X
X

Fact Check: आसाम मधली पीएम मोदी यांच्या भाषणाचे व्हिडिओ भ्रामक दाव्यासह होत आहे व्हायरल

विश्वास न्यूज च्या तपासात पीएम मोदी यांच्यासोबत संबंधित व्हायरल व्हिडिओ हा क्लिप केल्याचे समजले. हा व्हिडिओ पीएम मोदी हे आसाम च्या निवडणुकांचा प्रचार करत असताना गोलाघाट जिल्ह्याच्या बोकाखाट इथे एका रॅली ला संबोधित करतानाचा आहे. पीएम मोदी हे काँग्रेस वर निशाणा साधत होते. त्यांच्या भाषणाचा अपूर्ण व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.

  • By: ameesh rai
  • Published: Mar 25, 2021 at 11:28 PM

विश्वास न्यूज (नवी दिल्ली): सोशल मीडिया वर पीएम मोदी यांचा एक व्हिडिओ शेअर करण्यात येत आहे, दावा करण्यात येत आहे कि त्यांनी म्हंटले गरिबांना फक्त स्वप्न दाखवा, खोट बोला, आपसात लढवा आणि राज्य करा. विश्वास न्यूज च्या तपासात पीएम नरेंद्र मोदी यांच्या व्हायरल व्हिडिओ क्लिप केला असल्याचे कळलं. हा व्हिडिओ पीएम मोदी यांनी आसाम विधानसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान गोलाघाट जिल्ह्यात बोकाखाट इथे एका रॅली ला  संबोधन करत असतानाच आहे. पीएम मोदी हे काँग्रेस बद्दल बोलत होते, तेव्हा त्यांच्या भाषणाचा एक अपूर्ण व्हिडिओ व्हायरल केला गेला.

काय होत आहे व्हायरल?
सोशल मीडिया च्या विविध प्लॅटफॉर्म वर पीएम मोदी यांचा व्हायरल व्हिडिओ शेअर केला जात आहे. Rishiraj Mandawat या नावाच्या ट्विटर हॅन्डल ने पीएम मोदी यांच्या अकाउंट वर एका ट्विट च्या उत्तरात हा व्हिडिओ 22 मार्च 2021 रोजी ट्विट केला. आणि त्यात लिहले, “अद्भुत्!!! प्रधानमंत्री @narendramodiजी ने अपने सफलता का रहस्य बताते हुए कैमरा में पकड़े गए।”

या ट्विट चा आर्काइव्ह व्हर्जन तुम्ही इथे बघू शकता.
हा व्हिडिओ काँग्रेस चे सोशल मीडिया डिपार्टमेंट चे चेअरमन रोहन गुप्ता यांनी देखील ट्विट केला. या ट्विट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
विश्वास न्यूज ने तपासाची सुरुवात सगळ्यात आधी व्हायरल व्हिडिओ InVID टूल मध्ये सर्च करून किफ्रेम्स शोधण्याचा प्रयत्न केला. आम्ही त्या किफ्रेम्स ला गूगल रिव्हर्स इमेज सर्च मध्ये टाकून शोधले. आम्हाला इंटरनेट वर किफ्रेम्स सोबत मिळते जुळते बरेच व्हिडिओ मिळाले. आम्हाला thefoodietime.com नावाच्या वेबसाईट वर 21 मार्च 2021 रोजी प्रकाशित एक रिपोर्ट मिळाले. ह्या रिपोर्ट मध्ये आसाम च्या बोकाखाट मध्ये झालेल्या पीएम मोदी यांच्या रॅली ला कव्हर करण्यात आले आहे. तुम्ही याला इथे बघू शकता.

ह्या रिपोर्ट मध्ये मिळालेल्या क्लू च्या आधारावर आम्ही पीएम मोदी यांच्या बोकाखाट इथल्या रॅली बद्दल इंटरनेट वर शोधले. आम्ही पीएम नरेंद्र मोदी यांचे अधिकृत युट्युब चॅनेलवर आम्हाला या रॅली सोबत संबंधित 43 मिनट 34 सेकंड इतका मोठा व्हिडिओ मिळाला. ह्या व्हिडिओ मध्ये एक मिनिट ५ सेकंड्स नंतर पीएम मोदी यांना सम्मानस्वरूप अंगवस्त्र देताना बघितले जाऊ शकते. व्हायरल व्हिडिओ मध्ये मोदी यांनी हाच गमचा घातलेला बघू शकता. पीएम मोदी हे खऱ्या व्हिडिओ मध्ये प्रचारादरम्यान काँग्रेस वर निशाणा साधताना दिसतात. व्हिडिओ मध्ये, ३५ मिनिट ४० सेकण्ड नंतर पीएम मोदी यांना हे म्हणताण ऐकले जाऊ शकते, कि “इनलोगों (कांग्रेस) को झूठे वादे करने की, झूठे घोषणापत्र बनाने की आदत पड़ गई है। गरीब को सिर्फ सपने दिखाओ। झूठ बोलो, उसे आपस में लड़ाओ और राज करो, यही कांग्रेस का हमेशा से सत्ता में रहने का फॉर्मूला रहा है।”
व्हिडिओचा हाच एक भाग व्हायरल होत आहेत. ओरिजिनल व्हिडिओ तुम्ही खाली बघू शकता.

विश्वास न्यूज च्या तपासात आतापर्यंत कळले होते कि मोदींचा हा व्हिडिओ क्लिप आहे, जो खोट्या दाव्याने व्हायरल होत आहे. आम्ही व्हायरल व्हिडिओ संबंधी गोलाघाट जिले चे भाजयुमो अध्यक्ष नंद किशोर गोस्वामी यांना संपर्क केला. त्यांनी देखील पुष्टी करून सांगितले कि नरेंद्र मोदी यांचे अपूर्ण क्लिप व्हायरल होत आहे. ओरिजिनल व्हिडिओ मध्ये मोदी हे काँग्रेस चा सत्ता मध्ये राहण्याचा फॉर्मुला आहे, ज्याला व्हायरल व्हिडिओ मधून काढण्यात आले आहे.

विश्व्स न्यूज ने हा व्हायरल व्हिडिओ ट्विट करणारे यूजर Rishiraj Mandawat यांच्या प्रोफाइल ला स्कॅन केले, त्यात कळले कि यूजर जयपूर चा रहिवासी आहे आणि त्यांचे प्रोफाइल ऑक्टोबर २०१३ मध्ये बनवले गेले आहे ज्याला ११३५ लोकं  फोल्लो करतात.

 

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात पीएम मोदी यांच्यासोबत संबंधित व्हायरल व्हिडिओ हा क्लिप केल्याचे समजले. हा व्हिडिओ पीएम मोदी हे आसाम च्या निवडणुकांचा प्रचार करत असताना गोलाघाट जिल्ह्याच्या बोकाखाट इथे एका रॅली ला संबोधित करतानाचा आहे. पीएम मोदी हे काँग्रेस वर निशाणा साधत होते. त्यांच्या भाषणाचा अपूर्ण व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.

  • Claim Review : पीएम मोदी यांनी म्हंटले कि गरिबांना फक्त स्वप्न दाखवा, खोटं बोला, आपसात लढवा आणि राज्य करा.
  • Claimed By : Rishiraj Mandawat
  • Fact Check : Misleading
Misleading
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later