Fact Check:खादी ९९९ रुपयात ३ फेस मास्क नाही विकत आहे, व्हायरल पोस्ट खोटी आहे

खादी इंडिया रु ९९९ मध्ये ३ फेस मास्क नाही विकत आहे. तसेच महात्मा गांधी यांचे छायाचित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत त्या मास्कवर बदलले गेले आहे. व्हायरल पोस्ट खोटी आहे.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर एका व्हायरल पोस्ट मध्ये असा दावा करण्यात येत आहे कि खादी इंडिया वाढीव दरात फेस मास्क विकत आहे आणि ब्रँड नि महात्मा गांधी यांचे छायाचित्र न वापरता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र वापरले आहे. आम्हाला हा दावा ट्विटर वर आढळला. तसेच आम्हाला फेसबुक वर देखील ह्या दाव्यांसह पोस्ट आढळले. विश्वास न्यूजच्या तपासात हे दावे खोटे असल्याचे आढळले. खादी और ग्रामोद्योग आयोग (केवीआईसी) सोबत संपर्क केले असता, त्यांनी स्पष्ट केले कि व्हायरल पोस्ट खोटी आहे.

काय होत आहे व्हायरल?
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय च्या अंतर्गत काम करणाऱ्या खादी इंडिया ला घेऊन बरेच पोस्ट व्हायरल होताना दिसतात ज्यात दावा करण्यात येत आहे कि खादी इंडिया रु. ९९९ मध्ये ३ फेस मास्क विकत आहे. सोबतच या पोस्ट मध्ये असे म्हंटले गेले आहे कि महात्मा गांधी याच्या छायाचित्राऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र या ब्रँड मध्ये वापरले गेले आहे.
या व्हायरल पोस्ट ची आर्काइव लिंक इथे बघा.

तपास:

आम्ही कीवर्ड्स वापरून न्यूज सर्च करून बघितले. आम्हला मिळालेल्या रिपोर्ट्स मध्ये खादी इंडिया द्वारा फेस मास्क लाँच केले जातील असे सांगण्यात आले होते. पण आम्हाला मास्क वाढीव दरात विकल्याजात असल्याची बातमी कुठेच आढळली नाही.
एएनआई न्यूज एजेंसी च्या एका बातमीत फक्त असे म्हंटले गेले आहे कि, “कोरोनाव्हायरस चे संक्रमण लक्षात घेता खादी इंडिया ने अनोखे ट्रिपल लेअर मास्क लाँच केले आहेत.”

स्वास्थ्य और परिवार कल्याण मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी देखील खादी चे मास्क वापरण्याबाबत आणि त्याच्या लाँच बद्दल ट्विट केले होते.

इथे भारत सरकार द्वारा खादी चे उत्पादन केलेले मास्क आणि व्हायरल पोस्ट मध्ये शेअर केलेले मास्क यांच्यातला फरक स्पष्ट दिसून येतो.
पोस्टवर स्पष्टीकरणाची आम्ही केवीआईसी सोबत संपर्क साधला, त्यांनी आम्हाला सांगितले कि हे खरे फेस मास्क नाहीत. खादी नावाचा उपयोग करून या फेस मास्क ची विक्री केली जात आहे. आमचे म्हणजेच खादी चे फेस मास्क हे फक्त रु ३० पासून सुरु होतात.


केवीआईसी चे अध्यक्ष विनय कुमार सक्सेना यांनी या बाबतीत ट्विट करून व्हायरल दावा खोटे असल्याचे देखील सांगितले.

या व्हायरल पोस्ट ला Sardar Amrender Singh नामक यूजर ने शेअर केले. यूजर ने २००८ रोजी फेसबुक जॉईन केले.

निष्कर्ष: खादी इंडिया रु ९९९ मध्ये ३ फेस मास्क नाही विकत आहे. तसेच महात्मा गांधी यांचे छायाचित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत त्या मास्कवर बदलले गेले आहे. व्हायरल पोस्ट खोटी आहे.

False
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट