X
X

Fact Check: लखनऊ चे नाव बदलून लक्ष्मणपूर नाही ठेवले, व्हायरल दावा खोटा आहे

विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा खोटा असल्याचे ठरले. पण हे खरे आहे कि लखनऊ मध्ये १५१ फुटाचे भव्य लक्ष्मणाची मूर्ती बनवण्यात येणार आहे, पण हि स्टोरी पब्लिश करण्यात येत पर्यंत, लखनऊ चे नाव बदलण्याची घोषणा केली गेली नव्हती.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर व्हायरल होत असलेल्या एका पोस्ट मध्ये सांगण्यात येत आहे कि लखनऊ चे नाव बदलून लक्ष्मणपूर करण्यात आले आहे.

विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा खोटा असल्याचे समजले. हे खरे आहे कि लखनऊ मध्ये १५१ फूट उंच भगवान श्री राम यांचे लहान भाऊ लक्ष्मण यांची मूर्ती बनणार आहे, पण लखनऊ चे नाव बदलले जात असल्याची बातमी हि रिपोर्ट पब्लिश होत पर्यंततरी आम्हाला मिळाली नाही.

काय होत आहे व्हायरल?
व्हायरल पोस्ट मध्ये लिहले आहे, “लखनऊ का नाम अब होगा लक्ष्मणपुर। 151 फ़ीट ऊंची लक्षण जी की मूर्ती भी लगेगी। योगी जी धीरे धीरे।”
या व्हायरल पोस्ट च्या आर्काइव्ह लिंक ला इथे, इथे आणि इथे बघा.

तपास:
आम्ही या पोस्ट च्या तपासाची सुरुवात कीवर्ड सर्च पासून केली. जागरण डॉट कॉम आणि हिंदुस्थान टाइम्स वर प्रकाशित बातम्यांप्रमाणे, “भगवान श्री राम यांचे छोटे भाऊ लक्ष्मण यांची १५१ फूट उंच प्रतिमा राज्याची राजधानी लखनऊ येथे स्थापित काण्यात येईल. हा निर्णय शहराच्या महानगर पालिकेने २४ मार्च रोजी एका बैठकी दरम्यान घेतला होता.

आम्हाला अशी कोणती बातमी मिळाली नाही, अधिकृत रित्या लखनऊ चे नाव बदलण्याबद्दल कुठलीच घोषणा केली गेली नाही.

या बद्दल अधिक माहिती साठी आम्ही जागरण चे उत्तर प्रदेश चे एडिटर आशुतोष शुक्ला यांना संपर्क केला. त्यांनी आम्हाला सांगितले, “उत्तर प्रदेश ची राजधानी लखनऊ मध्ये भगवान राम यांचे भाऊ लक्ष्मण यांची मूर्ती उभारण्यात येणार आहे, हा निर्णय महापालिकेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत पारित केला गेला आहे, आणि त्याचे बजेट देखील आवंटीत केले आहे. पण लखनऊ चे नाव बदलण्याचा दावा चुकीचा आहे. सरकार ने सध्या असा कुठलाच निर्णय घेतला नाही, आणि घोषणा देखील केली नाही”.

आम्हाला अजून सर्च केल्यावर युपी चे पूर्व विधायक स्वर्गीय लाल जी टंडन यांचा एक २०१८ सालचा इंटरव्यू मिळाला ज्यात त्यांनी, राजधानीचे नाव लक्ष्मणपूर ठेवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पण अशी कुठलीच अधिकृत घोषणा नाही आहे.

पोस्ट शेअर करणाऱ्या यूजर Kedar Bhartiya यांचे सोशल स्कॅनिंग केले, त्यात कळले त्यांचे फेसबुक वर १,०४९ फॉलोवर्स आहे आणि ते छत्तीसगढ चे रहिवासी आहे.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा खोटा असल्याचे ठरले. पण हे खरे आहे कि लखनऊ मध्ये १५१ फुटाचे भव्य लक्ष्मणाची मूर्ती बनवण्यात येणार आहे, पण हि स्टोरी पब्लिश करण्यात येत पर्यंत, लखनऊ चे नाव बदलण्याची घोषणा केली गेली नव्हती.

  • Claim Review : लखनऊ चे नाव बदलून लक्ष्मणपूर केले
  • Claimed By : Kedar Bhartiya
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later