निष्कर्ष: सोशल मीडिया वर वॅक्सीन घेतलेला नवरा हवा असा दावा करणारी मॅट्रिमोनिअल ऍड डिजिटली बनवली आहे. हि ऍड लोकांना वॅक्सीन घेण्यास प्रेरित करण्यास बनवली आहे. हि कुठल्याच वृत्तपात्रात प्रकाशित झाली नाही.
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सध्या सोशल मीडिया वर एक मॅट्रिमोनिअल ऍड खूप व्हायरल होत आहे ज्यात एक मुलगी वॅक्सीन घेतलेल्या नवऱ्याच्या शोधात आहे. हि मॅट्रिमोनिअल ऍड सगळ्याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर व्हायरल होत आहे. विश्वास न्यूज ने या ऍड चा तपास केला आणि त्यात कळले कि हि ऍड डिजिटल टूल्स चा वापर करून बनवण्यात आली आहे.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर RJ Meghna ने व्हायरल मॅट्रिमोनिअल ऍड चा स्क्रीनशॉट पोस्ट केला आणि त्यात लिहले: New age matrimonial ad😂 Covaxin walo ko kuchh hi countries mein entry allowed hai! Looks like bandi ne honeymoon tak plan kar rakha hai! Afterall M.Sc in Mathematics jo hai 😍
हि पोस्ट आणि त्याचा अर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
हि पोस्ट ट्विटर वर देखील बऱ्याच लोकांनी शेअर केली आहे.
शशी थरूर यांनी देखील हि पोस्ट ट्विटर वर शेअर केली.
तपास:
विश्वास न्यूज ने अगदी साधे निरीक्षण करून या तपासाची सुरुवात केली. हि मॅट्रिमोनिअल ऍड, कुठल्या बातमी सारखी दिसत होती, पण हे एक साधे निरीक्षण आहे कि मॅट्रिमोनिअल ऍड या प्रकारे वृत्तपत्रात देत नाही.
काही पोस्ट मध्ये हे देखील बघण्यात आले कि मास्टहेड मध्ये ‘Goa Tim’ असे लिहले होते.
आधी देखील विश्वास न्यूज ने एक तपास केला होता ज्यात एक डिजिटली बनवलेले कात्रण व्हायरल होत होते. आता व्हायरल होत असलेले कात्रण हे बरेच से त्या सारखेच दिसते.
विश्वास न्यूज ने काही कीवर्डस वापरून उर्वरित तपास केला, ‘newspaper clipping maker online’ हे कीवर्ड टाकल्यावर आम्हाला, एक वेबसाईट मिळाली ज्यात न्यूजपेपर क्लिपिंग बनवता येतात. या वेबसाईट वर दिसत असलेले न्यूजपेपर स्निपेट हे व्हायरल होत असलेल्या मॅट्रिमोनिअल ऍड सारखेच दिसत होते.
आता हे स्पष्ट झाले होते कि हि ऍड डिजिटल रित्या बनवण्यात आली होती.
थोडं अजून कीवर्ड सर्च केल्यावर आम्हाला एक फेसबुक पेज ‘Give India‘ वर हि मॅट्रिमोनिअल ऍड शेअर केलेली दिसली, या पोस्ट मध्ये दिले होते कि, ५८ वर्षीय सेवियो फिगुएरेडो ने भारतीयांना कोविड वॅक्सीन घेण्यास प्रेरित करण्यासाठी एक उत्तम पर्याय शोधून काढला आहे. त्यांनी एक मॅट्रिमोनिअल ऍड पोस्ट केली आहे ज्यात एक नवरी कोव्हीशील्ड वॅक्सीन घेतलेल्या नवर्याच्या शोधात आहे”.
विश्वास न्यूज ला या पोस्ट द्वारे कळले कि सगळ्यात आधी हि पोस्ट सेवियो फिगुएरेडो यांनी केली होती. आम्ही त्यांची फेसबुक प्रोफाइल तपासली आणि आम्हाला त्यात त्यांनी केलेली पोस्ट दिसली.
विश्वास न्यूज ने नंतर सेवियो फिगुएरेडो यांना फेसबुक मेसेंजर द्वारे संपर्क साधला.
विश्वास न्यूज सोबत बोलताना ते सेवियो फिगुएरेडो म्हणाले, “हि पोस्ट मी फेसबुक वर माझ्या मित्रांना वॅक्सीन घेण्यास प्रेरित करण्यासाठी बनवली होती कारण माझ्या एका खूपच जवळच्या मित्राला मी कोविड मुले प्राण गमावताना बघितले. हि पोस्ट व्हायरल होईल अशी माझी अजिबात अपेक्षा नव्हती”. त्यांनी असे देखील म्हंटले कि कोवॅक्सीन ला अजून WHO ने मान्यता दिलेली नसून ती लस घेतल्यास लोकांना परदेशी जाता येत नाही. म्हणून मुद्दाम कोव्हीशील्ड चा उल्लेख या ऍड मध्ये केला गेला, कारण गोवा मधील बरेच लोकं परदेशी किंवा बोट वर काम करतात आणि कोवॅक्सीन घेतले तर ते तिथे काम करू शकणार नाही. माझे मत कोवॅक्सीन च्या विरोधात अजिबात नाही”.
विश्वास न्यूज ने हि पोस्ट शेअर करणाऱ्या प्रोफाइल चे देखील बॅकग्राऊंड चेक केले, त्यात आम्हाला कळले कि RJ Megha हा एक अधिकृत फेसबुक पेज आहे. या पेज चे 164K फॉलोवर्स आहे.
निष्कर्ष: निष्कर्ष: सोशल मीडिया वर वॅक्सीन घेतलेला नवरा हवा असा दावा करणारी मॅट्रिमोनिअल ऍड डिजिटली बनवली आहे. हि ऍड लोकांना वॅक्सीन घेण्यास प्रेरित करण्यास बनवली आहे. हि कुठल्याच वृत्तपात्रात प्रकाशित झाली नाही.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923