Fact Check: कलबुर्गी च्या रामनवमी चा जुना व्हिडिओ आता अमरावतीच्या नावावर व्हायरल
विश्वास न्यूजच्या तपासात अमरावतीच्या नावाने व्हायरल झालेली पोस्ट बनावट असल्याचे सिद्ध झाले. मूळ व्हिडिओ कर्नाटक च्या रामनवमी यात्रेचा आहे. महाराष्ट्रातील अमरावतीच्या भाजपच्या रॅली चा सांगून काही लोक हे व्हायरल करत आहेत.
- By: Ashish Maharishi
- Published: Nov 24, 2021 at 09:14 PM
- Updated: Sep 12, 2024 at 05:51 PM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये धार्मिक स्थळासमोर अनेक लोक दिसतात. हा व्हिडिओ महाराष्ट्रातील अमरावती येथील भाजपच्या निषेधाचा असल्याचा दावा यूजर्स करत आहे आणि तसाच हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. विश्वास न्यूजने व्हायरल पोस्ट चा तपास केला. तपासात समोर आले की, व्हायरल झालेला व्हिडिओ हा कर्नाटकातील रामनवमीला काढण्यात आलेल्या मिरवणुकीचा जुना व्हिडिओ आहे, जो अमरावतीच्या नावाने काही लोक त्रिपुरा दंगलीशी जोडून व्हायरल करत आहेत. व्हायरल झालेली पोस्ट खोटी असल्याचे समोर आले आहे.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर अनिल कुमार गौतम यांनी 15 नोव्हेंबर रोजी एक व्हिडिओ अपलोड करून दावा केला: ‘त्रिपुरा दंगे के खिलाफ मुसलमानों ने कल किए गए बंद के बाद आज भाजपा के विरोध प्रदर्शन के बाद महाराष्ट्र के अमरावती में कर्फ्यू. Hinduism और Hindutva को समझने के लिये इससे बढ़िया उदाहरण नहीं मिलेगा! हिंदुइज्म की रक्षा करना ही हिंदुत्व का काम है!’
फेसबुक पोस्ट चा कन्टेन्ट इथे जसाच्या तास देण्यात आला आहे. ह्या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
विश्वास न्यूजने व्हायरल झालेल्या व्हिडिओचा तपास कारण्याची सुरुवात InVID टूलवर त्या व्हिडिओ ला अपलोड करून केले. मग या ग्रॅब्स यांडेक्स सर्च इंजिनवर अपलोड करून तपास सुरू केला. आम्हाला एएनआयचा एक जुना ट्विट सापडला. एप्रिल 2019 मध्ये केलेल्या ट्विटमध्ये चार चित्र वापरून, सांगण्यात आले होते, हे कि कर्नाटकातील कलबुर्गी येथे रामनवमीची मिरवणूक काढण्यात आली होती. यामध्ये मुस्लिमांनी ज्यूस देखील वाटप केले. खाली पूर्ण ट्विट पहा.
तपासादरम्यान, आम्ही अमरावतीच्या नावाने व्हायरल झालेल्या व्हिडिओचे आणि एएनआयच्या जुन्या चित्राचे तुलनात्मक अध्ययन केले. दोन्ही ठिकाणी आम्हाला बर्याच गोष्टी साम्य आढळल्या. उदाहरणार्थ, धार्मिक स्थळाची स्थापत्य शैली, दरवाजे, घुमट दोन्ही ठिकाणी सारखेच होते.
विश्वास न्यूज ने तपासाच्या पुढच्या टप्प्यात संबंधित किवर्ड वापरून युट्युब वर सोर्स शोधण्यास सुरुवात केली. आम्हाला युट्युब वर असा कुठलाच व्हिडिओ मिळाला नाही जो सांगेल कि हा कर्नाटक चा आहे. पण आम्हाला ह्या व्हिडिओ सोबत मिळत जुळता एक व्हिडिओ मिळाला. हा खाली बघा.
विश्वास न्यूज ने तपासाच्या पुढच्या टप्प्यात, अमरावती च्या पोलीस आयुक्त डॉ आरती सिंह ह्यांना संपर्क केला. त्यांनी सांगितले कि हि पोस्ट खोटी आहे.
तपासाअंती विश्वास न्यूजने बनावट पोस्ट करणाऱ्या युजरचे सोशल स्कॅनिंग केले. आम्हाला कळले की फेसबुक यूजर अनिल कुमार गौतम एका विचारसरणीने प्रभावित आहे. गुजरातमधील सुरतमध्ये राहणाऱ्या या फेसबुक यूजरला तीनशेहून अधिक लोक फॉलो करतात.
निष्कर्ष: विश्वास न्यूजच्या तपासात अमरावतीच्या नावाने व्हायरल झालेली पोस्ट बनावट असल्याचे सिद्ध झाले. मूळ व्हिडिओ कर्नाटक च्या रामनवमी यात्रेचा आहे. महाराष्ट्रातील अमरावतीच्या भाजपच्या रॅली चा सांगून काही लोक हे व्हायरल करत आहेत.
- Claim Review : त्रिपुरा दंगे के खिलाफ मुसलमानों ने कल किए गए बंद के बाद आज भाजपा के विरोध प्रदर्शन के बाद महाराष्ट्र के अमरावती में कर्फ्यू
- Claimed By : फेसबुक यूजर अनिल कुमार गौतम
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.