X
X

Fact Check: बुरखा घातलेल्या विद्यार्थिनींचे छायाचित्र केरळ च्या महिला पोलीस सांगून व्हायरल

विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल होत असलेला दावा खोटा ठरला. व्हायरल होत असलेल्या छायाचित्रात दिसत असलेल्या महिला या विद्यार्थिनी आहेत पोलीस कर्मी नाही. हे छायाचित्र २०१७ साली केरळ च्या कासरगोड जिल्ह्यातील एका अरबी कॉलेज मध्ये घेतले होते.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर एक छायाचित्र व्हायरल होत आहे, ज्यात एका पोलीस ऑफिसर च्या आजू-बाजूला बुरखा घातलेल्या बऱ्याच महिला दिसत आहेत. या फोटो ला शेअर करून लोकं दावा करत आहेत कि या छायाचित्रात केरळच्या महिला पोलीस आहेत. विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा खोटा असल्याचे समजले. व्हायरल छायाचित्रात दिसत असलेल्या बुरखा मधल्या महिला विद्यार्थिनी आहेत. हे छायाचित्र २०१७ मधले केरळ चे कासरगोड जिल्ह्यात घेतल्या गेले होते.

काय होत आहे व्हायरल?
सोशल मीडिया यूजर ‘Suresh Manji Fatak’ ने व्हायरल छायाचित्र शेअर करून लिहले, “चौंकिए मत यह फ़ोटो साउदी अरब का नहीं है बल्कि केरल कि महिला पुलिस का है। #सोतेरहोहिन्दूओं…!i
अर्थात: आश्चर्यचकित हू नका, हे साऊदी अरब चे छायाचित्र नाही, या केरळ च्या महिला पोलीस आहे.

आम्हाला हाच दावा विश्वास न्यूज च्या फॅक्ट चेकिंग व्हाट्सअँप चॅट बोट (+91 95992 99372) वर पण मिळाला.

या पोस्ट चे आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
छायाचित्राच्या तपासाच्या सुरुवातीला आम्ही हे छायाचित्र गूगल रिव्हर्स इमेज सर्च मध्ये अपलोड केले. आम्हाला २४ ऑक्टोबर २०१७ रोजी द न्यू इंडियन एक्सप्रेस च्या एका बातमीत हे छायाचित्र मिळाले. बातमी प्रमाणे, हे छायाचित्र कासरगोड जिल्ह्याचे पोलीस प्रमुख के जी साइमन यांनी विद्यार्थ्यांसोबत छायाचित्र काढले आहे. बातमी प्रमाणे छायाचित्रात दिसत असलेल्या महिला या कासरगोड जिल्ह्याचे एका अरबी कॉलेज च्या विद्यार्थिनी आहेत.

या विषयाची अजून पुष्टी करण्यासाठी आम्ही थेट, के जी साइमन या पोलीस अधिकाऱ्यांसोबत संपर्क केला. त्यांनी सांगितले कि हे छायाचित्र २०१७ चे आहे जेव्हा ते कासरगोड च्या एका शिक्षा संस्थान मध्ये आयोजित एका कार्यक्रमात अतिथी म्हणून गेले होते. तेव्हा त्यांनी विद्यार्थ्यांसोबत छायाचित्र काढले होते. त्यांनी सांगितले, “छायाचित्रात दिसत असलेल्या महिला या पोलीस कर्मी नाहीत, त्या विद्यार्थी आहेत. त्या विद्यार्थ्यांनी, स्थानीय वनिता पोलीस द्वारे आयोजित, ‘निर्भया’ या आत्मरक्षा कार्यशाळेत भाग घेतला होता.

या पोस्ट ला सोशल मीडियावर बऱ्याच लोकांनी शेअर केले आहे. यातील फेसबुक एक यूजर होते, Suresh Manji Fatak. या यूजर चे फेसबुक वर १,३५५ फॉलोवर्स आहेत. यूजर मुंबई चे रहिवासी आहेत.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल होत असलेला दावा खोटा ठरला. व्हायरल होत असलेल्या छायाचित्रात दिसत असलेल्या महिला या विद्यार्थिनी आहेत पोलीस कर्मी नाही. हे छायाचित्र २०१७ साली केरळ च्या कासरगोड जिल्ह्यातील एका अरबी कॉलेज मध्ये घेतले होते.

  • Claim Review : हे साऊदी अरब चे छायाचित्र नाही, या केरळ च्या महिला पोलीस आहे.
  • Claimed By : Suresh Manji Fatak
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later