X
X

Fact Check: द काश्मीर फाईल्स चित्रपटाच्या निर्मात्यांनी 200 कोटी रुपये पीएम फंड ला दिले नाही, व्हायरल दावा खोटा

विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल दावा खोटा असल्याचे समजले, द काश्मीर फाईल्स च्या निर्मात्याने दोन शे कोटी दान केले नाही, व्हायरल दावा खोटा आहे.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): विश्वास न्यूज ला एक पोस्ट सोशल मीडिया च्या विविध प्लॅटफॉर्म वर व्हायरल होत असलेली दिसली. ह्या पोस्ट मध्ये दावा करण्यात येत होता कि द काश्मीर फाईल्स चित्रपटाच्या निर्मात्यांनी, प्रधानमंत्री फंड मध्ये दोन शे कोटी रुपये दान दिले. विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा खोटा असल्याचे समजले.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर Keshav Arora ने एक चित्र आपल्या प्रोफाइल वर पोस्ट केले आणि लिहले: बधाई हो हिन्दूओ #प्रधानमंत्रीराहतकोष में #दाकश्मीरफाइल का पूरा संग्रह (कमाई) 200 करोड़ दान करने पर #विवेक_अग्निहोत्री को केशव अरोड़ा प्रदेश अध्यक्ष हिंदू युवा वाहिनी का सैल्यूट The_Kshmir_Files THE_KSHMIR_FILES

ह्या पोस्ट मध्ये द काश्मीर फाईल्स चे निर्माते, पंतप्रधान मोदी ह्यांच्याबरोबर चित्र होते.

हि पोस्ट आणि ह्याचा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:

विश्वास न्यूज ने आपल्या तपासाची सुरुवात ह्या छायाचित्रासोबत केली, आम्ही साधे गूगल रिव्हर्स इमेज चा वापर करून चित्र शोधले.

आम्हाला ANI digital डिजिटल वर हे चित्र सापडले.
ह्या ट्विट मध्ये कुठेच दोन शे कोटी चा उल्लेख केला नव्हता.

आम्हाला जागरण ची एक रिपोर्ट देखील सापडली, ज्यात सांगितले गेले होते कि द काश्मीर फाईल्स ने दोन शे कोटी चा टप्पा गाठला आणि, कोविड महामारी मध्ये इतके पैसे कमावणारे हेच एक चित्रपट आहे. पण ह्या रिपोर्ट मध्ये देखील कुठेच दोन शे कोटी दान केल्याचा उल्लेख करण्यात आलेला नाही.

आम्ही चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री ह्यांचे देखील सोशल मीडिया प्रोफाईल्स तपासले, तिथे देखील आम्हाला दोन शे कोटी दान केल्याचे उल्लेख आढळले नाही.

तपासाच्या शेवटच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने विवेक अग्निहोत्री ह्यांचे स्वीय सहाय्यक, अमित कटवाल ह्यांना संपर्क केला. त्यांनी व्हायरल दाव्याचे खंडन केले आणि सांगितले कि असे कुठलेच दान करण्यात आले नाही.

शेवटच्या टप्प्यात आम्ही फेसबुक यूजर ज्याने हि पोस्ट शेअर केली त्यांचा तपास, केशव अरोरा हे राजस्थान चे सोशल वर्कर, आहे आणि त्यांना 4,031 लोकं फॉलो करतात.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल दावा खोटा असल्याचे समजले, द काश्मीर फाईल्स च्या निर्मात्याने दोन शे कोटी दान केले नाही, व्हायरल दावा खोटा आहे.

  • Claim Review : द काश्मीर फाईल्स च्या निर्मात्यांनी २०० कोटी रुपये पीएम कोषाला दान केले
  • Claimed By : Keshav Arora
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later