Fact Check: नेटफ्लिक्स नाही देत आहे कोविड-19 मुळे वर्षभराचा फ्री सब्स्क्रिप्शन, व्हायरल पोस्ट खोटी आहे

कोविड-19 मुळे नेटफ्लिक्स नाही देत आहे एक वर्षाचं फ्री सब्स्क्रिप्शन. व्हायरल मेसेज खोटा आहे.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर एक पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दावा आहे कि कोरोनाव्हायरस पँडेमिक मध्ये, नेटफ्लिक्स एक वर्षाचा फ्री सब्स्क्रिप्शन देत आहे. विश्वास न्यूज च्या तपासात हि पोस्ट खोटी असल्याचे समजले. या पोस्ट सोबत देण्यात आलेली लिंक हि एक फिशींग स्कॅम चा भाग आहे.

काय होत आहे व्हायरल?
विश्वास न्यूज ला आपल्या व्हाट्सअँप चॅट-बोट नंबर 9599299372 या नंबर वर देखील हा दावा फॅक्ट-चेक करण्यासाठी आमच्या यूजर्स ने पाठवला. पोस्ट मध्ये इंग्रजी मध्ये लिहण्यात आले, ज्याचा मराठी अनुवाद आहे – संपूर्ण जगात कॉरोन महामारी मुळे आयसोलेशन च्या या काळात नेटफ्लिक्स आपल्या प्लॅटफॉर्म चा फुकट वापर करण्याची एक संधी देत आहे. ऑफर संपायच्या आधी या लिंक वर क्लीक करा.
या पोस्ट सोबत एक लिंक देखील देण्यात आली होती.

तपास:
विश्वास न्यूज ने सगळ्यात आधी नेटफ्लिक ची वेबसाईट आणि सोशल मीडिया अकाउंट्स तपासले, पण आम्हाला असा कुठलाच ऑफर त्यांच्या वेबसाईट किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर दिसला नाही. जर नेटफ्लिक्स नि असा कुठला ऑफर काढला असता त त्याचा उल्लेख त्यांच्या वेबसाईट वर नक्की केला असता.

या नंतर आम्ही व्हायरल पोस्ट सोबत उल्लेख करण्यात आलेल्या लिंक वर क्लीक केले पण आम्हाला हि वेबसाईट सुरक्षित नसल्याचा मेसेज मिळाला.

आम्ही तरी हि वेबसाईट चेक केली, आम्हाला त्यांच्या होमपेज वर एक मेसेज मिळाला, ज्याचा नेटफ्लिक्स सोबत काहीच संबंध नव्हता. या मेसेज मध्ये लिहले होते कि तुम्ही व्हाट्सअँप वर आपले आवडते रंग बदलू शकता.
नेटफ्लिक्स ची खरी वेबसाईट हि आहे, व्हायरल मेसेज सोबत दिलेली लिंक हि खऱ्या वेबसाईट ची नाही आहे.
आम्ही चॅट च्या माध्यमांनी नेटफ्लिक्स सोबत संपर्क केला. आमचे बोलणे कस्टमर सर्व्हिस डिपार्टमेंट चे रेजिन यांच्यासोबत झाले. त्यांनी सांगितले कि व्हायरल होत असलेला मेसेज खोटा आहे. व्हायरल मेसेज सोबत देण्यात आलेली लिंक हि अधिकृत वेबसाईट ची लिंक नाही आहे. नेटफ्लिक्स सध्या एक वर्षाचा फ्री सब्स्क्रिप्शन नाही देत आहे.

निष्कर्ष: कोविड-19 मुळे नेटफ्लिक्स नाही देत आहे एक वर्षाचं फ्री सब्स्क्रिप्शन. व्हायरल मेसेज खोटा आहे.

False
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट