Fact Check: प्रदर्शन करणारे हे लोकं बिहार मध्ये मतगणना परत करण्याची मागणी करत नाही आहे, व्हायरल दावा खोटा आहे

विश्वास न्यूज ला आपल्या तपासात कळले कि व्हायरल दावा खोटा आहे. हा व्हिडिओ विधान सभा निवडणुकीचे निकाल यायच्या आधीच आहे. हे लोकं दुर्गापूजेच्या मूर्ती विसर्जनाच्या वेळी, मुंगेर मध्ये झालेल्या गोळीबाराचा विरोध करत आहे, परत मतगणनेची मागणी करत नाही आहे.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओ मध्ये रागावलेली लोकांची गर्दी रस्त्यावर नारेबाजी करताना दिसते. हा व्हिडिओ व्हायरल करून लोकं दावा करत आहेत कि हे बिहार चे लोकं आहेत जे नुकतेच झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालांपासून खुश नाहीत आणि म्हणून ते मतांच्या गणनेची परत मागणी करत आहेत. विश्वास न्यूज ला आपल्या तपासात कळले कि हा व्हिडिओ विधान सभा निवडणुकांचे निकाल घोषित व्हायच्या आधीच आहे. हे लोकं मुंगेर मध्ये दुर्गापूजा च्या मूर्तीच्या विसर्जन च्या वेळी झालेल्या गोळीबाराच्या विरोधात प्रदर्शन करत आहेत.

काय होत आहे व्हायरल?
या पोस्ट ला भास्कर यादव विद्रोही नावाच्या एका फेसबुक यूजरने शेअर केले आहे. यूजर ने दावा केला कि “#रीकांउटिंग को लेकर बिहार की जनता में भारी आक्रोश देखने को मिली #बिहारमांगेंरिकॉउंटिंग वीडियो पटना कि

अर्थात: बिहार मध्ये मतगणने वरून लोकांमध्ये बराच राग आहे आणि म्हणून ते लोकं परत मत मोजण्याची मागणी करत आहे. व्हिडिओ पटना चा आहे.

या पोस्ट ची आर्काइव्ह लिंक इथे बघा.

तपास:
या व्हिडिओ चा तपास आम्ही, हा व्हिडिओ InVID टूल मध्ये अपलोड करून केला. त्यात आम्हाला बऱ्याच किफ्रेम्स मिळाल्या, त्या किफ्रेम्स ला आम्ही गूगल रिव्हर्स इमेज सर्च मध्ये अपलोड करून सर्च केले. सर्च च्या वेळी आम्हाला फेसबुक वर Dynamite News Hindi नावाच्या एका वेरीफाईड फेसबुक पेज वर मिळाला. या व्हिडिओ ला २९ ऑक्टोबर रोजी अपलोड केले होते. या व्हिडिओ च्या २० सेकंड्स नंतर व्हायरल झालेली व्हिडिओ क्लिप सुरु होते. या पोस्ट मध्ये डिस्क्रिप्शन मध्ये लिहले होते, “LIVE: बिहार के मुंगेर में भयानक हिंसा, पुलिस की गाड़ियों को किया गया आग के हवाले, तीन दिन पहले मां दुर्गा की प्रतिमा विसर्जन के दौरान एसपी लिपि सिंह की अराजकता आयी थी सामने, एक गरीब युवक को मार दी गयी थी गोली, इसके बाद भी नहीं हटाया गया था एसपी-डीएम को, भड़की जनता ने किया आज मुंगेर बंद, इसके बाद सड़कों पर लोगों का फूट पड़ा गुस्सा, चारों तरफ से घिरे चुनाव आयोग ने भारी हिंसा के बाद हटाया डीएम-एसपी को, एसपी लिपि सिंह हैं सीएम नीतीश कुमार के बेहद करीबी जदयू नेता आरसीपी सिंह की बेटी, माहौल अभी भी है तनावपूर्ण।”

मुंगेर मध्ये झालेल्या हिंसेचा एक व्हिडिओ आम्हाला News18 India च्या युट्युब चॅनेल वर पण २९ ऑक्टोबर रोजी अपलोड केलेला मिळाला.

बिहार मध्ये मतगणना १० नोव्हेंबर रोजी झाली होती आणि हा व्हिडिओ त्याच्या आधी पासून इंटरनेट वर आहे.
या व्हिडिओ ची पुष्टी करण्यासाठी आम्ही बिहार मध्ये जागरण चे वेबडेस्क चे हेड अमित आलोक यांना संपर्क केला. त्यांनी कन्फर्म केले कि हा व्हिडिओ मतगणना च्या आधी चा आहे. त्यांनी म्हंटले, “व्हिडिओ चा नुकत्याच झालेल्या मतगणनेशी काहीही संबंध नाही. याच्या बॅकग्राऊंड मध्ये मतगणना केंद्र नाही आहे. हा व्हिडिओ जुना आहे”.
आम्ही त्या व्हायरल व्हिडिओ शेअर करणाऱ्या यूजर चे सोशल सकॅनिंग केले. भास्कर यादव विद्रोही नावाच्या फेसबुक पेज चे ६,६४८ फॉलोवर्स आहेत.

निष्कर्ष: विश्वास न्यूज ला आपल्या तपासात कळले कि व्हायरल दावा खोटा आहे. हा व्हिडिओ विधान सभा निवडणुकीचे निकाल यायच्या आधीच आहे. हे लोकं दुर्गापूजेच्या मूर्ती विसर्जनाच्या वेळी, मुंगेर मध्ये झालेल्या गोळीबाराचा विरोध करत आहे, परत मतगणनेची मागणी करत नाही आहे.

False
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट