र हे गुरुद्वाराबाहेरील वॉश बेसिनचे असून सर्वसामान्यांनी हात धुण्यासाठी चे आहे, शौचालयाचे नाही.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर सूबेसिंह राणार ने 18 ऑक्टोबर 2022 रोजी व्हायरल चित्र शेअर केले आणि लिहले, “हद है यार संडास में भी कैमेरा ,वहां पर भी कैमरा ही लेकर गये होंगे…. जशोदाबेन नाराज़ हो गई थी , पिटने वाली थी , तो भाग खड़े हुए। ”

व्हायरल पोस्ट ला खरे समजून बाकी यूजर्स देखील शेअर करत आहेत. ह्या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:

व्हायरल फोटोचे सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही गुगल रिव्हर्स इमेजद्वारे फोटो शोधला. त्यादरम्यान freepressjournal.in या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातमीत आम्हाला एक व्हायरल चित्र आढळले. 20 डिसेंबर 2020 रोजी प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, ‘व्हायरल झालेला फोटो पंतप्रधान मोदी नवी दिल्लीतील गुरुद्वारा रकाबगंज साहिब येथे पोहोचले तेव्हाचा आहे. शिखांचे गुरु तेग बहादूर यांचे ४०० वे प्रकाश पर्व च्या दिवशीचे हे छायाचित्र आहे. व्हायरल झालेला फोटो त्यावेळचा आहे. व्हायरल झालेल्या चित्रासोबत आणखी अनेक छायाचित्रे बातम्यांमध्ये पाहायला मिळतात.

शोध दरम्यान, आम्हाला हे चित्र 20 डिसेंबर 2020 रोजी शटरस्टॉकच्या वेबसाइटवर देखील सापडले. मिळालेल्या माहितीनुसार, व्हायरल झालेला फोटो नवी दिल्लीतील गुरुद्वारा रकाबगंज साहिबचा आहे.

पीएम मोदींच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून व्हायरल चित्रासारखीच छायाचित्रेही शेअर करण्यात आले होते. 20 डिसेंबर 2020 रोजी शेअर केलेली ही छायाचित्रे येथे पाहता येतील.

पुढे तपासात आम्ही रकाबगंज गुरुद्वाराचा शोध घेतला. आम्हाला या गुरुद्वाराचे असे अनेक फोटो आणि व्हिडिओ सापडले, ज्यात व्हायरल फोटोमध्ये वॉश बेसिन आणि पायऱ्यांचा भाग दिसतो.

अधिक माहितीसाठी आम्ही रकाबगंज गुरुद्वाराशी संपर्क साधला. त्यांनी आम्हाला सांगितले की टॉयलेटमध्ये कॅमेरे लावण्याची परवानगी नाही.

तपासाअंती, आम्ही चुकीच्या दाव्यासह छायाचित्र व्हायरल करणाऱ्या वापरकर्त्याची तपासणी केली. तपासात हा युजर उत्तर प्रदेशातील बरौतचा रहिवासी असल्याचे समोर आले आहे. फेसबुकवर युजरला 790 लोकं फॉलो करतात.

निष्कर्ष: विश्वास न्यूजच्या तपासात पीएम मोदींबाबत करण्यात आलेला दावा खोटा निघाला. व्हायरल झालेला फोटो गुरूद्वाराच्या प्रवेशद्वारावर हात धुतानाचा आहे, शौचालयात नाही. चुकीचा दावा करून हे छायाचित्र व्हायरल केले जात आहे.

False
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट