विश्वास न्यूजच्या तपासात व्हायरल झालेली पोस्ट दिशाभूल करणारी असल्याचे सिद्ध झाले. पेशावर बॉम्बस्फोटाच्या नावाने सध्या जो फोटो व्हायरल होत आहे तो 2004 मध्ये कराचीमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाचा आहे.
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): मार्चच्या सुरुवातीला पाकिस्तानातील पेशावर येथील शिया मशिदीत शुक्रवारच्या प्रार्थनेदरम्यान बॉम्बस्फोट झाल्यानंतर एक जुने छायाचित्रे आणि असे बरेच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता हे चित्र पेशावरमधील बॉम्बस्फोटाचे असल्याचा दावा करून दिशाभूल करणारे छायाचित्र व्हायरल केले जात आहे. विश्वास न्यूजने व्हायरल झालेल्या पोस्टचा तपास केला. पेशावर बॉम्बस्फोटाच्या नावाने व्हायरल होत असलेले चित्र खूप जुने असल्याचे आढळून आले. पेशावरच्या नावाने 2004 मध्ये मशिदीत झालेल्या बॉम्बस्फोटाचे हे चित्र लोक व्हायरल करत आहेत. विश्वास न्यूजच्या तपासात ही व्हायरल पोस्ट दिशाभूल करणारी असल्याचे सिद्ध झाले आहे.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर मोहम्मद बिन नइम ने 4 मार्च रोजी एक चित्र पोस्ट केले आणि दावा केला: ‘Atleast 30 People killed and more than 50 injured in a bomb explosion during Friday prayers at mosque in Peshawar, Pakistan.’
फेसबुक पोस्ट चा कन्टेन्ट इथे जसाच्या तसा दिला गेला आहे. ह्याचा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा. अशीच मिळती जुळती पोस्ट बाकी यूजर्स देखील पोस्ट करत आहे.
तपास:
विश्वास न्यूजने गुगल रिव्हर्स इमेज टूलच्या मदतीने तपास सुरू केला. प्रथम या टूलवर व्हायरल चित्र अपलोड करून शोध सुरू केला. आम्हाला एनबीसी न्यूज वेबसाइटवर व्हायरल प्रतिमा आढळली. 7 मे 2004 रोजी अपलोड केलेल्या एका बातमीत ही प्रतिमा वापरून, पाकिस्तानातील कराची येथील मशिदीत झालेल्या बॉम्बस्फोटात 14 लोक ठार आणि 200 हून अधिक जखमी झाल्याची नोंद केली होती. येथे पूर्ण बातमी वाचा. त्यावेळी पाकिस्तानचे अध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ होते. फोटोचा स्रोत सांगतो की तो आमिर कुरेशीने AFP-Getty Images साठी घेतला होता.
गुगल सर्च करताना आम्हाला Jagran.com वर एक बातमी सापडली. पाकिस्तानातील पेशावर येथील शिया मशिदीत शुक्रवारच्या प्रार्थनेदरम्यान झालेल्या भीषण आत्मघातकी बॉम्बस्फोटात 57 लोक ठार आणि 200 हून अधिक जखमी झाले. पंतप्रधान इम्रान खान यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या हल्ल्याचा निषेध करत अमेरिकेने पीडितांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. एका बचाव अधिकाऱ्याने डॉनला सांगितले की, पाकिस्तानच्या उत्तर-पश्चिम शहरातील किस्सा ख्वानी बाजार येथील जामिया मशीद बॉम्बस्फोटादरम्यान खचाखच भरलेली होती, असे डॉन वृत्तपत्राने वृत्त दिले आहे. येथे पूर्ण बातमी वाचा.
तपास सुरू ठेवत विश्वास न्यूजने पाकिस्तान 92 चे पत्रकार आरिफ महमूद यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सांगितले की, व्हायरल झालेला फोटो जुना आहे. त्याचा पेशावर मशिदीतील स्फोटाशी संबंध नाही.
तपासाअंती, विश्वास न्यूजने व्हायरल फेसबुक वापरकर्त्याचे जुने चित्र सध्याच्या स्फोटाशी जोडणारे सोशल स्कॅनिंग केले. फेसबुक यूजर मोहम्मद बिन नईम हा बांगलादेशातील ढाका येथे राहत असल्याची माहिती मिळाली.
निष्कर्ष: विश्वास न्यूजच्या तपासात व्हायरल झालेली पोस्ट दिशाभूल करणारी असल्याचे सिद्ध झाले. पेशावर बॉम्बस्फोटाच्या नावाने सध्या जो फोटो व्हायरल होत आहे तो 2004 मध्ये कराचीमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाचा आहे.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923