Fact Check: व्हायरल होत असलेल्या या छायाचित्रात अण्णा हजारे नसून लक्ष्मणराव इमानदार आहेत

विश्वास न्यूज च्या तपासात अण्णा हजारे यांच्या नावावर व्हायरल होत असलेले छायाचित्र खोटे असल्याचे लक्षात आहे. छायाचित्रात अण्णा हजारे नसून संघाचे लक्ष्मणराव इनामदार आहेत.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या नावावर एक जुने छायाचित्र व्हायरल होत आहे. यूजर्स दावा करत आहेत कि छायाचित्रात नरेंद्र मोदी यांच्या खांद्यावर हाथ ठेऊन त्यांच्या बाजूला उभे असलेले व्यक्ती हे अण्णा हजारे आहेत.

विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट चा तपास केला. तपासात आम्हाला कळले कि छायाचित्रात मोदी यांच्यासोबत उभे असलेले व्यक्ती हे अण्णा हजारे नसून, लक्ष्मणराव इनामदार आहेत, जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कार्यरत होते.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर राहुल शिंदे यांनी २८ डिसेंबर रोजी एक छायाचित्र अपलोड केले आणि छायाचित्रात नरेंद्र मोदी यांच्या सोबत अण्णा हजारे असल्याचे सांगितले. हे छायाचित्र फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्सअँप वर देखील व्हायरल होत असल्याचे लक्षात आले.

फेसबुक पोस्ट चे आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
विश्वास न्यूज ने सगळ्यात आधी व्हायरल झालेले छायाचित्र गूगल रिव्हर्स इमेज मध्ये अपलोड करून शोधले. आम्हाला ओरिजिनिअल छायाचित्र इकोनॉमिक टाइम्‍स च्या वेबसाईट वर मिळाले. छायाचित्रात दिसत असलेले दुसरे व्यक्ती हे लक्ष्मणराव इनामदार आहेत, ज्यांना लोकं वकील साहेब या नावाने ओळखायचे.

या नंतर आम्ही युट्युब वर लक्ष्मणराव इनामदार यांच्याबद्दल शोधायला सुरुवात केली. आम्हाला डीडी न्यूज वर एक डॉक्युमेंटरी मिळाली. यात सांगितले गेले होते कि लक्ष्मणराव इनामदार यांचा जन्म २१ सप्टेंबर १९१७ मध्ये सातारा जिल्ह्याच्या एका गावात झाला. या व्हिडिओ मध्ये व्हायरल छायाचित्र देखील दिसले.

https://youtu.be/bxe0icLfL4E

तपासाच्या पुढच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघ (RSS) चे विदर्भ मीडिया इन्चार्ज अनिल साम्ब्रे यांना संपर्क केला. त्यांनी सांगितले कि व्हायरल छायाचित्रात दिसत असलेले व्यक्ती हे अण्णा हजारे नसून लक्ष्मणराव इनामदार आहेत. ते महाराष्ट्राचे क्षेत्र प्रचारक आणि गुजरात चे प्रांत प्रचारक होते. लोकं त्यांना वकील साहेब म्हणून ओळखायचे.

तपासाच्या शेवटच्या टप्प्यात आम्ही त्या यूजर चा तपास केला ज्यांनी लक्ष्मणराव इमानदार यांचे छायाचित्र अण्णा हजारे यांचे सांगून व्हायरल केले. आम्हाला कळले कि फेसबुक यूजर राहुल शिंदे एका विशीष्ठ विचारधारेसोबत प्रभावित आहेत.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात अण्णा हजारे यांच्या नावावर व्हायरल होत असलेले छायाचित्र खोटे असल्याचे लक्षात आहे. छायाचित्रात अण्णा हजारे नसून संघाचे लक्ष्मणराव इनामदार आहेत.

False
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट