Fact Check: व्हायरल व्हिडिओ मध्ये दिसत असलेल्या व्यक्तीचा पाकिस्तान जिंक्ल्याशी काही संबंध नाही
महाराष्ट्राचा एक जुना व्हिडिओ आता काही लोकं उत्तर प्रदेश च्या नावाने व्हायरल करत आहेत. व्हिडिओ जालन्याचा आहे.
- By: Ashish Maharishi
- Published: Nov 8, 2021 at 03:31 PM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): टी20 वर्ल्ड कप मध्ये पाकिस्तान जिंकल्यानंतर सोशल मीडिया वर बरेच खोटे आणि जुने व्हिडिओ खोट्या दाव्यासह व्हायरल होत आहेत. अश्याच एका व्हिडिओ मध्ये एका व्यक्तीची पिटाई होताना दिसत आहे. दावा करण्यात येत आहे कि ज्याची पिटाई होत आहे, तो पाकिस्तान जिंकल्याचा जल्लोष करत होता. ह्यानंतर युपी पोलिसांनी त्याची पिटाई केली. व्हायरल व्हिडिओ चा तपास केल्यावर विश्वास न्यूज च्या लक्षात आले कि हा दावा खोटा आहे. महाराष्ट्राचा एक जुना व्हिडिओ आता लोक खोट्या दाव्यासह व्हायरल करत आहे.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक पेज विश्व हिंदू लोक ने 28 ऑक्टोबर रोजी हा व्हिडिओ अपलोड केला आणि दावा केला: ‘पाकिस्तान की जीत का जश्न कुछ इस तरह यूपी में।’
व्हिडिओ मध्ये पोलिसकर्मी एका युवकाला मारहाण करताना दिसतात. फेसबुक पोस्ट चा कन्टेन्ट इथे जसाच्या तसा दिलेला आहे. पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट चा तपास सुरु केला आणि सगळ्यात आधी InVID टूल ची मदत घेतली. व्हायरल व्हिडिओ अपलोड केल्यावर आम्हाला बरेच स्क्रीनग्रेब्स मिळाले. आम्ही त्यांना गूगल रिव्हर्स इमेज सर्च च्या मदतीने शोधले, आणि आम्हाला हा व्हिडिओ इंटरनेट वर बऱ्याच ठिकाणी मिळाला. एबीपी लाइव डॉट कॉम ने 28 मे 2021 मध्ये एका बातमीत सांगितले कि हा व्हिडिओ महाराष्ट्र च्या जालना मधला आहे जेव्हा भाजप च्या एका कार्यकर्त्याला पोलिसांनी मारहाण केली. ह्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर पोलिसांनी ह्या बाबतीत तपासाचा आदेश दिला.
व्हायरल व्हिडिओ आम्हाला भाजप नेते किरीट सोमैय्या ह्यांच्या ट्विटर हॅन्डल वर देखील मिळाला. 27 मे 2021 रोजी अपलोड केलेल्या ह्या व्हिडिओ मध्ये त्यांनी लिहले कि जालना मध्ये, 9 एप्रिल रोजी जालना येथील दीपक दवाखान्यात यूथ सेक्रेटरी शिवराज नारियालवाले ह्यांना पोलिसांनी मारहाण केली.
विश्वास न्यूज ने तपासाच्या शेवटच्या टप्प्यात, जालनाच्या दैनिक पल्लवरंग चे पत्रकार अमित कुलकर्णी ह्यांच्या सोबत संपर्क केला. त्यांनी सांगितले कि व्हायरल व्हिडिओ जालना च्या दीपक दवाखान्याचा आहे. जिथे काही राजकीय कार्यकर्त्यांनी तमाशे केले होते, त्यानंतर पोलिसांनी एक्शन घेतली होती. व्हिडिओ चा युपी सोबत काहीच संबंध नाही आहे. हा जालना चा जुना व्हिडिओ आहे.
तपासाच्या शेवटच्या टप्प्यात, विश्वास न्यूज ने खोटी पोस्ट करणाऱ्या यूजर चा तपास केला. त्यात कळले कि फेसबुक पेज विश्व हिंदू लोक ला चार हजार पेक्षा जास्ती लोकं फॉलो करतात. हा पेज 25 जानेवारी 2020 रोजी बनवण्यात आला होता.
निष्कर्ष: महाराष्ट्राचा एक जुना व्हिडिओ आता काही लोकं उत्तर प्रदेश च्या नावाने व्हायरल करत आहेत. व्हिडिओ जालन्याचा आहे.
- Claim Review : पाकिस्तान जिंकल्याचा युपी मध्ये जल्लोष
- Claimed By : फेसबुक पेज विश्व हिंदू लोक
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.