विश्वास न्यूज च्या तपासात मुलायम सिंह संबंधित पोस्ट दिशाभूल करणारी असल्याचे समोर आले. हे वक्तव्य त्यांनी 2015 मध्ये बिहार निवडणुकांच्यावेळी केले होते. ह्या वक्तव्याचा युपी निवडणूक किंवा मोहन भागवत ह्यांच्यासोबत काही संबंध नाही आहे.
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): यूपी विधानसभा निवडणुकीला अजून काही अवधी शिल्लक असला तरी सोशल मीडियावर त्याचे वारे वाहायला सुरु झाले आहे. मुलायम सिंह यांचे एक जुने विधान आता यूपी निवडणुका आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रमुख मोहन भागवत यांची भेट सह व्हायरल होत आहे. विश्वास न्यूजने व्हायरल झालेल्या पोस्टचा तपास केला त्यात हि बातमी दिशाभूल करणारी असल्याचे समजले. मुलायम सिंह यांनी नुकतेच हे विधान केले नाही. 2015 मध्ये बिहार निवडणुकीदरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले होते. या विधानाचा यूपी निवडणुकीशी काहीही संबंध नाही. त्यामुळे विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल झालेली पोस्ट दिशाभूल करणारी असल्याचे समोर आले आहे.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर Asif Hassani AIMIM ने 24 डिसेंबर रोजी दोन स्क्रीनशॉट शेअर करून, त्याच्या कॉलेज सह लिहले: ‘मोहन भागवत मिलने के बाद मुलायम को लग रहा है उत्तर प्रदेश में बीजेपी की सरकार बन रही है।’
वृत्तवाहिनीसारखे दिसणारे ब्रेकिंग प्लेट वापरून मुलायम सिंह यांच्या चित्राचे कॉलेज दिसते. त्यात मुलायम सिंह यांचा हवाला देत लिहिले होते की, मुझे बीजेपी सत्ता में आती दिख रही है। दुसऱ्या प्लेट मध्ये लिहले होते: राष्ट्रवाद, सीमा और भाषा पर बीजेपी-सपा की विचारधारा एक
पोस्ट चा कन्टेन्ट इथे जसाच्या तास देण्यात आला आहे. ह्याला खरे समजून बाकी यूजर्स देखील हा शेअर करत आहेत. पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
व्हायरल पोस्टच्या तळापर्यंत जाण्यासाठी विश्वास न्यूजने सर्वप्रथम गुगल सर्चची मदत घेतली. संबंधित कीवर्डच्या मदतीने आम्हाला हे जाणून घ्यायचे होते की मुलायम सिंह यादव यांनी अलीकडे असे काही विधान केले आहे का? व्हायरल पोस्टच्या सत्यतेची पुष्टी करणारी एकही बातमी आम्हाला सापडली नाही.
अधिक तपास करत विश्वास न्यूजने यूट्यूबवर सर्च सुरू केला. इथे शोधल्यावर आम्हाला न्यूज प्लसच्या यूट्यूब चॅनलवर एक बातमी मिळाली. ते 12 ऑक्टोबर 2015 रोजी अपलोड केले होते. यामध्ये आम्ही तीच ब्रेकिंग प्लेट पाहिली, जी आता यूपी निवडणुकीपूर्वी व्हायरल होत आहे. मुलायम सिंह यांनी 2015 मध्ये बिहार निवडणुकीदरम्यान असे विधान केले होते. ते इथे बघा.
विश्वास न्यूजने तपासाच्या पुढच्या टप्प्यात समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ.आशुतोष ह्यांना संपर्क केला. व्हायरल पोस्टबाबत ते म्हणाले की, सपाच्या वाढत्या समर्थनामुळे काही लोकांना धक्का बसला आहे. त्यामुळे अशा पोस्ट व्हायरल होत आहेत. मुलायम सिंह यांच्या या विधानाचा यूपीशी काहीही संबंध नाही.
तपासाअंती, आम्ही बनावट पोस्ट करणाऱ्या यूजर चा तपास केला. Asif hassani AIMIM नावाच्या फेसबुक पेजच्या सोशल स्कॅनिंगमध्ये त्याला दोन हजारांहून अधिक यूजर फॉलो करत असल्याचे समोर आले.
निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात मुलायम सिंह संबंधित पोस्ट दिशाभूल करणारी असल्याचे समोर आले. हे वक्तव्य त्यांनी 2015 मध्ये बिहार निवडणुकांच्यावेळी केले होते. ह्या वक्तव्याचा युपी निवडणूक किंवा मोहन भागवत ह्यांच्यासोबत काही संबंध नाही आहे.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923