X
X

Fact check: अमृता फडणवीस ह्यांचे पुण्याच्या पाण्यानी भरलेल्या रस्त्यावरचे चित्र एडिटेड

विश्वास न्यूज च्या तपासात अमृता फडणवीस ह्यांचे व्हायरल चित्र एडिटेड असल्याचे समोर आले. त्यांनी पुण्याच्या पाणी भरलेल्या रस्त्यांवर चित्र काढले नाही.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): विश्वास न्यूज ला एक पोस्ट फेसबुक वर व्हायरल होत असल्याचे लक्षात आले. पोस्ट मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांच्या पत्नी अमृता फडणवीस दिसतात. पोस्ट मध्ये असा दावा करण्यात आला आहे कि पुण्यात झालेल्या पावसामुळे, रस्त्यांची, शहराची जी स्थिती झाली आहे त्या स्थिती सोबत अमृता फडणवीस ह्यांनी फोटो काढले आणि महाराष्ट्र शासनाला त्यांच्या कामाची पावती दिली. विश्वास न्यूज च्या तपासात हे व्हायरल चित्र एडिटेड असल्याचे लक्षात आले.
मुंबई मधील पाणी साचलेल्या रस्त्यांवर अमृता फडणवीस ह्यांनी २०२१ साली फोटो काढले होते. तेव्हाचे हे चित्र एडिट करून आता व्हायरल करण्यात येत आहे.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर, Eshan Chetan Tupe ह्यांनी हे एडिटेड चित्र पोस्ट केले आणि मराठीत लिहीले: सौ. अमृता देवेंद्र फडणवीस जी यांनी “तुंबलेल्या पुण्याचे शिल्पकार” श्री. देवेंद्र फडणवीस साहेब यांना त्यांच्या गलथान कारभाराची प्रतिमा दाखवली. सोबत भाजपच्या मागिल ५ वर्षाच्या कामांची पावती पुणेकरांसमोर ठेवली. 👊

धन्यवाद ताई,
एक सामान्य पुणेकर. #BJPFailsPMC

ह्या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:

विश्वास न्यूज ने आपल्या तपासाची सुरुवात ह्या पोस्ट ला निरखून बघण्यापासून केली. आम्हाला हे चित्र स्पष्टपणे एडिटड असल्याचे लक्षात आले. एक निळी रेष अमृता फडणवीस ह्यांच्या चित्रात दिसते.

आम्ही त्यानंतर पाणी साचलेल्या चित्रावर गूगल रिव्हर्स इमेज सर्च चा वापर केला.

पुरस्थितीतले खरे चित्र आम्हाला Puneri Guide ह्या ट्विटर अकाउंट १४ ऑक्टोबर रोजी शेअर केल्याचे सापडले. ह्याच्या कॅप्शन मध्ये लिहले होते: ‘Heavy rains in Pune; Roads turn into rivers #punerain #monsoon #pune’

आम्हाला पीआय न्यूजच्या वेबसाइटवरही आम्हाला ही छायाचित्रे सापडली. बातमीत सांगितल्या प्रमाणे: परतीच्या पावसाने राज्यभरातील धान्य अक्षरश: उडून गेले. पुण्यातही पावसाच्या पुनरागमनाने पुणेकरांची तारांबळ उडाली आहे. आतापर्यंत पावसामुळे मुंबईतील रस्ते पाण्यात बुडाल्याचे दिसत होते, मात्र आता अवघ्या दीड तासाच्या पावसाने पुण्याच्या रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले आहे.

ह्यानंतर आम्ही अमृता फडणवीस ह्यांच्या चित्रावर रिव्हर्स इमेज सर्च केले.

अमृता फडणवीस ह्यांनी खरे चित्र त्यांच्या ट्विटर हॅन्डल वर १६ जुलै, २०२१ रोजी पोस्ट केले होते. त्यांनी मुंबई मधील खड्डे असलेले रस्ते आणि पाणी साचलेले रस्ते ह्यासोबत फोटोशूट केले होते.

त्यासंबंधी आम्हाला एबीपी माझा च्या वेबसाईट वर देखील एक बातमी सापडली.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही भाजप चे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी ख्यांना संपर्क केला. त्यांनी सांगितले व्हायरल चित्र एडिटेड आहेत. अमृता फडणवीस ह्यांनी हे चित्र मुंबई च्या रस्त्यावर काढले होते. ते म्हणाले, “इशान चेतन तुपे हे राष्ट्रवादी काँग्रेस चे पुणे शहराचे सरचिटणीस आहेत. हे कृत्य त्यांनी भाजप आणि फडणवीस दाम्पत्याला बदनाम करण्यासाठी केले आहे. मी खोटी बातमी पसरवण्याचे जाहीर निषेध करतो,” असे ते म्हणाले.

तपासाच्या शेवटच्या टप्प्यात आम्ही फेसबुक यूजर Eshan Chetan Tupe ह्यांचे बॅकग्राउंड चेक केले. ते एनसीपी चे कार्यकर्ते आहेत आणि त्यांना 9,439 लोकं फॉलो करतात.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात अमृता फडणवीस ह्यांचे व्हायरल चित्र एडिटेड असल्याचे समोर आले. त्यांनी पुण्याच्या पाणी भरलेल्या रस्त्यांवर चित्र काढले नाही.

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later