Fact Check: तेज प्रताप यादव चे व्हायरल चित्र एडिटेड आहे
विश्वास न्यूज च्या तपासात तेज प्रताप यादव ह्यांचे व्हायरल चित्र एडिटेड असल्याचे समजले. ओरिजिनल चित्रात बकरी नाही.
- By: Ashish Maharishi
- Published: Sep 15, 2021 at 04:03 PM
विश्वास न्यूज (नवी दिल्ली): सोशल मीडिया वर बिहार चे पूर्व मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचे सुपुत्र तेज प्रताप उड़ाव यांचे एक चित्र व्हायरल होत आहे. ह्यात ते बससुरी वाजवताना दिसतात. चित्रात तेज प्रताप यादव यांच्या पायापाशी एक बकरी दिसते. सोशल मीडिया वर यूजर्स ह्या चित्राला खरे समजून शेअर करत आहेत आणि त्यांची गम्मत करत आहेत. विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट चा तपास केला, त्यात आम्हाला कळले कि खऱ्या चित्रात मुद्दाम बकरी चे चित्र एडिट करण्यात आले आहे. आमच्या तपासात हे चित्र खोटे असल्याचे समजले.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर फलनवा छौड़ा ने 9 सप्टेंबर रोजी एक चित्र पोस्ट करून लिहले: ‘कोई इस “दुग्गल भैया” को बताओ रे की “श्री कृष्ण” गाय पालते थे बकरी नही..!!’
ह्या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट च्या मागचे सत्य जाणून घेण्यासाठी गूगल रिव्हर्स इमेज टूल ची मदत घेतली. ह्यात व्हायरल चित्र अपलोड करून सर्च केल्यावर आम्हाला न्यूज4नेशन नावाच्या एका वेबसाईट वर एक बातमी मिळाली. ह्यात व्हायरल चित्र वापरल्याचे आम्हाला दिसले. 8 डिसेंबर 2019 रोजी अपलोड केलेल्या बातमीत, बिहार च्या पूर्व मुख्यमंत्रांच्या मुलाचे हे चित्र कुठल्या मंदिरातील असल्याचे सांगितले आहे. आम्हाला ह्यात बकरी कुठेच दिसली नाही.
बातमीत तेजप्रताप ह्यांच्या इंस्टाग्राम च्या अकाउंट चा उल्लेख करण्यात आला आहे. आम्हाला तेज प्रताप यादव ह्यांचा अकाउंट वर ओरिजिनल व्हिडिओ मिळाला. त्यांना ह्यात बासुरी हातात घेऊन बघितले जाऊ शकते. इथे पण कुठेच बकरी नाही आहे. आम्हाला कळले कि हा व्हिडिओ वृंदावन मध्ये बनवण्यात आला होता. ह्याला 5 जून 2020 रोजी अपलोड करण्यात आले आहे.
तपासाच्या पुढच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने दैनिक जागरण डॉट कॉम चे बिहार चे प्रभारी अमित आलोक ह्यांना संपर्क केला. त्यांनी आम्हाला सांगितले कि तेजप्रताप यादव चे हे चित्र एडिटेड आहे.
तपासाच्या शेवटच्या टप्प्यात आम्ही यूजर च्या अकाउंट चा तपास केला, त्यात आम्हाला कळले कि फलनवा छौड़ा हे बिहार च्या मधुबनी चे रहिवासी आहे. ह्या अकाउंट ला ऑगस्ट 2018 मध्ये बनवण्यात आले.
निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात तेज प्रताप यादव ह्यांचे व्हायरल चित्र एडिटेड असल्याचे समजले. ओरिजिनल चित्रात बकरी नाही.
- Claim Review : ‘कोई इस “दुग्गल भैया” को बताओ रे की “श्री कृष्ण” गाय पालते थे बकरी नही..!!’
- Claimed By : फलनवा छौड़ा
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.