Fact Check:सोलापूर मध्ये आंबेडकर जयंती सेलेब्रेशन चे २०१७ चे छायाचित्र चुकीच्या दाव्यासह आता होत आहे व्हायरल
आमच्या तपासात हे स्पष्ट झाले कि व्हायरल होत असलेले छायाचित्र हे २०१७ मध्ये सोलापूर मध्ये झालेल्या आंबेडकर जयंती उत्सवाचे आहे. त्या छायाचित्राचा कोरोना सोबत काहीच संबंध नाही.
- By: Amanpreet Kaur
- Published: Apr 19, 2021 at 03:49 PM
- Updated: Jun 18, 2021 at 12:36 AM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर एक छायाचित्र व्हायरल होत आहे, ज्यात रस्त्यावर बरीच गर्दी दिसते आणि मधोमध झांकी सजवलेली दिसते तसेच अजून एकीकडे निळ्या रंगाचे शामियाने देखील दिसतात. व्हायरल होत असलेल्या छायाचित्रात दावा करत विचारणा करण्यात येत आहे कि कुंभ मेळाव्याबद्दल बोलत असणारे लोकं कॉरोन काळात भीमराव आंबेडकर जयंती मानवल्यावर का गप्प आहेत. विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट मध्ये केलेला दावा खोटा असल्याचे समजले.
हे व्हायरल होत असलेले छायाचित्र २०१७ साल चे महाराष्ट्रातील सोलापूर इथे साजरी केलेल्या आंबेडकर जयंती हे आहे. या छायाचित्राचा कॉरोन सोबत काहीच संबंध नाही. सोलापूर मध्ये दार वर्षी उत्साहात आंबेडकर जयंती साजरी केल्या जाते, पण या वर्षी कोरोनाव्हायरस च्या प्रादुर्भावामुळे जयंती साजरी केल्या गेली नाही.
काय होत आहे व्हायरल?
ट्विटर यूजर Er. Durgesh Pandey ने हि पोस्ट शेअर केली आणि लिहले: जिनको #कुंभ मेले में #कोरोना दिखता है और #अम्बेडकर जयंती में कोरोना में नहीं दिखा उनको भीमटा कहते है। कोरोना हर जगह है ***।
या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
विश्वास न्यूज ने व्हायरल छायाचित्राचा तपास त्याला गूगल रिव्हर्स इमेज सर्च मध्ये अपलोड करून शोधण्यापासून केले. आम्हाला 7 AIMS नावाच्या एका अधिकृत युट्युब चॅनेल वर २४ एप्रिल २०१७ रोजी अपलोड केलेला एक व्हिडिओ सापडला. या व्हिडिओ मध्ये एका मिनीटानंतर दिसत असलेले दृश्य हे छायाचित्रामधले असल्याचे समजते. व्हायरल छायाचित्रांमध्ये, डावीकडे “आनंद बौद्ध मंडल” चा बॅनर दिसतो, जो या व्हिडिओ मध्ये देखील दिसत आहे.
युट्युब वर या व्हिडिओ सोबत टायटल मध्ये लिहले गेले आहे, अम्बेडकर जयंती सोलापुर 2020 जयंती एट होम 2017 असे फ्लॅश होत असल्याचे दिसते.
व्हायरल छायाचित्राबद्दल अधिक माहिती साठी आम्ही सोलापूर च्या सदर बाजार च्या पोलीस स्टेशन चे इन्चार्ज सिनिअर इन्स्पेक्टर कमलाकर वसंत पाटिल यांना संपर्क केला. त्यांनी आम्हाला सांगितले कि व्हायरल छायाचित्र हे जुने आहे कारण कोरोनाव्हायरस चा प्रादुर्भाव असल्यामुळे, या वर्षी आंबेडकर जयंती साजरा केली गेली नाही.
पण मागील वर्षी बऱ्याच ठिकाणी कोरोनाव्हायरस च्या गाईडलाईन्स च्या उल्लंघन च्या बातम्या समोर आल्या होत्या, पण व्हायरल छायाचित्र हे या वर्षीचे नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आम्ही ट्विटर वर हि पोस्ट शेअर करणारे यूजर, Shahin Patel यांच्या प्रोफाइल चा तपास केला. त्यात आम्हाला कळले कि शाहीन हे इंजिनिअर आहे त्यांच्या ट्विटर अकाउंट ला ८३१ लोकं फॉलो करतात.
निष्कर्ष: आमच्या तपासात हे स्पष्ट झाले कि व्हायरल होत असलेले छायाचित्र हे २०१७ मध्ये सोलापूर मध्ये झालेल्या आंबेडकर जयंती उत्सवाचे आहे. त्या छायाचित्राचा कोरोना सोबत काहीच संबंध नाही.
- Claim Review : सोलापूर मध्ये आंबेडकर जयंती सेलेब्रेशन
- Claimed By : Shahin Patel
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.