Fact Check: छायाचित्रात तैमूर सोबत दिसत असलेलं लहान मूल सैफ अली खान आणि करीना कपूर चा नवजात मुलगा नाही
विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा खोटा असल्याचे समजले. तैमूर अली खान यांच्या सोबत दिसत असलेला लहान मुलगा त्यांचा भाऊ नाही. हे छायाचित्र नोव्हेंबर २०२० चे आहे, जेव्हाकी सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्या लहान मुलाचा जन्म फेब्रुवारी २०२१ मध्ये झाला.
- By: Pallavi Mishra
- Published: Mar 2, 2021 at 11:34 AM
विश्वास न्यूज (नवी दिल्ली): सोशल मीडिया वर सैफ अली खान आणि करीना कपूर यांचा मोठा मुलगा तैमूर अली खान याचे एक छायाचित्र व्हायरल होत आहे, ज्यात त्याच्या मांडीत एक छोटं मूल बसलेलं दिसतं. सोशल मीडिया यूजर्स दावा करत आहेत कि हे मूल तैमूर अली खान चा लहान भाऊ आहे, ज्याचा जन्म २१ फेब्रुवारी रोजी झाला.
विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा खोटा ठरला. तैमूर अली खान सोबत बसलेला नवजात मुलगा नाही. हे छायाचित्र नोव्हेंबर २०२० चे आहे, जेव्हाकी सैफ अली खान आणि करीना कपूर यांना दुसरा मुलगा फेब्रुवारी २०२१ मध्ये झाला.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर Audy Kundra ने Zee Magic Séries नावाच्या फेसबुक पेज वर तैमूर अली खान आणि एका लाहान मुलाचे छायाचित्र शेअर केले आणि लिहले, “तैमूर अली खान और उनके छोटे भाई जिनका नाम अभी तक अज्ञात है”
या पोस्ट चे आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
विश्वास न्यूज ने व्हायरल छायाचित्र सगळ्यात आधी गूगल रिव्हर्स इमेज सर्च मध्ये अपलोड करून शोधले. आम्हाला इंटरनेट वर या छायाचित्रासोबत जुडलेले बरेच परिणाम मिळाले. आम्हाला हे छायाचित्र nainas89 नावाच्या इंस्टाग्राम अकाउंट वर १२ नोव्हेंबर २०२० रोजी अपलोड केलेले मिळाले. हे इंस्टाग्राम अकाउंट नैना साहनी यांचे आहे. नैना ह्या करीना च्या मैनेजमेंट टीम च्या सदस्य आहे. त्यांनी छायाचित्र अपलोड करून लिहले, “Thank you for having us Bebo @kareenakapoorkhan ❤️ Sia made her first friend ❤️ love you both @poonamdamania”
हे छायाचित्र आम्हाला hindi.desimartini.com वर प्रकाशित झाल्याचे देखील दिसले. १२ नोव्हेंबर २०२० रोजी प्रकाशित झालेल्या या बातमी नुसार, “सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्या मुलाचे, तैमूर चे सुंदर छायाचित्र सध्या सगळ्यांचे मन मोहून घेत आहेत. त्यातच तीन वर्षाच्या तैमूर चे एक छायाचित्र समोर आले ज्यात ते एका लहान मुली सोबत पोस देताना दिसतात. हे छायाचित्र करीना कपूर यांच्या मॅनेजमेंट टीम च्या सदस्य नैना सहानी यांनी इंस्टाग्राम वर शेअर केले आहे. करीना यांच्या पर्सनल असिस्टेंस नैना साहनी यांनी नुकतेच एका मुलीला जन्म दिला. आणि करीना यांनी आपल्या टीम ला घरी डिनर ला बोलावले. या अवसर वर करीना ची मॅनेजर आणि मैत्रीण पूनम दमानिया देखील होत्या. नैना ने डिनर नंतर काही छायाचित्र आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर शेअर केले, ज्यात तैमूर लहान सिया सोबत खेळताना दिसतो. नैना ने म्हंटले कि सिया ला तिचा पहिला मित्र तैमूर मिळाला.”
या व्हायरल दाव्या बद्दल आम्ही आमचे दैनिक जागरण चे बॉलीवूड कव्हर करणारे सहयोगी मुख्य संवाददाता स्मिता श्रीवास्तव यांना संपर्क केला. त्यांनी आम्ही त्यांच्या सोबत व्हायरल दावा शेअर केला. स्मिता ने सांगितले कि,”करीना कपूर खान यांनी आपल्या दुसऱ्या मुलाला २१ फेब्रुवारी २०२१ रोजी जन्म दिला. तेव्हापासून त्यांनी किंवा यांच्या परिवाराच्या कुठल्याच सदस्यांनी नवजात बाळाचे कुठलेच छायाचित्र शेअर केले नाही. त्यांनी मीडिया ला त्यांच्या गोपनीयतेचा सम्मान करण्यास देखील सांगितले.
विश्वास न्यूज ने व्हायरल दावा शेअर करणारा फेसबुक पेज, Zee Magic Séries चा प्रोफाइल देखील स्कॅन केला. या पेज ला 520.7K फॉलोवर्स आहेत.
निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा खोटा असल्याचे समजले. तैमूर अली खान यांच्या सोबत दिसत असलेला लहान मुलगा त्यांचा भाऊ नाही. हे छायाचित्र नोव्हेंबर २०२० चे आहे, जेव्हाकी सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्या लहान मुलाचा जन्म फेब्रुवारी २०२१ मध्ये झाला.
- Claim Review : Taimur Ali Khan and his younger brother whose name is still unknown
- Claimed By : Zee Magic Séries
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.