वाराणसी च्या नावावर व्हायरल होत असलेली नंदी ची प्रतिमा, वाई मधील काशी विश्वेश्वर मंदिरातील आहे.
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): ज्ञानवापी मस्जिदीच्या तणावात, एक कोलाज व्हायरल होत आहे, ह्यात दोन चित्र दिसतात, एका चित्रात नंदी चे छायाचित्र आहे तसेच दुसऱ्या मध्ये मस्जिद आहे. असा दावा करण्यात येत होता कि हा नंदी वाराणसी मध्ये ज्ञानवापी मस्जिद समोरचा आहे.
विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे लक्षात आले. व्हायरल चित्रात असलेले नंदी चे चित्र हे सातारामधील वाई मधल्या विश्वेश्वराच्या मंदिरातले आहे.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर Raja Chandra ने 16 मे रोजी कोलाज पोस्ट करून लिहले: Time To Celebrate!!
Jai Bholenath!!
Jai Hindu Rashtra!!
त्या कोलाज वर लिहले होते: नंदी ची प्रतीक्षा संपली
हि पोस्ट आणि त्याचा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
विश्वास न्यूज ने तपासाची सुरुवात नंदी च्या चित्राला क्रॉप करून वेगळे करून केले.
नंतर त्या चित्रावर आम्ही रिव्हर्स इमेज चा प्रोयोग केला. आम्हाला हे चित्र आलेमी स्टॉक इमेजस वेबसाईट वरती सापडले. त्यातील कॅप्शन मध्ये लिहले होते: Nandi Bull statue in Kashi Vishweshwar temple at Wai, Satara, Maharashtra.
त्यातून हे स्पष्ट झाले कि हे चित्र वाई च्या मंदिरातील आहे.
आम्हाला एका दुसऱ्या अँगल नि घेतलेले हे चित्र tripadvisor वेबसाईट वर सापडले.
आम्हाला आलेमी स्टॉक इमेजस वेबसाईट अजून एक चित्र सापडले जे वाई चे होते. कॅप्शन मध्ये लिहले होते: Nandi statue, Lord Shiva temple, Wai, Satara, Maharashtra, India
तपासाच्या पुढील टप्प्यात विश्वास न्यूज ने केदार गोखले ह्यांना संपर्क केला, गोखले ह्यांच्या परिवारातील लोक ट्रस्टी म्हणून मंदिराची देखरेख करण्यात सहभागी असतात. आम्ही हे चित्र त्यांना पाठवले, गोखले ह्यांनी सांगितले कि नंदी चे चित्र वाई मधील काशी विश्वेश्वर मंदिरातील आहे.
हे स्पष्ट झाले कि हि नंदी ची प्रतिमा वाई मधील आहे वाराणसी मधील नाही.
तपासाच्या शेवटच्या टप्प्यात, विश्वास न्यूज ने फेसबुक यूजर ज्याने हि पोस्ट शेअर केली त्याचा तपास केला. Raja Chandra हे रायचूर चे रहिवासी आहे आणि त्यांना १०७८ लोकं फॉलो करतात.
निष्कर्ष: वाराणसी च्या नावावर व्हायरल होत असलेली नंदी ची प्रतिमा, वाई मधील काशी विश्वेश्वर मंदिरातील आहे.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923