Fact-Check: बांग्लादेश चा जुना व्हिडिओ आता बंगाल चा सांगून होत आहे व्हायरल
विश्वास न्यूज च्या तपासात हे समोर आले कि कलकत्ता चा सांगून व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ बांगलादेश चा आहे आणि ते देखील २०१७ चा.
- By: Ankita Deshkar
- Published: Jun 15, 2021 at 08:45 PM
- Updated: Jun 15, 2021 at 09:06 PM
विश्वास न्यूज (नवी दिल्ली): सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वर, आणि विशेषतः फेसबुक आणि व्हाट्सअँप वर एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे, जिथे मुसलमान लोकं एक रॅली काढताना बघितले जाऊ शकते. हा व्हिडिओ बऱ्याच प्लॅटफॉर्म वर व्हायरल होताना दिसत आहे. असा दावा करण्यात येत आहे कि, कलकत्ता मधील मुसलमान, ममता बॅनर्जी यांच्या आधारावर इतकी मोठी रॅली काढू शकले. विश्वास न्यूज च्या तपासात समजले कि हा व्हिडिओ बंगाल मधील नसून बांग्लादेश मांडला आहे आणि ते पण जवळपास चार वर्ष जुना. बांग्लादेश मधील मुसलमानांनी, रोहिंग्या मुसलमानांवर होत असलेल्या अत्याचारांच्या विरोधात हि रॅली काढली होती.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर Manjeet Pancholi यांनी हा व्हिडिओ आपल्या प्रोफाईल वर १४ जुन रोजी शेअर केला आणि लिहले: ममता की छांव में आज ये रेली कलकत्ता में निकली है। कल पुरे देश में निकलेंगी तब सिर्फ PM Shree Narendra Modi याद आयेंग ।
या पोस्ट ची लिंक आणि आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
विश्वास न्यूज ने आपल्या तपासाची सुरुवात या व्हिडिओ ला निरखून बघण्यापासून केली. आम्ही बऱ्याच वेळा हा व्हिडिओ चालवला आणि काही गोष्टी आमच्या लक्षात आल्या.
बंगाल च्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सारखा दिसणारा जो कट आऊट आहे तो खरे तर म्यानमार च्या नेता ऑंग सॅन स्यू कि यांचे आहे. झूम केल्यावर हे लक्षात येते.
अजून एक निरीक्षण म्हणजे बांग्लादेश चा राष्ट्रीय ध्वज या व्हिडिओ मध्ये स्पष्ट दिसतो.
तसेच विश्वास न्यूज च्या ध्यानात आलेले एक बोर्ड ज्यावर लिहले होते: ‘Stop! Brutal genocide on Rohingya Muslims.’
इतक्या निरीक्षणांवरून हे स्पष्ट झाले होते कि हा व्हिडिओ रोहिंग्या मुसलमानांवर होत असलेल्या अत्याचारांच्या विरोधातील आहे आणि तो पण बांग्लादेश चा. आता आम्ही काही कीवर्डस वापरून हा व्हिडिओ इंटरनेट वर शोधण्याचा प्रयत्न केला. आम्ही ‘Bangladesh protest rally against genocide on Rohingya Muslims’ हे कीवर्ड वापरले.
आम्हाला हाच व्हिडिओ युट्युब वर १३ सप्टेंबर २०१७ रोजी Spice InfoTube वर अपलोड केलेला दिसला. व्हिडिओ वर लिहले होते: Islami Andolon Bangladesh enclose myanmar Embassy.
आम्हाला ऊटलूक वर एक रिपोर्ट देखील प्रकाशित झालेली मिळाली. रिपोर्ट ८ सप्टेंबर २०१७ रोजी प्रकाशित झाली होती त्यावर लिहले होते, “Thousands of Bangladesh Muslims protest Rohingya killings”
हि रिपोर्ट इथे वाचा.
विश्वास न्यूज ने नंतर पश्चिम बंगाल चे दैनिक जागरण चे ब्युरो चीफ जे के वाजपेयी यांच्यासोबत संपर्क साधला, त्यांनी सांगितले कि हा व्हिडिओ बंगाल चा किंवा कलकत्त्याच्या नाही. मागील काही वर्षांपासून हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
या आधी देखील याच व्हिडिओ चा तपास विश्वास न्यूज ने केला होता. तो तुम्ही इथे वाचु शकता.
शेवटी विश्वास न्यूज ने त्या प्रोफाइल चा तपास केला, ज्याने फेसबुक वर हा व्हिडिओ शेअर केला. आम्हाला कळले कि मनजीत पांचोली हे लिव्हरपूल चे रहिवासी आहेत.
निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात हे समोर आले कि कलकत्ता चा सांगून व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ बांगलादेश चा आहे आणि ते देखील २०१७ चा.
- Claim Review : बंगाल मधील मोठी रॅली
- Claimed By : Manjeet Pancholi
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.