X
X

Fact Check: छयाचित्रात दिसत असलेली वृद्ध महिला शाहीन बाग संपाच्या बिलकीस बानो नाही, व्हायरल दावा खोटा आहे

विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे समजले. शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ दिसत असलेली वृद्ध महिला शाहीन बाग च्या बिलकीस बानो नाही आहे.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): दिल्ली मध्ये चालू असलेल्या शेतकऱ्यांचे प्रदर्शन सुरू असताना, सोशल मीडिया वर व्हायरल बातम्यांचा पूर आला आहे. यात एक पोस्ट व्हायरल होत आहे ज्यात दोन वृद्ध महिला दिसतात. दावा केला जात आहे कि छायाचित्रात दिसत असलेली वृद्ध महिला ह्या शाहीन बाग वाल्या बिलकीस बानो आजी आहेत, ज्या आता शेतकऱ्यांच्या समर्थक बनल्या आहेत. विश्वास न्यूज ने या व्हायरल पोस्ट चा तपास केला. आमच्या तपासात हि पोस्ट खोटी असल्याचे समजले. शेतकऱ्यांचे समर्थन करणारी वृद्ध महिला ह्या शाहीन बाग च्या बिलकीस बानो नाही आहेत.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर Vikrant Yadav ने २७ नोव्हेंबर रोजी वृद्ध महिला चा एक कोलाज अपलोड केला आणि लिहले: “Dadi at Shaheen Bagh is now a Punjabi farmer. 😭😭😂😂🤣🤣”
या फेसबुक पोस्ट चे आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
हाच व्हायरल दावा बॉलीवूड अभिनेत्री कंगना रानोत यांनी पण शेअर केला आहे, या पोस्ट चे आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
छायाचित्राला निरखून बघितल्यावर विश्वास न्यूज ने आपल्या तपासाची सुरुवात केली. छायाचित्र ला गूगल रिव्हर्स इमेज मध्ये अपलोड केल्यानंतर आम्हाला व्हायरल छायाचित्र बऱ्याच बातम्यांसोबत वापरले गेले होते. पण कोणत्याच बातमी सोबत असे दिले गेले नव्हते कि त्या वृद्ध महिला शाहीन बाग वाल्या बिलकीस बानो आहेत. अमर उजाला ने हे छायाचित्र २७ नोव्हेंबर २०२० रोजी अपलोड केले आणि आपल्या हेडलाईन मध्ये लिहले: किसानों ने अवरोधक हटाकर दिल्ली किया कूच.

थोडे अजून सर्च केल्यावर आम्हाला शेतकरी समर्थक या वृद्ध महिलेचे छायाचित्र ऑक्टोबर २०२० ला केलेले मिळाले. १३ ऑक्टोबर २०२० ला हे छायाचित्र फेसबुक पेज, “Sant Baba Jarnail Singh Ji Khalsa Bhindrawale” ने शेअर केले आणि फेसबुक पेज मेरा गांव मेरा स्वाभिमान ने हे छायाचित्र १३ ऑक्टोबर रोजी आपल्या प्रोफाइल वर लावले होते.

आता आम्ही तपासाच्या पुढच्या टप्प्यात शाहीन बाग च्या बिलकीस बानो यांच्या सोबत संपर्क केला. आम्ही त्यांचे पुत्र मंजूर अहमद यांच्यासोबत संवाद साधला. त्यांनी आम्हाला सांगितले, “व्हायरल छायाचित्रात माझी आई (शाहीन बाग ची दादी) नाही आहे. लोकांनी माहिती नसताना माझ्या आई च्या नावाने छायाचित्र व्हायरल करत आहे. आम्ही शेतकऱ्यांसोबत आहे आणि लौकरच आंदोलनात सहभागी हू“.

विश्वास न्यूज च्या तपासात हे समोर आले कि व्हायरल छायाचित्रात शाहीन बाग च्या बिलकीस बानो नाही आहे.

या छायाचित्राला यूजर चुकीच्या दाव्यांची सोशल मीडिया वर व्हायरल करत आहे, त्यातलेच एक Vikrant Yadav हे फेसबुक यूजर. यूजर च्या प्रोफाइल प्रमाणे ते हरियाणा मधील गुरुग्राम चे रहिवासी आहेत.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे समजले. शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ दिसत असलेली वृद्ध महिला शाहीन बाग च्या बिलकीस बानो नाही आहे.

  • Claim Review : वृद्ध महिला ह्या शाहीन बाग वाल्या बिलकीस बानो यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनात भाग घेतला.
  • Claimed By : Vikrant Yadav
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later