X
X

Fact-Check: कोरोनाव्हायरस पँडेमिक मध्ये नोकिया विद्यार्थ्यांना आणि वर्कर्सला २००० मोबाईल फोन नाही देत आहे

कोरोनाव्हायरस महामारी मध्ये नोकिया २००० फोन निःशुल्क वाटत नाही आहे, व्हायरल असलेली पोस्ट खोटी आहे.

नवी मुंबई (विश्वास न्यूज): सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे ज्यात दावा करण्यात येत आहे कि कोरोनाव्हायरस या महामारी मध्ये मोबाइल फोन बनवणारी कंपनी नोकिया, विद्यार्थ्यांना आणि कामगारांना २००० मोबाईल निःशुल्क देत आहे. विश्वास न्यूजच्या तपासात हा दावा खोटा आढळला. नोकिया कंपनी निःशुल्क मोबाइल फोन नाही वाटत आहे.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक पेज Nokia Smartphone 2020 ने एक पोस्ट शेअर केली, त्यात लिहले होते: Hi everyone, Nokia is ready to give away 2000 phones to people because of this pandemic period.
FREE PHONES FOR STUDENTS & WORKERS
TO WIN VIVO PHONE
Comment a lot of “t” to have a big chance to win!!
No Scammer Please Let’s Help!!
Then Come inbox! via “SEND MESSAGE” button bellow With the Screenshot!

अर्थात: नोकिया कंपनी कोरोनाव्हायरस महामारी मध्ये विद्यार्थ्यांना आणि कामगारांना २००० फोन द्यायला तयार आहे. विवो फोन जिंकण्यासाठी कंमेंट मध्ये खूप वेळा ‘t’ लिहा आणि जिंका. हा कुठलाही स्कॅम नाही. त्या नंतर इनबॉक्स मध्ये त्या टाईप केलेल्या t चा स्क्रीनशॉट पाठवा.

पोस्ट ची अर्काइव्ह लिंक इथे बघा.

तपास:
व्हायरल पोस्ट मध्ये यूजर ने ‘t’ लिहून त्याचा स्क्रीनशॉट टाकण्यास सांगितले आहे. पोस्ट च्या मागच सत्य जाण्यासाठी विश्वास न्यूज ने असे करून बघितले असता आमच्या कडे एक ऑटो रिप्लाय आला ज्यात आम्हाला हि पोस्ट १० फेसबुक पोस्ट ला शेअर करण्यात सांगण्यात आले.

आम्ही या ऑफर बद्दल नोकिया च्या ऑफिशिअल संकेतस्थळावर देखील शोध घेतला, पण आम्हाला या बाबतीत कुठलीही माहिती मिळाली नाही.

विश्वास न्यूज ने ई-मेल वरून नोकिया कंपनी सोबत संपर्क साधला, कंपनी तर्फे आम्हाला ई-मेलवरच ईत्तर मिळाले:
आम्ही सध्या असे कुठलेही प्रोमोशन सुरु केले नाही आहे. हि ऑफर खरी नाही. नोकिया च्या प्रोमोशनल ऑफर करता नोकियाच्या वेरिफाइड सोशल मीडिया अकाउंट वरच बघू शकता. किंवा आमच्या वेबसाईटच्या न्यूज सेकशन ला फोल्लो करा.

हि पोस्ट फेसबुक पेज Nokia Smartphone 2020 वर शेअर केली गेली आहे. या फेसबुक पेज ला स्कॅन केल्यावर आम्हाला असे कळले कि हा पेज २८ जून २०२० रोजीच बनवला गेला आहे.

निष्कर्ष: कोरोनाव्हायरस महामारी मध्ये नोकिया २००० फोन निःशुल्क वाटत नाही आहे, व्हायरल असलेली पोस्ट खोटी आहे.

  • Claim Review : Hi everyone, Nokia is ready to give away 2000 phones to people because of this pandemic period. FREE PHONES FOR STUDENTS & WORKERS TO WIN VIVO PHONE Comment a lot of
  • Claimed By : Nokia Smartphone 2020
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later