Fact Check: हे छायाचित्र अयोध्याच्या राम मंदिर चे नाही, हे काशीविश्वनाथ कॉरिडॉर वाराणसी चे आहे

विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट मध्ये केलेला दावा खोटा ठरला. पोस्ट मध्ये वापरले गेलेले छायाचित्र कशी विश्वनाथ मंदिर कॉरिडॉर वाराणसी चे आहे, ज्यांना राम मंदिर च्या नावाने व्हायरल करण्यात येत आहे.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर एक पोस्ट सध्या खूप व्हायरल होत आहे, ज्यात काही छायाचित्र वापरून दावा केला जात आहे कि, हे छायाचित्र अयोध्याच्या राम मंदिर च्या निर्माण चे आहे. विश्वास न्यूज ला आपल्या तपासात कळले कि हि पोस्ट खोटी आहे. पोस्ट मध्ये वापरल्यागेलेले छायाचित्र हे कशी विश्वनाथ मंदिर कॉरिडॉर वाराणसी मधल्या निर्माणकार्य चे आहे, ज्यांना राम मंदिरच्या नावाने व्हायरल केले जात आहे.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर “कुंदन चौहान राजपूत” ने ३१ ऑक्टोबर रोजी “जनसँख्या नियंत्रण कानून समर्थक ग्रुप | POPULATION CONTROL ACT SUPPORT GROUP” नावाच्या ग्रुप वर हे छायाचित्र अपलोड केले आणि लिहले , “अयोध्या प्रभु श्री राम जी की मंदिर निर्माण का पहला तस्वीर है। जिन भाईयों को देखकर ख़ुशी हुई, तो एक बार सच्चे दिल से आप #जयश्रीराम बोल दे।
अर्थात: अयोध्या मध्ये निर्माण होत असलेल्या राम मंदिरचे हे पहिले छायाचित्र आहे. ज्यांना पाहून ख़ुशी झाली त्यांनी जय श्री राम म्हणावे.

या पोस्ट चे अर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
तपासाच्या सुरुवातीला आम्ही या छायाचित्रांना गूगल रिव्हर्स इमेज सर्च मध्ये अपलोड केले आणि सर्च केले. सर्चच्या निकालात आम्हाला कळले कि हे छायाचित्र मंदिर निर्माण चे नाही आहे. जागरण च्या संकेतस्थळावर २७ ऑक्टोबर रोजी प्रकाशित एका बातमीत आम्हाला हे छायाचित्र सापडले. या बातमीचे हेडलाईन होते: Dream Project of PM Modi: वाराणसी में काशी विश्वनाथ मंदिर कॉरिडोर के निर्माण कार्य ने गति पकड़ी

बातमी प्रमाणे, हे छायाचित्र वाराणसीच्या कशी विश्वनाथ मंदिर कॉरिडॉर च्या निर्माण कार्याचे आहे. या बातमीत व्हायरल छायाचित्र पहिले जाऊ शकतात. पूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

व्हायरल छायाचित्र आम्हाला हिंदुस्थान टाइम्स च्या वेबसाईट वर प्रकाशित केलेले दिसले. हि बातमी इथे वाचा.

तपास च्या पुढच्या टप्प्यात आम्ही या छायाचित्रांबद्दल आमचे सहयोगी दैनिक जागरण चे वाराणसी चे रिपोर्टर शाश्वत मिश्रा यांना विचारणा केली. शाश्वत ने आम्हाला सांगितले कि हे छायाचित्र काशीविश्वनाथ मंदिर कॉरिडॉर निर्माणकार्याचे आहे.

आता हे स्पष्ट झाले होते कि व्हायरल छायाचित्र हे अयोध्येतील राम मंदिर निर्मांण चे नाही आहे. आम्ही व्हायरल पोस्ट शेअर करणाऱ्या यूजर च्या अकाउंट चा तपास केला, कुंदन चौहान राजपूत हे बिहार चे रहिवासी आहे, त्यांच्या अकाउंट ला १,७१२ लोकं फोल्लो करतात. हे अकाउंट सप्टेंबर २०१७ मध्ये बनवण्यात आले होते.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट मध्ये केलेला दावा खोटा ठरला. पोस्ट मध्ये वापरले गेलेले छायाचित्र कशी विश्वनाथ मंदिर कॉरिडॉर वाराणसी चे आहे, ज्यांना राम मंदिर च्या नावाने व्हायरल करण्यात येत आहे.

False
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट