X
X

Fact Check: भाजप नेत्यांचे अटकेचे जुने छायाचित्र बिजापूर नक्सल हल्ल्यासोबत जोडून व्हायरल करण्यात येत आहे

विश्वास न्यूज च्या तपासात कळले कि बिजापूर नक्सल हल्ल्या संबंधी व्हायरल होत असलेला दावा खोटा आहे. जुन्या एका घटनेत भाजप नेत्याला झालेल्या अटकेला आता बिजापूर हल्ल्यासह जोडून व्हायरल करण्यात येत आहे. सोशल मीडिया यूजर्स जी न्यूज क्लिप शेअर करत आहेत ती देखील एडिटेड आहे. भाजप नेत्याला अटक केल्याची जुनी बातमी वेगळ्याने जोडून व्हायरल करण्यात येत आहे.

  • By: ameesh rai
  • Published: Apr 14, 2021 at 09:30 PM

विश्वास न्यूज (नवी दिल्ली): मागच्या काही दिवसांपूर्वी छत्तीसगढ च्या बिजापूर मध्ये नक्सल हल्ल्यासोबत जोडून एक दावा व्हायरल करण्यात येत आहे. सोशल मीडिया वर काही लोकं एक जुने वृत्तपत्राचे कात्रण शेअर करून दावा करत आहेत कि बिजापूर हल्ल्यानंतर नक्सलवाद्यांसह संबंधावरून नजप नेत्यासहित दोघं जणांना अटक केली. विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा खोटा ठरला. एका जुन्या घटनेत भाजप नेत्यांच्या अटकेला आता बिजापूर सोबत जोडून व्हायरल करण्यात येत आहे.

सोशल मीडिया यूजर्स जे वृत्तपत्राचे कात्रण शेअर करत आहेत ते देखील एडिटेड आहे. भाजप नेत्याच्या अटकेचे वृत्त वेगळ्याने एडिट करून लावले गेले आहे.

काय होत आहे व्हायरल?
विश्वास न्यूज ला आपल्या फैक्ट चेकिंग वॉट्सऐप चैटबॉट (+91 95992 99372) वर हा व्हायरल दावा फॅक्ट चेक करण्यास मिळाला. सोशल मीडिया यूजर्स एका वृत्तपत्राचे कात्रण शेअर करत आहेत. या न्यूज क्लिप च्या शीर्षक मध्ये बिजापूर हल्ल्यात २४ जवान शाहिद झाल्याचे म्हंटले गेले आहे. तसेच एका बॉक्स मध्ये भाजप नेत्यांसह दोन जणांना अटक झाली असे देखील म्हंटले गेले आहे. फेसबुक यूजर Harbhajan Singh Laddi ने ७ एप्रिल २०२१ रोजी हि व्हायरल पोस्ट शेअर करून लिहले: छत्तीसगढ़ नक्सली हमले में भाजपा के दो नेता जगत पुजारी और रमेश उसेंडी को गिरफ्तार किया गया है! पिछले दस वर्षो से नक्सलियों की मदद कर रहे थे!
या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
विश्वास न्यूज ने सगळ्यात आधी वृत्तपत्राचे कात्रण निरखून बघितले. याच्या डेटलाईन मध्ये नवभारत न्यूजपेपर चा उल्लेख आहे. गूगल वर ओपन सर्च टूल चा वापर करून आम्हाला कळले कि छत्तीसगढ़ च्या बीजापुर मध्ये बिजापूर मध्ये शनिवारी म्हणजे ३ एप्रिल २०२१ रोजी नक्सलवाद्यांनी सुरक्षाकर्म्यांवर हल्ला केला होता.

विश्वास न्यूज ने नवभारत न्यूज पेपर च्या वेबसाईट ला तपासले. आम्ही वेगवेगळ्या संस्करण चे नवभारत चे इ-पेपर तपासले. ५ एप्रिल २०२१ रोजी प्रकाशित नवभारत मुंबई एडिशन च्या पहिल्या पानावर आम्हाला व्हायरल न्यूजपेपर चे कात्रण मिळाले. पण आम्हाला सापडलेल्या वृत्तपत्राच्या कात्रणात भाजप नेत्याची बातमी नव्हती. तुम्ही व्हायरल आणि खऱ्या क्लिप मधला फरक इथे बघू शकता.

व्हायरल न्यूज क्लिप आणि खऱ्या न्यूज क्लिप मधला फरक इथे बघा.

विश्वास न्यूज च्या आतापर्यंतच्या तपासात हे स्पष्ट झाले होते कि नवभारत च्या खऱ्या बातमीत भाजप नेत्याच्या अटकेची बातमी वेगळ्याने जोडली गेली होती. या बातमीचा तपास अजून पुढे नेत आम्ही, डब्ब्यात दिलेल्या भाजप नेत्याच्या अटकेची बातमी, त्यात असलेले नावं (धनीराम पुजारी, जगत पुजारी, दंतेवाड़ा इत्यादी) ला गूगल वर सर्च केले. आम्हाला आमची सहयोगी वेबसाईट दैनिक जागरण च्या वेबसाईट वर 14 जून 2020 प्रकाशित एक रिपोर्ट मिळाली ज्यात सांगितले गेले आहे कि भाजप नेते जगत पुजारी यांच्यासह २ लोकांना नक्सल काँनेक्शन मध्ये अटक केली गेली आहे. या रिपोर्ट ला तुम्ही इथे क्लिक करून बघू शकता.

विश्वास न्यूज ने आपल्या तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही आमचे सहयोगी नयीदुनिया चे रायपूर चे एडिटर सतीश श्रीवास्तव यांना संपर्क केला. आम्ही त्यांच्या सोबत व्हायरल बातमी शेअर केली. त्यांनी देखील स्पष्ट केले कि बिजापूर हल्ल्यात नक्सलवाद्यांसह काँनेक्शन मध्ये अजूनपर्यंत भाजप नेत्यांना अटक झाली नाही.

विश्वास न्यूज ने व्हायरल न्यूज क्लिप शेअर करणाऱ्या फेसबुक यूजर Harbhajan Singh Laddi च्या प्रोफाइल ला स्कॅन केले, त्यात कळले कि यूजर ने आपले प्रोफाईल पब्लिक ठेवले नाही.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात कळले कि बिजापूर नक्सल हल्ल्या संबंधी व्हायरल होत असलेला दावा खोटा आहे. जुन्या एका घटनेत भाजप नेत्याला झालेल्या अटकेला आता बिजापूर हल्ल्यासह जोडून व्हायरल करण्यात येत आहे. सोशल मीडिया यूजर्स जी न्यूज क्लिप शेअर करत आहेत ती देखील एडिटेड आहे. भाजप नेत्याला अटक केल्याची जुनी बातमी वेगळ्याने जोडून व्हायरल करण्यात येत आहे.

  • Claim Review : भाजप नेत्याला बिजापूर नक्सल हल्ल्यात अटक
  • Claimed By : Harbhajan Singh Laddi
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later