व्हायरल कोलाज मध्ये ब्लॅक अँड व्हाईट छायाचित्र मुगल बादशाह बहादुर शाह जफर यांचा मुलगा मिर्जा शाह अब्बास यांचे आहे. कलर छायाचित्र जोधा-अकबर सिरीयल मध्ये अकबर ची भूमिका पार पडणारे कलाकार, रजत टोकास यांचे आहे. या छायाचित्रांना मुगल सम्राट अकबर यांच्या सोबत जोडून व्हायरल केले जात आहे.
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर सध्या एक कोलाज असलेले छायाचित्र व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे कि हे मुगल सम्राट अकबर यांचे खरे छायाचित्र आहे, जेव्हाकी दुसरे छायाचित्र अकबर चे सांगून एका विशिष्ट विचारधारेच्या लोकांनी अकबर चे सांगून पोस्ट केले आहे. विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा खोटा असल्याचे समजले. व्हायरल कोलाज मध्ये असलेले छायाचित्र हे शेवटचे मुगल बादशाह बहादुर शाह जफर यांचा मुलगा मिर्जा शाह अब्बास चे आहे, जेव्हाकी दुसरे छायाचित्र, ‘जोधा अकबर’ या सिरीयल मध्ये अकबर ची भूमिका साकारणारे ऍक्टर रजत टोकस यांचे आहे.
काय होत आहे व्हायरल?
विश्वास न्यूज ला आपल्या अपने फैक्ट चेकिंग वॉट्सऐप चैटबॉट (+91 95992 99372) वर देखील हा दावा तपासाकरिता मिळाला. @Raajputani ट्विटर हॅन्डल ने हा फोटो कोलाज आणि त्या सोबत जुडलेला व्हायरल दावा ट्विट केला. या ट्विट चा आर्काइव्ह व्हर्जन तुम्ही इथे क्लिक करून बघू शकता.
तपास:
आम्ही सगळ्यात आधी व्हायरल कोलाज मधल्या छायाचित्रांना वेग-वेगळ क्रॉप करून त्यावर गूगल रिव्हर्स इमेज सर्च टूल चा वापर केला. डाव्या बाजूच्या ब्लॅक अँड व्हाईट छायाचित्रावर गूगल रिव्हर्स इमेज सर्च टूल चा वापर केल्यावर आम्हाला बरेच निकाल मिळाले. आम्हाला, ‘लाइव हिस्ट्री इंडिया’ च्या वेबसाईट वर १६ जून २०२० रोजी प्रकाशित एक रिपोर्ट मिळाली. हि रिपोर्ट (टाइटल: The Epidemic that Slayed the Mughals’ Last Heir) मुगल शहंशाह वर आधारित आहे. ह्या रिपोर्ट मध्ये व्हायरल ब्लॅक अँड व्हाईट छायाचित्राचा वापर करण्यात आला आहे. छायाचित्राच्या कॅप्शन मध्ये दिल्या प्रमाणे छायाचित्रात, बहादुर शाह जफर यांचा मुलगा मिर्जा शाह अब्बास आहे. छायाचित्र १८६० मधले आहे असे सांगण्यात आले आहे. या रिपोर्ट वर क्लिक करून ती तुम्ही इथे बघू शकता.
विश्वास न्यूज ने दिलेल्या माहिती प्रमाणे, मुगल बादशाह बहादुर शाह जफर आणि मिर्जा शाह अब्बास इंटरनेट वर त्यांच्याबद्दल तपास केला. आम्ही भारत सरकार च्या अधिकृत वेबसाईट indianculture.gov.in वर बहादुर शाह जफर यांच्याबद्दल माहिती असलेल्या एका लेख वर पोहोचलो. या लेखात देखील व्हायरल होत असलेल्या ब्लॅक अँड व्हाईट छायाचित्राचा वापर करण्यात आला आहे. लेखात वापरण्यात आलेल्या छायाचित्रात, दोन युवक दिसतात. डाव्या ते उजव्या क्रमात सांगितले गेले आहे कि यात बहादुर शाह जफर यांचे मुलं, मिर्जा जवान बख्त आणि मिर्जा शाह अब्बास आहे. छायाचित्र १८५०-६० च्या मधले सांगण्यात आले आहे.
विश्वास न्यूज ने व्हायरल कोलाज च्या उजव्या बाजूला असलेल्या छायाचित्राला क्रॉप करून गूगल रिव्हर्स इमेज सर्च चा वापर करून शोधले. हे छायाचित्र आम्हाला pinterest साइट आणि इंस्टाग्राम पोस्ट वर मिळाली. हे छायाचित्र टीव्ही वर येणारी सिरीयल, ‘जोधा-अकबर’ या मालिकेत, अकबरची भूमिका साकारणारे कलाकार रजत टोकस यांचे छायाचित्र आहे. zee5.com वर आम्हाला अकबर बनलेल्या रजत टोकस याच्यासोबत संबंधित एक लेख मिळाला. हा लेख तुम्ही इथे क्लिक करून बघू शकता.
विश्वास न्यूज ने मुगल सम्राट अकबर यांच्या कालखंडाबद्दल अधिक माहिती मिळवली. NCERT च्या वेबसाईट वर मुगल साम्राज्य बद्दल असलेल्या माहिती प्रमाणे, सम्राट अकबर चा कार्यकाळ 1556 ते 1605 ई होता. नेशनल ज्योग्राफिक ची अधिकृत वेबसाईट वर असलेल्या माहिती प्रमाणे, फ्रेंच वैज्ञानिक Joseph Nicéphore Niépce ने 1826 मध्ये पहिले छायाचित्र घेतले. अश्यात हे संभव नाही कि, मुगल सम्राट अकबर चे छायाचित्र हे कॅमेरानी घेण्यात आले असेल.
विश्वास न्यूज ने व्हायरल दाव्या बद्दल जाणून घेण्याकरिता, वीर कुंवर सिंह विश्वविद्यालय मध्ये इतिहासाचे असिस्टेंट प्रोफेसर अजीत राय यांना संपर्क केला. आम्ही त्यांना व्हायरल कोलाज पाठवला. त्यांनी पुष्टी करून सांगितले कि ब्लॅक अँड व्हाईट छायाचित्र बहादुर शाह जफर चा मुलगा मिर्जा शाह अब्बास यांचे आहे. त्यांनी हे देखील सांगितले कि सम्राट अकबर यांचे कुठलेच कॅमेरा नि घेतलेले छायाचित्र उपलब्ध नाही आहे, कारण तेव्हा कॅमेरा बनलाच नव्हता. त्यांचे छायाचित्र कलाकृती आणि अकबरनामा मध्ये उपलब्ध आहे.
विश्वास न्यूज ने व्हायरल दावा शेअर करणाऱ्या @Raajputani ट्विटर हैंडल हा प्रोफाइल स्कॅन केला. हा प्रोफाइल सप्टेंबर २०१४ मध्ये बनवला गेला होता. फॅक्ट-चेक होत पर्यंत, त्यांचे १०.५ हजार पेक्षा जास्ती फॉलोवर्स होते.
निष्कर्ष: व्हायरल कोलाज मध्ये ब्लॅक अँड व्हाईट छायाचित्र मुगल बादशाह बहादुर शाह जफर यांचा मुलगा मिर्जा शाह अब्बास यांचे आहे. कलर छायाचित्र जोधा-अकबर सिरीयल मध्ये अकबर ची भूमिका पार पडणारे कलाकार, रजत टोकास यांचे आहे. या छायाचित्रांना मुगल सम्राट अकबर यांच्या सोबत जोडून व्हायरल केले जात आहे.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923