Fact Check: लता मंगेशकर चा पाच वर्ष जुना फेसबुक लाईव्ह चा एक भाग एडिट करून व्हायरल
विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट दिशाभूल करणारी असल्याचे समजले. जो व्हिडिओ आताचा असल्याचा दावा करण्यात येत आहे, तो पाच वर्ष जुना आहे.
- By: Ashish Maharishi
- Published: Feb 9, 2022 at 09:13 PM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): भारतरत्न गान कोकीळा लता मंगेशकर ह्यांचे नुकतेच दुःखद निधन झाले, आता त्यांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे, लोकं दावा करत आहे कि हा लता मंगेशकर चा शेवटचा व्हिडिओ आहे. 1:24 मिनिटांच्या ह्या व्हिडिओ मध्ये लता मंगेशकर आपल्या फॅन्स ला प्रणाम करताना दिसत आहे. ह्या व्हिडिओ मध्ये त्यांना मदन भैय्या बद्दल बोलताना दिसतात. शेवटी एका व्हॉइस ओव्हर च्या माध्यमातून त्यांच्या निधनाबद्दल सांगितले गेले आहे. विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट चा तपास केला. त्यात व्हिडिओ पाच वर्ष जुना असल्याचे समजले. जानेवारी 2017 मध्ये लता मंगेशकर नि एक फेसबुक लाईव्ह केले होते. त्याचा काही भाग आता व्हायरल होत आहे.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक पेज M.R Entertainment ने लता मंगेशकर चा 1:24 मिनिटांचा एक व्हिडिओ अपलोड करून इंग्रजी मध्ये लिहले: ‘Lata Mangeshkar last moment before death’
फेसबुक पोस्ट चा कन्टेन्ट इथे जसाच्या तास दिला आहे. ह्याचा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा. सोशल मीडिया वर बाकी यूजर्स देखील हा शेअर करत आहे.
तपास:
विश्वास न्यूज ने लता मंगेशकर च्या व्हायरल व्हिडिओ च्या मागचे सत्य जाणून घेण्यासाठी आधी विविध किवर्डस गूगल सर्च द्वारे शोधले. सर्च च्या वेळी आम्हाला त्यांच्या फेसबुक पेज वर एक व्हिडिओ 4 जानेवारी 2017 रोजी लाईव्ह असल्याचे समजले. तिथे आम्हाला कळले कि त्यांनी आपल्या फॅन्स ला उत्तर दिले. पूर्ण व्हिडिओ इथे बघा.
तपासाच्या पुढच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने दैनिक जागरण, मुंबई मध्ये बॉलीवूड कव्हर करणाऱ्या स्मिता श्रीवास्तव ह्यांना संपर्क केला. त्यांनी देखील माहिती दिली कि हा व्हायरल व्हिडिओ पाच वर्ष जुना आहे.
तपासाच्या शेवटच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने दिशाभूल करणाऱ्या पोस्ट करणाऱ्या यूजर चा तपास केला. आम्हाला कळले कि फेसबुक पेज M.R Entertainment हा पेज 21 जानेवारी 2022 रोजी बनवला. हा पेज व्हायरल व्हिडिओस शेअर करतात.
निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट दिशाभूल करणारी असल्याचे समजले. जो व्हिडिओ आताचा असल्याचा दावा करण्यात येत आहे, तो पाच वर्ष जुना आहे.
- Claim Review : ‘Lata Mangeshkar last moment before death’
- Claimed By : M.R Entertainment
- Fact Check : Misleading
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.