Fact Check : टीशर्ट घालून योग करतानाचे योगी आदित्यनाथ यांचे व्हायरल छायाचित्र तीन वर्ष जुने
विश्वास न्यूज च्या तपासात योगी आदित्यनाथ यांच्या संबंधित पोस्ट भ्रामक सिद्ध झाली. 2018 साल चे छायाचित्र काही लोकं आताचे समजून मुद्दाम व्हायरल करत आहेत.
- By: Ashish Maharishi
- Published: Jun 25, 2021 at 09:44 PM
विश्वास न्यूज (नवी दिल्ली): युपी चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे सोशल मीडिया वर एक जूने छायाचित्र व्हायरल होत आहे. या छायाचित्रात त्यांना टीशर्ट मध्ये योग करताना बघितले जाऊ शकते. यूजर्स दावा करत आहे कि हे छायाचित्र २०२१ च्या योग दिवस चे हे छायाचित्र आहे. विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल होत असलेला हा दावा भ्रामक असल्याचे सिद्ध झाले. २०१८ चे हे छायाचित्र लोकं आताचे समजून व्हायरल करत आहेत.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर निर्भयकांत मिश्रा ने 21 जून रोजी एक पोस्ट शेअर केली आणि लिहले: ‘हिन्दू ह्रदय सम्राट योगी आदित्यनाथ जी का आज का योग दर्शन। योगी जी को पहली बार टीशर्ट में देखा है।’
या छायाचित्राला दुसरे यूजर्स देखील खरे मानून शेअर करत आहेत. या फेसबुक पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
विश्वास न्यूज ने सगळ्यात आधी व्हायरल छायाचित्र गूगल रिव्हर्स इमेज टूल च्या मदतीने शोधण्यास सुरु केले. योगी आदित्यनाथ यांचे हे छायाचित्र आम्हाला आजतक च्या वेबसाईट वर सापडले. 21 जून 2018 रोजी एका बातमीत या छायाचित्राचा वापर करून सांगितले गेले होते, कि आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने लखनऊ च्या राजभवन मध्ये केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग यांच्या सोबत योगी आदित्यनाथ यांनी टीशर्ट घालून योगासन केले. हि संपूर्ण बातमी इथे वाचा.
तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही InVID च्या ट्विटर सर्च टूल ची मदत घेतली. त्याद्वारे आम्हाला २०१८ सालीचे एएनआई यूपी आणि योगी आदित्यनाथ यांचे तेव्हाचे ट्विट मिळाले. दोन्ही ट्विट मध्ये योगी आदित्यनाथ यांना टीशर्ट घातलेले बघितले जाऊ शकते.
योगी आदित्यनाथ यांच्या ट्विटर हॅन्डल वरून 21 जून 2018 रोजी हा ट्विट केला गेला होता. छायाचित्राच्या बॅकग्राऊंड वरून आम्हाला हे लक्षात आले कि आता व्हायरल होत असलेले छायाचित्र हे तेव्हाचे आहे.
तपासादरम्यान आम्हाला सीएम ऑफिस च्या ट्विटर हॅन्डल वर देखील चार छायाचित्रे मिळाली. त्यात देखील योगी आदित्यनाथ यांना टीशर्ट मध्ये बघितले जाऊ शकते. हा ट्विट देखील 21 जून 2018 रोजी केला होता.
तपासाच्या शेवटच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने युपी चे भाजपा चे प्रवक्ता राकेश त्रिपाठी यांना संपर्क केला. त्यांनी विश्वास न्यूज ला सांगितले कि व्हायरल होत असलेले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे छायाचित्र हे 2018 सालचे आहे.
विश्वास न्यूज च्या तपासाच्या शेवटच्या टप्प्यात योगी आदित्यनाथ यांचे व्हायरल छायाचित्र शेअर करणाऱ्या यूजर चा आम्ही सोशल बॅकग्राऊंड चेक केला. त्यात असे कळले कि यूजर सध्या विराटनगर चे रहिवासी आहेत आणि त्यांना तीन हजार पेक्षा जास्ती लोकं फॉलो करतात.
निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात योगी आदित्यनाथ यांच्या संबंधित पोस्ट भ्रामक सिद्ध झाली. 2018 साल चे छायाचित्र काही लोकं आताचे समजून मुद्दाम व्हायरल करत आहेत.
- Claim Review : टीशर्ट घालून योग करतानाचे योगी आदित्यनाथ यांचे व्हायरल छायाचित्र
- Claimed By : फेसबुक यूजर निर्भयकांत मिश्रा
- Fact Check : Misleading
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.