X
X

Fact Check: न्यू यॉर्क टाइम्स ने भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्यावर हे आर्टिकल लिहले नाही

न्यू यॉर्क टाइम्स च्या एडिटर ने पीएम नरेंद्र मोदी ह्यांची तारीफ करणारे आर्टिकल लिहले नाही, व्हायरल दावा खोटा आहे.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): विश्वास न्यूज ला एक पोस्ट मराठी मध्ये व्हायरल होताना दिसली, ज्यात दावा करण्यात येत होता कि जोसेफ हॉप ह्यांनी एक संपादकीय भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्यावर लिहले, ज्याचा मराठी मध्ये अनुवाद करण्यात आला आहे. ‘मोदी कोण आहेत?’ असे ह्या न्यू यॉर्क टाइम्स मधील आर्टिकल चे शीर्षक आहे असे सांगण्यात येत आहे. विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा खोटा असल्याचे समोर आले.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर Hemant Sahasrabuddhe ह्यांनी 7 ऑगस्ट रोजी पीएम मोदी ह्यांचे एक छायाचित्र अपलोड केले आणि मराठी मध्ये एक मोठी पोस्ट लिहली आहे. ते असा दावा करत आहेत कि हि पोस्ट न्यू यॉर्क टाइम्स मध्ये मोदी ह्यांच्यावर प्रकाशित झालेल्या संपादकीय चे मराठी भाषांतर आहे. पोस्ट मध्ये लिहले आहे:

या व्यक्तीचा उदय जगासाठी धोका आहे,
कारण, त्याने केवळ भारताच्या स्वार्थासाठी
एकमेकांना शत्रू बनवले नाही.. तर
त्याचा उपयोगही केला आहे.
यात केवळ भारताला एक महान देश बनवण्याचा स्वार्थ दिसतो.
या व्यक्तीला ,भारताला सर्वोच्च बनवण्याचे एकमेव ध्येय आहे.
जर या व्यक्तीला थांबवले नाही,
तर भविष्यात असे होईल.. की
एक दिवस जेव्हा संपूर्ण जगात
भारत एक शक्तीशाली राष्ट्र बनेल आणि तेव्हा तो अमेरिकेलाही भारी पडेल.

संपूर्ण पोस्ट आणि त्याचा आर्काइव्ह व्हर्जन तुम्ही इथे बघू शकता.

तपास:
विश्वास न्यूज ने आपल्या तपासाची सुरुवात सध्या गूगल सर्च पासून केली. आम्ही काही कीवर्डस चा वापर करून ह्या आर्टिकल बद्दल काही माहिती मिळते का ते शोधण्याचा प्रयत्न केला. आम्ही न्यू यॉर्क टाइम्स मध्ये मोदी ह्यांच्यावर आलेले लेख शोधण्यास सुरुवात केली.
आम्ही न्यू यॉर्क टाइम्स च्या त्या सेक्शन मध्ये पोहोचलो, जिथे फक्त मोदी ह्यांच्यावर लिहलेले आर्टिकल दिसत होते. पण आम्हाला त्यात व्हायरल होत असलेल्या आर्टिकल सारखे कुठलेच आर्टिकल मिळाले नाही.

त्यानंतर आम्ही न्यू यॉर्क टाइम्स चा एडिटोरिअल सेक्शन चेक केला, आम्हाला त्यात पण व्हायरल आर्टिकल सारखे आर्टिकल नाही मिळाले.

आम्ही त्यानंतर न्यू यॉर्क टाइम्स कंपनी चा ‘Our People‘ पेज चेक केला. आम्हाला त्या पूर्ण पेज वर जोसेफ हॉप नावाचा रिपोर्टर मिळाला नाही.

त्यानंतर आम्ही न्यू यॉर्क टाइम्स चे एडिटर कोण आहेत हे जाणून घेतले. आम्हाला कळले कि डीन बँक्वेट (Dean Baquet) हे न्यू यॉर्क टाइम्स चे एडिटर आहे.

वेबसाईट वर दिले गेले होते कि, “Dean Baquet हे न्यू यॉर्क टाइम्स चे एक्सिक्युटीव्ह एडिटर आहेत आणि ते मे 2014 पासून हे काम बघतात.

आम्ही त्यानंतर हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला कि Joseph Hope नावाचा कुठला पत्रकार आहे का. आम्हाला कळले कि आशिया टाइम्स मध्ये Joseph Hope नावाचे स्वतंत्र रिसरर्चर आहे.

पण त्यांचे आर्टिकल देखील व्हायरल आर्टिकल सोबत मिळते जुळते नाही आहे. आता हे स्पष्ट झाले होते कि कुठलेच आर्टिकल Joseph Hope ह्यांनी न्यू यॉर्क टाइम्स मध्ये लिहले नाही.

विश्वास न्यूज ने त्यानंतर न्यू यॉर्क टाइम्स ला संपर्क केला. न्यू यॉर्क टाइम्स च्या स्पोक्सपर्सन Nicole Taylor ह्यांनी सांगितले कि NYT मध्ये John Hopps किंवा Joseph Hope नावाचा कुठलाच व्यक्ती नाही. हा मेसेज खोटा आणि बनावटी आहे. न्यू यॉर्क टाइम्स चे एडिटर Dean Baquet आहेत.

विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट शेअर करणाऱ्या फेसबुक यूजर चा तपास केला. Hemant Sahasrabuddhe पुण्याचे रहिवासी आहेत.

निष्कर्ष: न्यू यॉर्क टाइम्स च्या एडिटर ने पीएम नरेंद्र मोदी ह्यांची तारीफ करणारे आर्टिकल लिहले नाही, व्हायरल दावा खोटा आहे.

  • Claim Review : न्यू यॉर्क टाइम्स ने भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्यावर हे आर्टिकल लिहले
  • Claimed By : Hemant Sahasrabuddhe
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later