Fact Check: मुंबई मधील गणेश उत्सवाचा जुना व्हिडिओ रामनावमी शोभा यात्रेच्या नावाने व्हायरल

विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल दावा दिशाभूल करणारा निघाला. व्हायरल व्हिडिओ आताच नाही. व्हायरल व्हिडिओ गणेश उत्सव चा आहे.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर एक व्हिडिओ सध्या शेअर करण्यात येत आहे, दावा करण्यात येत आहे कि हा व्हिडिओ आताचा, रामनवमी शोभा यात्रेचा व्हिडिओ आहे. विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे समजले. व्हायरल व्हिडिओ चा 2022 रामनवमी सोबत काही संबंध नाही. व्हायरल व्हिडिओ गणेश उत्सव चा जुना व्हिडिओ आहे.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर sagarpandeyji ने व्हायरल व्हिडिओ शेअर केला आणि लिहले: “Bharat ka bacha jai jai shree Ram bol raha hai ramnavmi #ram #jaishreeram #ramsita #india #indian #hindu”

ह्या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
दाव्याच्या मागील सत्य जाणून घेण्यासाठी विश्वास न्यूज ने, इन्व्हिड टूल चा वापर करून बरेच ग्रेब्स घेतले. आम्ही हे शॉट्स गूगल रिव्हर्स इमेज सर्च द्वारे शोधले. त्यात आम्हाला हाच व्हिडिओ Chinchpoklicha Chintamani नावाच्या एका फेसबुक पेज वर एप्रिल 2020 रोजी अपलोड केलेला सापडला. कॅप्शन मध्ये दिलेल्या माहिती प्रमाणे हा व्हिडिओ चिंचपोकळी गणेश विसर्जन समारोहाचा आहे.

https://youtu.be/9c8wsI9Bi-w

आम्हाला हा व्हिडिओ युट्युब चॅनेल वर देखील 2021 मध्ये अपलोड केला गेला. इथे दिलेल्या माहिती मध्ये देखील कळले कि हा व्हिडिओ जुना आहे.

आम्ही चिंचपोकळी उत्सव मंडळ चे सदस्य समर्पण सुळे सोबत देखील संपर्क केला. त्यांनी आमाला सांगितले कि हा व्हिडिओ चिंचपोकळी उत्सव मंडळ ऑफिशिअल फेसबुक पेज वर देखील अपलोड केला आहे. हा व्हिडिओ 2019 गणेश उत्सव चा आहे.

तपासाच्या शेवटच्या टप्प्यात आम्ही फेसबुक यूजर sagarpandeyji ह्यांचा सोशल बॅकग्राऊंड चेक केला. यूजर च्या स्कॅनिंग मध्ये कळले कि त्यांचे 22.2k फॉलोवर आहेत.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल दावा दिशाभूल करणारा निघाला. व्हायरल व्हिडिओ आताच नाही. व्हायरल व्हिडिओ गणेश उत्सव चा आहे.

Misleading
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट