Fact Check: विलासराव देशमुख यांचे लहानपणीचे छायाचित्र बाबा साहेब आंबेडकर चा फोटो सांगून होत आहे व्हायरल
- By: Pallavi Mishra
- Published: Apr 18, 2021 at 12:51 PM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर व्हायरल होत असलेल्या एका छायाचित्रात एका मुलाचे छायाचित्र दिसत आहे यात दावा करण्यात येत आहे कि हे छायाचित्र बाबासाहेब आंबेडकरांचे लहानपणीचे छायाचित्र आहे. विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा खोटा ठरला. असे कळले कि हे छायाचित्र स्वर्गीय काँग्रेस नेता आणि महाराष्ट्राचे पूर्व मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे लहानपणीचे छायाचित्र आहे.
काय होत आहे व्हायरल?
व्हायरल पोस्ट मध्ये एका मुलाचे छायाचित्र आहे आणि त्यावर लिहले आहे: “क्रांतिकारी जय भीम साथियों, जय भीम का नारा दुनिया में सबसे प्यारा, दुनिया में सबसे सुंदर। बाबा साहेब डॉ भीमराव अंबेडकर। मेरे बाबा साहेब का बचपन का फोटो।”
या पोस्ट चा आर्काइव्ह लिंक इथे बघा.
तपास:
तपासाची सुरुवात आम्ही हे छायाचित्र गूगल रिव्हर्स इमेज सर्च मध्ये अपलोड करून केली. आम्हाला NDTV च्या एका बातमीत हे छायाचित्र मिळाले. हि बातमी २७ वर्षीय लातूर चे निवासी अजयकुमार बोराडे पाटील यांच्याबद्दल होती, जे महाराष्ट्राचे पूर्व मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे मोठे प्रशंसक होते. बातमी प्रमाणे, अजयकुमार बोराडे पाटील हे विलासराव देशमुख यांचे काही छायाचित्र आणि व्हिडिओस गोळा करत होते, हे छायाचित्र त्याच संग्रहाचा एक भाग आहे.
अधिक शोधल्यावर जनसत्ता च्या वेबसाईट वर २८ एप्रिल २०१८ रोजी प्रकाशित एक बातमी मिळाली, ज्यात या छायाचित्राबद्दल माहिती दिली होती. बातमी प्रमाणे “या सरकारी मॅगझीन मध्ये एका जागेवर डॉ भीमराव आंबेडकर यांच्या लहानपणीचे छायाचित्र सांगून विलासराव देशमुख यांचे लहानपणीचे छायाचित्र वापरले गेले आहे.”
या मॅगझीन मध्ये झालेल्या एका चौकीवर आम्हाला काँग्रेस नेते वर्ष गायकवाड यांनी २७ एप्रिल २०१८ रोजी केलेला एक ट्विट देखील आम्हाला मिळाला. या पोस्ट सोबत लिहले होते: “Big mistake by #Maharastra Govt. @MahaDGIPR magazine #MaharashtraAhead wrongly prints Congress Leader Late Shri Vilasrao Deshmukh’s childhood pic as #DrAmbedkar’s childhood pic. @INCMaharashtra @INCMumbai #Congress”
आता हे स्पष्ट झाले होते कि हे छायाचित्र स्वर्गीय काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे आहे, भीमराव आंबेडकर चे नाही. अधिक माहिती मिळवण्यासाठी आम्ही अजयकुमार बोराडे यांना संपर्क केला. पाटील एक पत्रकार आहे आणि खूप वेळ पासून स्वर्गीय नेते विलासराव देशमुख यांचे छायाचित्र आणि व्हिडिओस संग्रहित करत आहेत. त्यांनी आम्हाला सांगितले, “हे छायाचित्र विलासराव देशमुख यांच्या लहानपणीचे आहे. माझे कॉलेक्शन बघितल्यावर प्रशंसा करत विलासराव यांचे भाचे अभिजीत देशमुख यांनी मला हे छायाचित्र भेट दिले”. त्यांनी आम्हाला खरे छायाचित्र देखील पाठवले.
१४ एप्रिल रोजी बाबा साहेब डॉ भीमराव आंबेडकर यांची १३०वि जयंती होती.
व्हायरल छायाचित्र शेअर करणारे यूजर ‘Vinod Ingle’ यांचे सोशल स्कॅनिंग केले, त्यात कळले कि यूजर मुंबई चे रहिवासी आहेत. यूजर चे फेसबुक वर ९९६ फ्रेंड्स आहेत.
- Claim Review : भीमराव आंबेडकर यांचे लहानपणीचे छायाचित्र
- Claimed By : Vinod Ingole
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.