Fact Check: लाल किल्ल्यावर खलिस्तान चा झेंडा फडकावल्याचा दावा खोटा

लाल किल्ल्याच्या प्राचीर वर लाहारावणारा तिरंगा काढून त्याच्या जागी खलिस्तान चा झेंडा लावल्याचा दावा खोटा आहे. लाल किल्ल्यावर प्रदर्शन करणाऱ्यांनी जो झेंडा लावला तो निशान साहिब आहे, जो शिखांचा धार्मिक प्रतीक आहे. सगळ्या गुरुद्वारांमध्ये हा झेंडा प्रतीक चिन्ह स्वरूपात लावण्यात येतो.

विश्वास न्यूज (नवी दिल्ली): २६ जानेवारी रोजी गणतंत्र दिवस समारोहानंतर ट्रैक्टर परेड च्या वेळी झालेल्या उपद्रव ला घेऊन सोशल मीडिया वर बरेच व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहेत, ज्यात दावा केला जात आहे कि ऐतिहासिक लाल किल्ल्यावर खलिस्तान चा झेंडा फडकावला गेला.

विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा खोटा असल्याचे समजले. लाल किल्ल्यावर फडकत असलेला तिरंगा काढून त्या जागी खलिस्तान चा झेंडा फडकावला गेला हा दावा करण्यात येत आहे. लाल किल्ल्यावर लोकांनी जो झेंडा लावला तो निशान साहिब आहे, जे शिखांचे धार्मिक प्रतीक आहे. सगळ्या गुरुदवारांमध्ये हा झेंडा प्रतीक चिन्ह स्वरूपात लावला जातो.

काय होत आहे व्हायरल?
ट्विटर यूजर ‘Sumit Kadel’ यांनी न्यूज एजेन्सी ANI च्या ट्विट ला (आर्काइव्ह लिंक) शेअर करून लिहले, “Khalistani Flag hoisted on Red Fort.. BlACK DAY FOR INDIA ..”

सोशल मीडिया वर बऱ्याच यूजर्स ने हा व्हिडिओ आणि मिळते जुळते फुटेज याच दाव्यासह शेअर केले आहे.

तपास:
व्हायरल पोस्ट मध्ये न्यूज एजेंसी ANI चे २६ जानेवारी चे ट्विट रिट्विट करून लिहले गेले कि लाल किल्ल्यावर खलिस्तान चा झेंडा लहरवला गेला. सर्च मध्ये आम्हाला एएनआई च्या वेरिफाइड ट्विटर हॅन्डल वर २६ जानेवारी रोजी पोस्ट केलेला मूळ व्हिडिओ सापडला, ज्याचा वापर बऱ्याच व्हायरल पोस्ट मध्ये करण्यात आला आहे.

आम्ही या व्हिडिओ ला बारकाई ने बघितले. एक मिनिट, ३ सेकंड च्या या व्हिडिओ मध्ये एक व्यक्ती हातात झेंडा घेऊन लाल किल्ल्याच्या प्राचिर समोर असलेल्या खांबावर लावताना दिसतो. व्हिडिओ मध्ये एक मिनिट १ सेकंड ते एक मिनिट ३ सेकंड पर्यंत प्राचिर वर तिरंगा फडकताना दिसतो. याचाच अर्थ, तिरंगा काढून तिथे कोणताच झेंडा लावण्यात आला नाही.

लाल घेऱ्यात लाल किल्ल्याच्या प्राचिर वर तिरंगा लेहरवताना दिसतो. जेव्हा उपद्रवी झेंडा लावत होते, ज्या पोल वर निशान साहिब लावण्याचा दावा करण्यात येत आहे, त्याचा तपास आम्ही परत बारकी ने केला. पिवळ्या रंगाच्या झेंड्या वर असलेल्या चिन्हा ला बघितल्यावर असे समजले कि तो खलिस्तान चा झेंडा नाही, निशान साहिब म्हणजे शिखांचे धार्मिक प्रतीक आहे. हे चिन्ह सगळ्या गुरुदवारांमध्ये धार्मिक प्रतीक चिन्ह च्या स्वरूपात लावले जाते.

इमेज सर्च मध्ये आम्हाला अमृतसर च्या स्वर्ण मंदिर च्या परिसरातले बरेच छायाचित्र मिळाले, ज्यात या झेंड्याचा प्रयोग केला गेला आहे. स्वर्ण मंदिरावर लागलेल्या निशान साहिब चा रंग केसरी आहे आणि लाल किल्ल्याच्या प्राचिर वर लागलेल्या झेंड्याचा रंग पिवळा आहे.


या दाव्यावरून आम्ही दैनिक जागरण चे सहयोगी अमृतसर चे प्रभारी आणि वरिष्ठ संवाददाता अमृतपाल सिंह यांना संपर्क केला. त्यांनी सांगितले, “लाल किल्ल्यावर जो झेंडा दिसत आहे तो निशान साहिब आहे, खलिस्तान चा झेंडा नाही. हे चिन्ह तसे केसरी रंगात बनवले जाते पण लोकं या चिन्हाला विविध रंगात बनवतात. निहंग शीख निशान साहिब निळ्या रंगात बनवतात, पण बऱ्याच ठिकाणी हे चिन्ह पिवळ्या आणि काळ्या रंगाच्या देखील कापडावर बनवण्यात येते.”

२७ जानेवारी रोजी प्रकाशित झालेल्या बऱ्याच बातम्या आम्हाला मिळाल्या ज्यात या घटनेबद्दल सविस्तर सांगण्यात आले होते. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ च्या वेबसाईट वर २७ जानेवारी रोजी प्रकाशित रिपोर्ट मध्ये सांगितले गेले कि, “What is Nishan Sahib? It’s found flying atop every gurdwara”. म्हणजे हे धार्मिक चिन्ह आहे जे सगळ्याच गुरुद्वाऱ्यांवर
लावण्यात येतो.

न्यूज सर्च मध्ये आम्हाला एएनआई तर्फे २७ जानेवारी रोजी पोस्ट केलेला एक ट्विट देखील मिळाला, ज्यात वाशिंगटन डीसी मध्ये असलेल्या भारतीय दूतावास समोर खलिस्तान्यांनी प्रदर्शन केल्याचे छायाचित्र आहेत. या छायाचित्रांमध्ये खलिस्तान चा झेंडा दिसतो, ज्यात प्रतीक चिन्हाच्या खाली स्पष्ट काळ्या अक्षरात ‘KHALISTAN’ (खलिस्तान) लिहल्याचे दिसते.

व्हायरल पोस्ट खोट्या दाव्यासह ज्या यूजर ने शेअर केले त्याने आपल्या प्रोफाइल वर स्वतःला फिल्म ट्रेड अनॅलिस्ट सांगितले आहे. त्यांच्या प्रोफाइल ला एक लाख लोकं फोल्लो करतात.

निष्कर्ष: लाल किल्ल्याच्या प्राचीर वर लाहारावणारा तिरंगा काढून त्याच्या जागी खलिस्तान चा झेंडा लावल्याचा दावा खोटा आहे. लाल किल्ल्यावर प्रदर्शन करणाऱ्यांनी जो झेंडा लावला तो निशान साहिब आहे, जो शिखांचा धार्मिक प्रतीक आहे. सगळ्या गुरुद्वारांमध्ये हा झेंडा प्रतीक चिन्ह स्वरूपात लावण्यात येतो.

False
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट