Fact check: मलेशिया चा मोठा शिवलिंग, तामिळ नाडू च्या नावाने व्हायरल
एका मोठ्या शिवलिंगाचा व्हायरल होत असलेला व्हिडिओ तामिळ नाडू चा नसून मलेशिया मधील आहे. व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे.
- By: Ankita Deshkar
- Published: May 27, 2022 at 03:23 PM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): विश्वास न्यूज ला एक व्हिडिओ ट्विटर वर व्हायरल होत असल्याचे लक्षात आले. व्हिडिओ मध्ये एक मोठा शिवलिंग दिसतो ज्यावर पाणी पडत आहे. असा दावा केला जात आहे कि हि जागा, तामिळ नाडू मध्ये आहे. विश्वास न्यूज च्या तपासात हि जागा मलेशिया मध्ये असल्याचे समजले.
काय होत आहे व्हायरल?
ट्विटर यूजर lalchandlohana ने व्हिडिओ पोस्ट केला आणि मराठीत लिहले: तामीळनाडूमध्ये तारा राजमार्गावर ओशिवलींगम स्थान. ३६५ दिवस पिंडीवर फक्त पाउस पडतो.कोठून पडतो ते कळत नाही. आश्चर्यच आहे
हि पोस्ट आणि त्याचा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
विश्वास न्यूज ने व्हिडिओ इन्व्हिड टूल मध्ये अपलोड केला आणि बरेच स्क्रीनग्रेब्स मिळवले.
आम्ही त्यानंतर ह्या स्क्रीनग्रेब्स काढले आणि त्यांना रिव्हर्स इमेज सर्च च्या माध्यमाने शोधले.
आम्हाला हाच व्हिडिओ एका युट्युब चॅनेल वर सापडला ज्याचे नाव होते, ‘Sanatan Sanskriti‘. हा व्हिडिओ १९ मार्च, २०२१ रोजी अपलोड करण्यात आला होता आणि डिस्क्रिप्शन मध्ये लिहले होते, ‘Natural Shivlingam Continous water flows Shivan Temple Tamil Selnagor Malaysia‘.
आम्हाला युट्युब वर अजून एक व्हिडिओ सापडला, ज्यावर ह्या जागेबद्दल अजून माहिती दिली होती. त्या चॅनेल चे नाव होते SS Selva ikm.
हा व्हिडिओ २ एप्रिल, २०२२ रोजी पोस्ट करण्यात आला होता आणि माहिती म्हणून ह्या व्हिडिओ मध्ये लिहले होते, ‘Sivan Meditation Centre, Shivan Temple (Bentong Karak Old Road).‘
रिव्हर्स इमेज सर्च द्वारे आम्हाला एक फेसबुक पेज देखील सापडला, ज्याचे नाव होते, ‘Who want to visit Malaysian Hindu Temples?‘
ह्या पेज वर ह्या जागेचे अजून चित्र दिले गेले होते.
आम्ही ह्या पेज ला मेससेंजर द्वारे संपर्क केला. आम्हाला यूजर ने सांगितले कि हे मलेशिया मधील एक मंदिर आहे. त्यांनी आमच्या सोबत इथली लोकेशन देखील शेअर केली.
आम्हाला तपासाच्या वेळी अजून एक फेसबुक पेज सापडला ज्याचे नाव होते, ‘Karak Shivan temple – Pertubuhan Meditasi Shiva’.
ह्या फासिबूवक पेज वर देखील, ह्या जागेचे बरेच व्हिडिओ होते. पेज चा लोकेशन, कौला लंपूर, मलेशिया असा देण्यात आला होता.
आम्ही हा पेज हाताळणारे, Bavani Supramaniam ह्यांना व्हाट्सअँप द्वारे संपर्क केला. त्यांनी आम्हाला सांगितले कि व्हायरल व्हिडिओ मध्ये दिसत असलेली जागा हि मलेशिया मधील आहे, तामिळ नाडू ची नाही.
तपासाच्या शेवटच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने व्हायरल व्हिडिओ शेअर करणाऱ्या ट्विटर यूजर चा तपास केला. lalchandlohana ला 498 लोक फॉलो करतात, तसेच ते 3377 लोकांना फॉलो करतात.
निष्कर्ष: एका मोठ्या शिवलिंगाचा व्हायरल होत असलेला व्हिडिओ तामिळ नाडू चा नसून मलेशिया मधील आहे. व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे.
- Claim Review : तामीळनाडूमध्ये तारा राजमार्गावर ओशिवलींगम स्थान. ३६५ दिवस पिंडीवर फक्त पाउस पडतो.कोठून पडतो ते कळत नाही. आश्चर्यच आहे
- Claimed By : lalchandlohana
- Fact Check : Misleading
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.