Fact Check: महेंद्र सिंह धोनी यांचे जुने छायाचित्र शेतकरी आंदोलनासोबत जोडून केले जात आहे व्हायरल

विश्वास न्यूज च्या तपासात कळले कि हे छायाचित्र जुने आहे. या छायाचित्राचा शेतकरी आंदोलनासोबत किंवा ट्रॅक्टर रॅली सोबत काहीच संबंध नाही.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): शेतकरी आंदोलनं विविध नवीन वळण घेत असताना, पूर्व भारतीय क्रिकेट कप्तान महेंद्र सिंह धोनी यांचे एक ट्रॅक्टर सोबतचे छायाचित्र आता सोशल मीडिया वर व्हायरल होत आहे. दावा करण्यात येत आहे कि २६ जानेवारी रोजी प्रस्तावित शेतकरी ट्रॅक्टर रॅली चे समर्थन करत आहेत.

विश्वास न्यूज च्या तपासात हे छायाचित्र जुने असल्याचे समजले, या छायाचित्राचा, शेतकरी आंदोलनासोबत काहीच संबंध नाही.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर रवी राज पासवान ने व्हायरल छायाचित्र पोस्ट केले अनि दावा केला: ‘पुर्व कप्तान महेंद्र सिंह धोनी ने किया किसान टैक्टर परेड का समर्थन अब अनपढ़ अंधभक्त धोनी को भी हिन्दू विरोधी घोषित कर देंगे।’

या फेसबुक पोस्ट चे आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
विश्वास न्यूज ने व्हायरल होत असलेले छायाचित्र गूगल रिव्हर्स इमेज टूल मध्ये अपलोड करून सर्च केले. आम्हाला हे छायाचित्र दैनिक जागरण च्या बातमीत मिळाले ज्याला ३ जून २०२० रोजी प्रकाशित केले गेले होते. बातमी प्रमाणे, “MS Dhoni शेतात शेती करण्यास वेळ घालवत आहे आणि त्यासाठी त्यांनी Mahindra Swaraj ट्रॅक्टर खरेदी केले.”

आम्हाला हे छायाचित्र इतर बातम्यांमध्ये देखील मिळाले. सगळ्याच बातम्यांप्रमाणे छायाचित्र तेव्हाचे आहे जेव्हा, महेंद्र सिंह धोनी यांनी रांची मध्ये असलेल्या त्यांच्या शेतात ट्रॅक्टर खरेदी केले होते.

आता आम्ही कीवर्डस वापरून इंटरनेट वर हि बातमी शोधण्याचा प्रयत्न केला, कि धोनी यांनी खरंच शेतकरी आंदोलनाचे किंवा ट्रॅक्टर रॅली चे समर्थन केले का. आम्हाला अशी कुठलीच बातमी मिळाली नाही. जर का धोनी ने परेड चे समर्थन केले असते त हि एक खूप मोठी बातमी असती.

आम्ही या बाबतीत अधिक जाणून घेण्याकरिता महेंद्र सिंह धोनी चे ब्रँड मॅनेजर मिहीर दिवाकर यांच्या सोबत संपर्क केला, त्यांनी आमच्या सोबत फोन वर बोलताना सांगितले कि हे छायाचित्र जून २०२० चे आहे ज्याला आता चुकीच्या दाव्यासह व्हायरल करण्यात येत आहे.

शेवटी आम्ही त्या फेसबुक यूजर च्या प्रोफाइल चे सोशल स्कॅनिंग केले त्याने कि पोस्ट शेतकरी आंदोलनासोबत जोडून व्हायरल केली होती. आम्हाला त्यात कळले कि, रवी राज पासवान यांना, १,८७२ लोकं फोलो करतात. ते बिहार च्या पटना चे रहिवासी आहेत.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात कळले कि हे छायाचित्र जुने आहे. या छायाचित्राचा शेतकरी आंदोलनासोबत किंवा ट्रॅक्टर रॅली सोबत काहीच संबंध नाही.

False
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट