Fact Check: भरतपूर चा तीन महिने जुने व्हिडिओ चुकीच्या दाव्याने होत आहे व्हायरल
आमच्या तपासात हे स्पष्ट झाले कि व्हायरल व्हिडिओ सोबत करण्यात आलेला दावा खोटा आहे. व्हायरल व्हिडिओ बरेली चा नाही, राजस्थान मधील भरतपूर जिल्ह्याचा तीन वर्ष जुना व्हिडिओ आहे.
- By: Amanpreet Kaur
- Published: Jun 2, 2021 at 09:51 PM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात रस्त्यावर काही लोकं एका पोलीस अधिकाऱ्याला मारताना दिसत आहेत, दावा केला जात आहे कि हि घटना बरेली च्या सिव्हिल लाईन्स ची आहे जिथे एका पोलीस अधिकाऱ्याने चालान कापले तर मुसलमान लोकांनी त्याची रस्त्यावरच पिटाई केली. विश्वास न्यूज ने तपास केल्यावर कळले कि या पोस्ट सोबत करण्यात येणारा दावा खोटा आहे.
व्हायरल होत असलेला याच वर्षीचा फेब्रुवारी मधला आहे आणि हा व्हिडिओ बरेली चा नाही तर राजस्थान च्या भरतपूर माधीवळ जुरहारा कस्ब्याचा आहे जिथे एका पोलीस अधिकाऱ्याच्या गाडीने दुसऱ्या गाडीला धडक दिल्यानंतर वाद झाला. स्थानिक लोकांनी त्यानंतर पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केली. या घटनेत कुठलाच सांप्रदायिक अँगल नाही.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर Sumit Sharma ने हा व्हिडिओ शेअर केला ज्या सोबत त्यांनी हा दावा केला: बरेली सिविल लाईन्स न्यूज़ पुलिस द्वारा चालान काटने पर मुसलमानों ने उनकी पिटाई की जो कानून को चुनौती है! यह वीडियो बताता है की आगे हिन्दुस्तान मे क्या क्या होगा| कौन देश चलायेगा! और सबका भविष्य क्या होगा ! कड़वा सच यह है कि देश को बाहर से ज्यादा अन्दर से बहुत ज्यादा खतरा है! दोस्तों इंसानियत के नाते आपसे हाथ जोड़कर विनती है कि यह वीडियो हर एक ग्रुप मे भेजना है कल शाम तक हर एक न्यूज़ चैनल मे आना चाहिये!
या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
विश्वास न्यूज ने व्हायरल व्हिडिओ चा तपास सगळ्यात आधी इनविड टूल च्या मदतीने केला, व्हिडिओ मधून आम्ही काही कीफ्रेम्स घेतलेत आणि त्यांना गूगल सर्च च्या माध्यमाने शोधले. आम्हाला त्यानंतर काही मीडिया रिपोर्ट्स मिळाले. फेब्रुवारी २०२१ मध्ये प्रकाशित झालेल्या या रिपोर्ट्स प्रमाणे, हि घटना राजस्थान च्या भरतपूर च्या जुरहरा कसब्याची आहे जिथे हरियाणा पोलीस चा एक कॉन्स्टेबल एका केस संदर्भात आला होता.
मीडिया रिपोर्ट्स प्रमाणे, भरतपूर हरियाणा च्या सीमेपाशी पुनहाना ठाण्याचा कॉन्स्टेबल एका केस बाबतीत शोध घेण्यास जुरहरा येथे गेला होता, तिथून निघत असताना त्याची गाडी दुसऱ्याच्या गाडी ला लागली आणि तिथे वाद पेटला. तेथील काही स्थानिक लोकांनी त्याला मारहाण देखील केली.
आम्ही या घटनेचे शिकार झालेले पुनहाना चे हेड कॉन्स्टेबल जगराम यांना संपर्क केला. त्यांनी सांगितले कि हि घटना २३ फेब्रुवारी ची आहे जेव्हा ते पुनहाना मधून पळालेल्या एका दाम्पत्याबद्दल माहिती घ्यायला पोहोचले. त्यांनी सांगितले कि जुरहरा ठाण्यात एका दाम्पत्याला बसवून ठेवले होते आणि त्यांच्याबद्दल अधिक माहिती घेण्यास जेव्हा ते गेले, तेव्हा जगराम यांची गाडी एका गाडीला तक्रावली. त्या दोघांमध्ये वाद झाला आणि तिथे बरीच गर्दी जमा झाली. काही लोकांनी जगराम यांना मारले देखील त्यांनी सांगितले कि व्हायरल व्हिडिओ सोबत केलेला दावा खोटा आहे आणि हि घटना बरेली ची नाही.
आम्हाला बरेली पोलीस चा एक ट्विट देखील मिळाला, ज्यात त्यांनी व्हिडिओ सोबत केलेल्या दाव्याचे खंडन केले आहे.
आम्ही फेसबुक वर हा व्हिडिओ शेअर करणारे यूजर Sumit Sharma यांचा प्रोफाइल तपासला, प्रोफाइल स्कॅन केल्यावर आम्हाला कळले कि त्यांचे १५७ फॉलोवर्स आहेत आणि त्यांनी हा व्हिडिओ Yati Narsinghanand Saraswati JI नावाच्या एका पेज वर शेअर केला होता ज्याचे ५४०० पेक्षा जास्ती सदस्य आहेत.
निष्कर्ष: आमच्या तपासात हे स्पष्ट झाले कि व्हायरल व्हिडिओ सोबत करण्यात आलेला दावा खोटा आहे. व्हायरल व्हिडिओ बरेली चा नाही, राजस्थान मधील भरतपूर जिल्ह्याचा तीन वर्ष जुना व्हिडिओ आहे.
- Claim Review : बरेली मध्ये पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण
- Claimed By : Sumit Sharma
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.