X
X

Fact Check: मुंबई आणि पुण्यात नाही लागत आहे मिलिट्री लॉकडाउन, अफ़वाह होत आहे व्हायरल

निष्कर्ष: मुंबई आणि पुण्यात मिलिट्री लॉकडाउन लागणार नाही, हि फक्त एक अफ़वाह आहे.

नवी दिल्ली (विश्वास टीम) कोरोनाव्हायरस च्या संक्रमणापासून लोकांना वाचविण्याकरीत देशव्यापी लॉकडाउन जाहीर करण्यात आला. लॉकडाउन  मध्ये असताना देखील विविध मेसेज सोशल मीडिया वर व्हायरल होताना आपल्याला आढळतात. त्यातलाच एक जो नुकताच खूप लोकांपर्यंत पोहोचला त्यात असा दावा करण्यात आला आहे कि मुंबई आणि पुणे येत्या ३० मे पासून  मिलिट्री लॉकडाउन मध्ये राहणार आहे.
विश्वास न्यूज च्या तपासादरम्यान असे आढळेल कि हा दावा  फक्त एक अफ़वाह आहे. पुणे आणि मुंबई मध्ये  मिलिट्री लॉकडाउन जाहीर  केला गेला नाही.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर ‘Abhijeet Borade’ नि एक मेसेज प्रोफाइल वर शेअर केला (आर्काइव लिंक), ज्यात असे लिहले लिहले आहे, “Just received information

Entire Mumbai and pune will be under Military lockdown for 10 days starts from Saturday. So please stock everything. Groceries vegetables. City is going to hand over Army. Might Udhav thackeray releasing Control.
Only milk and medicine will be available…..please inform your Mumbai friends if one stays ……🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 Maharastra Govt meeting is going on and total shut down of mumbai is expected to be announced this at anytime. All stationed n living @ Mumbai n Pune .. Pls note..”

मराठी अनुवाद: आता मिळालेल्या माहिति प्रमाणे, संपूर्ण मुंबई आणि पुणे  शनिवार पासून दहा दिवसांकरता मिलिट्री लॉकडाउन मध्ये असेल. त्यामुळे सगळे आवश्यक वस्तू, किराणा आणि भाजी घरी घेऊन ठेवा. शहराला आर्मीकडे सोपवण्यात येणार आहे. उद्धव ठाकरे आपले या शहरांवरचे नियंत्रण सोडू शकतात. फक्त दूध आणि औषधं इतकेच लोकांना मिळतील. आपल्या सगळ्या मुंबईतील आप्तजनांना  सूचना द्या. महाराष्ट्र सरकारची बैठक चालू आहे आणि कुठल्याही क्षणी मुंबई बंद करण्याचे आदेश देण्यात येतील. मुंबई आणि पुणे येथे राहणाऱ्या सगळ्यांनी  नोंद घ्यावी.

तपास:
व्हायरल झालेला हा मेसेज खोटा आहे. पोलिसांनी या मेसेज चे खंडन केले आणि  स्पष्टीकरण दिले. मुंबई पोलिसांनी आपल्या अधिकृत ट्विटर हॅन्डल वरून हा व्हायरल होत असलेला मेसेज खोटा असल्याचे सांगितले आणि लोकांना त्याला फॉरवर्ड न करण्याचे आव्हान देखील केले.

https://twitter.com/MumbaiPolice/status/1265307696837742595


मुंबई पोलिसांप्रमाणे सगळ्या अत्यावश्यक  सुविधा चालू राहतील आणि लोकांना लॉकडाउन च्या नियमनांतर्गत फिरण्याची अनुमती असेल. या ट्विटर पोस्ट वर एका व्यक्तीने विचारले कि मुंबई च्या कर्फ्यू च्या वेळात काही बदल करण्यात आला आहे का? त्यावर मुंबई पोलिसांनी उत्तर दिले, ‘संध्याकाळी ८ पासून ते सकाळी ७ पर्यंत लोकांच्या बाहेर जाण्यावर निर्बंध लावण्यात आले आहे. याबद्दल अजून माहिती साठी अटैच  केलेले डॉक्युमेंट्स वाचावे’

https://twitter.com/MumbaiPolice/status/1265307696837742595?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1265308081031974914%7Ctwgr%5E&ref_url=https%3A%2F%2Fwww.vishvasnews.com%2Fpolitics%2Ffact-check-no-military-lock-down-is-going-to-be-announced-in-mumbai-and-pune-due-to-rising-numbers-of-corona-virus-infected-cases%2F

विश्वास न्यूजने व्हायरल होत असलेल्या मेसेज वरून मुंबई पोलीस चे प्रवक्ते यांच्यासोबत संपर्क साधला. प्रवक्ते आणि डेप्युटी कमिश्नर ऑफ पोलीस प्रणय अशोक यांनी म्हंटले, ‘मुंबई पोलीस तर्फे या व्हायरल मेसेज चे  खंडन आम्ही केले आहे, तसेच त्यावर स्पष्टीकरण देखील दिले आहे.’
म्हणजेच मुंबई आणि पुणे हे शहर सेनेकडे सोपविल्याचे दावे खोटे आहे आणि या मेसेज द्वारे अफ़वाह पसरवल्याचे दिसून येते.
संपूर्ण देशात २४ मार्च २०२० पासून लॉकडाउन घोषित केले गेले, त्यानंतर आता लॉकडाउन ३१ मे पर्यंत वाढविण्यात आले आहे. भारतात पहिला लॉकडाउन  चा टप्पा २५ मार्च ते १४ एप्रिल असा होता, दुसरा टप्पा १५ एप्रिल ते ३ मे, तिसरा ४ ते १७ मे आणि चौथा १८ मे ते ३१ मे असा आहे.
२७ मे सकाळी ८ वाजता स्वास्थ्य आणि परिवार कल्याण मंत्रालय कडून जाहीर केल्या प्रमाणे, महाराष्ट्रात कोरोनाव्हायरस चे एकूण ५४,७५४ रुग्ण आहेत, त्यातल्या बऱ्या झालेल्यांची संख्या १६,९५४ आहे आणि आतापर्यंत १७९२ लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
पोस्ट शेअर केलेला व्यक्ती नागपूर चा रहिवासी आहे.

निष्कर्ष: निष्कर्ष: मुंबई आणि पुण्यात मिलिट्री लॉकडाउन लागणार नाही, हि फक्त एक अफ़वाह आहे.

  • Claim Review : Entire Mumbai and pune will be under Military lockdown for 10 days starts from Saturday. So please stock everything. Groceries vegetables.
  • Claimed By : Abhijeet Borade
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later