X
X

Fact-check: सोशल मीडिया वर मोहन भागवत यांच्या नावाने व्हायरल झालेले वक्तव्य खोटे!

सदर चित्रात केलेला दावा खोटा आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी, “कोरोना नि माझी धर्माबद्दलची आस्था तोडली” असे वक्तव्य केले नाही.

  • By: Ankita Deshkar
  • Published: May 20, 2020 at 01:32 PM
  • Updated: May 20, 2020 at 11:27 PM

विश्वास न्यूज, नवी दिल्ली: नुकतेच एक वृत्तप्रत्राचं कात्रण सदृश व्हाट्सएप्प वर विविध ग्रुप्स वर शेअर करण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी, “कोरोना नि माझी धर्माबद्दलची आस्था तोडली” असे म्हंटल्याचा दावा त्या पोस्ट मध्ये केला आहे.

काय होतंय व्हायरल?

व्हाट्सएप्प वर विविध ग्रुप मध्ये एक वृत्तपत्राच्या कात्रणासारखे दिसणारे छायाचित्र व्हायरल होत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी, “कोरोना नि माझी धर्माबद्दलची आस्था तोडली” असे म्हंटल्याचा दावा त्या पोस्ट मध्ये केला आहे.
थोडक्यात छायाचित्रात काय लिहले आहे:
“कोरोना ने पूर्ण जगात कहर केला आहे. भारत देखील यातून वाचू शकला नाही. सगळ्या मंदिरांना कुलूप लागले आणि ज्यांची पूजा आपण दिवस रात्र करतो त्यांनी कुठला हि चमत्कार घडवून आणला नाही. पंतप्रधानांनी देखील टाळ्या वाजवायला सांगितले, दिवे देखील लावायला सांगितले पण त्याने हि काही झाले नाही. आज कोरोना रुग्णांची संख्या २५००० च्या वर आहे. फक्त डॉक्टर्स आणि नर्स हेच आपले रक्षण करत आहेत. या कोरोना महामारीने मला एक गोष्ट शिकवली, ती म्हणजे आपल्याला धार्मिक स्थळांची न्हवे तर शाळा आणि दवाखान्यांची गरज आहे. पुजाऱ्यांची नाही, तर वैज्ञानिक आणि डॉक्टरांची गरज आहे. माझी सगळ्या पुजाऱ्यांना विनंती आहे कि त्यांनी मंदिरे बंद ठेवावी आणि त्या ठिकाणी, शाळा, ग्रंथालय आणि दवाखाने बांधावे. त्यांनी मंदिरातले सोने आणि चांदी, गरजूंना आणि कोरोना सोबत लढणाऱ्यांना वाटावे. असे करणेच आपल्या राष्ट्राला सर्वोच्च बनवेल”
वरील वक्तव्य हे सरसंघचालक मोहन भागवत यांचे आहे असा दावा या चित्रात केला आहे.

तपास:

विश्वास न्यूज ला असे दिसले की एखाद्या वृत्तपत्रात दिलेल्या बातमी प्रमाणे या छायाचित्रातला मजकूर दिसून येतो, तसेच त्यात ‘एजन्सी’ या शब्दाचा उपयोग देखील केला गेला आहे. 
हे छायाचित्र व्हायरल होत असल्याचे लक्षात आल्यावर विश्वास न्यूज ने आधी कुठल्या वृत्तपत्रात किंवा छायाचित्रात सांगितल्या प्रमाणे कुठल्या न्यूज एजन्सी मध्ये ही बातमी आहे का याचा शोध घेतला. तसे कुठेही आढळले नाही.


नंतर विश्वास न्यूज ने हे वक्तव्य खरंच मोहन भागवत यांचे आहे का, हे तपासून बघीतले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सहप्रचार प्रमुख, नरेंदर कुमार, यांच्या सोबत संवाद साधला. त्यांनी असे स्पष्ट सांगितले कि आरएसएस चे सरसंघचालक मोहन भागवत यांनी असे कुठलेही वक्तव्य कुठेही केलेले नाही. त्यांनी असे देखील म्हंटले कि मुद्दाम हे चुकीचे भाष्य एका वृत्तपत्रात आल्या सारखे दिसावे म्हणून बनवण्यात आले आहे, जेणेकरून कोणाचाही सहज त्यावर विश्वास बसेल.

नरेंदर कुमार यांनी नुकतेच ट्विटर वर हे छायाचित्र आणि त्यात केलेले दावे खोटे असल्याचे देखील स्पष्टं केले.




निष्कर्ष: सदर चित्रात केलेला दावा खोटा आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी, “कोरोना नि माझी धर्माबद्दलची आस्था तोडली” असे वक्तव्य केले नाही.

  • Claim Review : खत्म हो गई आस्था : भागवत का हुआ हृदय परिवर्तन
  • Claimed By : Devendra Surjan
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later