विश्वास न्यूज च्या तपासात अण्णा हजारे यांनी भाजप जॉईन केला करणारी पोस्ट खोटी असल्याचे समजले. एडिटिंग टूल च्या मदतीने हि पोस्ट तयार केली गेली होती.
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर एक छायाचित्र व्हायरल होत आहे, ज्यात भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासोबत अण्णा हजारे यांचे छायाचित्र दिसते. यूजर्स दावा करत आहेत कि अण्णा यांनी भाजप मध्ये प्रवेश केला आहे.
विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट चा तपास केला असता, असे कळले कि हे छायाचित्र मॉर्फ्ड आहे. याला एडिटिंग टूल च्या मदतीने तयार करण्यात आले आहे. ओरिजिनल छायाचित्रात ज्योतिरादित्य सिंधिया आहेत.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक पेज रवीश कुमार फॅन क्लब ने ३० जानेवारी रोजी एक पोस्ट शेअर केली. पोस्ट मध्ये एका ट्विट चे स्क्रीनशॉट दिले गेले आहे. याला @AnnaHaare या नावाच्या ट्विटर हॅन्डल वरून करण्यात आले आहे. यात लिहल्या गेले आहे: माननीय श्री जेपी नडडा की मौजूदगी में आज भारतीय जनता पार्टी की सदस्यता ग्रहण की।
या फेसबुक पोस्ट चे आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
विश्वास न्यूज ने तपासाची सुरुवात गूगल सर्च ने केली. आम्हाला अण्णा हजारे यांनी भाजप मध्ये प्रवेश केल्याची कुठलीच बातमी नाही सापडली. या नंतर आम्ही व्हायरल छायाचित्राला गूगल रिव्हर्स इमेजच्या मदतीने शोधण्यास सुरुवात केली. तपास केल्यानंतर आम्हाला, अण्णा हजारे यांच्या जागी, ज्योतिरादित्य सिंधिया असल्याचे दिसले. टाइम्स ऑफ इंडिया च्या वेबसाईट वर असलेल्या एका बातमीत आम्हाला खरे छायाचित्र मिळाले. हे छायाचित्र तेव्हाचे आहे, जेव्हा सिंधिया यांनी काँग्रेस सोडून भाजप मध्ये प्रवेश केला. हि संपूर्ण बातमी तुम्ही इथे वाचू शकता.
तपासादरम्यान आम्हाला एबीपी न्यूज च्या अधिकृत योउयूब चॅनेल वर एक बातमी मिळाली ज्यात सांगितले गेले होते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भाजप मध्ये प्रवेश केला. व्हिडिओ मध्ये सिंधिया यांना भाजप अध्यक्ष जे पी नड्डा आणि बाकी मोठ्या नेत्यांसोबत बघितले जाऊ शकते. व्हिडिओच्या पाचव्या मिनिटावर भाजप अध्यक्ष ज्योतिरादित्य सिंधिया यांना बुके देताना दिसतात. हि घटना ११ मार्च २०२० ची आहे. हा पूर्ण व्हिडिओ इथे बघा.
तपास पुढे नेऊन विश्वास न्यूज ने ई-मेल द्वारे अण्णा हजारे यांना संपर्क केला. ई-मेल द्वारे आम्हाला सांगितले गेले कि अण्णा हजारे यांनी भाजप जॉईन केल्याची बातमी खोटी आहे. व्हायरल छायाचित्र आणि त्यांच्या नावावर बनवले गेलेले ट्विटर अकाउंट दोन्ही खोटे आहे.
तपासादरम्यान आम्हाला कळले कि @AnnaHaare नावाचे ट्विटर अकाउंट अस्तित्वात नाही.
तपासाच्या शेवटच्या टप्प्यात आम्ही त्या यूजर पर्यंत पोहोचलो ज्यांनी हि पोस्ट व्हायरल केली. आम्हाला कळले कि रवीश कुमार फॅन क्लब नावाचा पेज फेसबुक वर बराच ऍक्टिव्ह आहे.
निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात अण्णा हजारे यांनी भाजप जॉईन केला करणारी पोस्ट खोटी असल्याचे समजले. एडिटिंग टूल च्या मदतीने हि पोस्ट तयार केली गेली होती.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923