विश्वास न्यूज च्या तपासात असे कळले कि ऍमेझॉन च्या नावावर व्हायरल होत असलेला मेसेज खोटा आणि क्लीकबेट आहे. याचा ऍमेझॉन सोबत काहीच संबंध नाही. एक्सपर्टस प्रमाणे, लिंक ओपन करणे धोक्याचे असू शकते.
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): व्हाट्सअँप वर एक मेसेज व्हायरल होत आहे, ज्याला ऍमेझॉन शॉपिंग वेबसाईट च्या नावावर व्हायरल करण्यात येत आहे. पोस्ट मध्ये दावा करण्यात येत आहे कि क्रिसमस प्रित्यर्थ ऍमेझॉन लोकांना एका छोट्याश्या सर्वे च्या बदल्यात मोबाईल पासून लॅपटॉप जिंकण्याची संधी देत आहे. या मजकुरासोबत एक लिंक देखील शेअर करण्यात येत आहे. विश्वास न्यूज च्या एका फॅक्ट चेकर ला हि लिंक व्हाट्सअँप वर तपासणी करता देखील मिळाली. विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा खोटा असल्याचे कळले.
काय होत आहे व्हायरल?
या मेसेज मध्ये एक लिंक आहे, ज्याला क्लीक केल्यावर एक वेबपेज उघडतो, ज्यावर लिहले होते: More than 100 units of computer and mobile equipment, as well as 50 cash prizes ranging from 50 to 5000 US dollars. All you have to do is open the correct gift box. You have 3 tries, good luck!
आम्हाला फेसबुक वर पण या प्रकारचे काही मेसेज मिळाले. Nibia Peraza नावाच्या फेसबुक पेज वर देखील हि लिंक शेअर करण्यात आली होती.
तपास:
विश्वास न्यूज ने सगळ्यात आधी पोस्ट मध्ये शेअर करण्यात आलेल्या लिंक वर क्लिक केले. लिंक वर क्लिक केल्यावर एक वेबपेज उघडला, ज्यावर लिहले होते: More than 100 units of computer and mobile equipment, as well as 50 cash prizes ranging from 50 to 5000 US dollars. All you have to do is open the correct gift box. You have 3 tries, good luck! Enter our quick survey and get your favorite gift on this Christmas!
या पेज चा युआरएल आम्हाला थोडा विचित्र वाटला.
ऍमेझॉन चा युआरएल https://www.qi-whatapp.top/index.php?app=christmas# नाही असू शकत.
तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही सर्वे मध्ये भाग घेतला. इथे आम्हाला तीन प्रश्न विचारण्यात आले आणि गिफ्ट मिळायच्या आधी आम्हाला हीच युआरएल १० व्हाट्सअँप ग्रुप मध्ये शेअर करण्यास सांगितली गेली.
आम्ही यासंबंधी सरळ ऍमेझॉन सोबत ट्विटर वर संपर्क केला. @AmazonHelp ने आपल्या अधिकृत ट्विटर आयडी वरून उत्तर देताना आम्हाला सांगितले कि हि लिंक बरोबर नाही आहे. @AmazonHelp ने अश्या कुठल्या लिंक वर आपली पर्सनल माहिती देण्यास मनाई केली आहे.
आम्ही या विषयी अधिक माहिती साठी सायबर सुरक्षा विशेषज्ञ आणि राजस्थान सरकार चे पब्लिक ग्रिव्हिन्स कमिटी चे पूर्व आयटी सालाहकर आयुष्य भारद्वाज यांच्या सोबत संपर्क केला. त्यांनी आम्हाला सांगितले, “या प्रक्रिये ला तकनीकी भाषेत क्लीक बेटिंग म्हंटले जाते, यात यूजर्स ला लॉटरी, डिस्काउंट कुपन, मोबाईल रिचार्ज, इत्यादी चे लालच देऊन जास्तीत जास्त वेळपर्यंत वेबसाईट ला एंगेज ठेवले जाते. असे करून त्यावर ऍड दाखवले जातात. ऍड पण वेबसाईट च्या वेग वेगळ्या पेज वर दाखवण्यात येतात आणि सर्वे च्या नावावर यूजर्स ला त्याच पेज वर फिरवले जाते. हे ‘पे पार व्यू’ वर आधारित असते. ज्याचा अर्थ असा असतो कि गूगल या सायबर अपराध्यांना पर व्यू पैसे देतो. आयुष्य भारद्वाज ने लोकांना या लिंक्स पासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.
आम्ही फेसबुक वर हा मेसेज शेअर करणारी प्रोफाइल, Arts&Crafts Marketplace Romania 🇷🇴🇷🇴🇷🇴 चे सोशल स्कॅनिंग केले. प्रोफाइल वर देण्यात आलेल्या माहिती नुसार, पेज रोमेनिया वरून चालवण्यात येतो.
निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात असे कळले कि ऍमेझॉन च्या नावावर व्हायरल होत असलेला मेसेज खोटा आणि क्लीकबेट आहे. याचा ऍमेझॉन सोबत काहीच संबंध नाही. एक्सपर्टस प्रमाणे, लिंक ओपन करणे धोक्याचे असू शकते.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923