Fact Check: चित्रात बाळासाहेब ठाकरेंसोबत एकनाथ शिंदे नाहीत, शिवसेना नेते आनंद दिघे आहेत

Fact Check: चित्रात बाळासाहेब ठाकरेंसोबत एकनाथ शिंदे नाहीत, शिवसेना नेते आनंद दिघे आहेत

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या राजकीय उलथापालथीदरम्यान सोशल मीडियावर एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला जात आहे. यात शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे एका माणसाला टिळक लावताना दिसतात. फोटो शेअर करून यूजर्स दावा करत आहेत की, जुन्या फोटोमध्ये बाळासाहेब ठाकरे एकनाथ शिंदे यांना टिळक लावून आशीर्वाद देत आहेत. विश्वास न्यूजने केलेल्या तपासात बाळासाहेबांसोबत फोटोत दिसणार्‍या व्यक्तीचे नाव एकनाथ शिंदे नसून आनंद दिघे असल्याचे निष्पन्न झाले आहे. चुकीचा दावा करून फोटो व्हायरल केला जात आहे.

काय होत आहे व्हायरल?

फेसबुक यूजर Shanker Singh (आर्काइव लिंक) ने 23 जून रोजी एक फोटो शेअर केला आणि लिहले.
In an old photo, Balasaheb Thackeray giving blessings by giving Tilak of Eknath Shinde.
(एका जुन्या चित्रात बाळासाहेब एकनाथ शिंदेंना टीका लावताना)

ट्विटर यूजर @Brijesh34228553 (आर्काइव लिंक) ने भी 22 जून को फोटो पोस्ट करते हुए समान दावा किया।

https://twitter.com/Brijesh34228553/status/1539594928438669313?s=20&t=JdBOSK9Efkv3w80yJwUkAg

तपास:

गुगल रिव्हर्स इमेजसह व्हायरल फोटो शोधताना, आम्हाला 17 मे 2022 रोजी बॉली नावाच्या वेबसाइटवर प्रकाशित झालेली बातमी आढळली. त्यात व्हायरल फोटोही अपलोड करण्यात आला आहे. या अनुषंगाने प्रसिद्ध शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या जीवनावरील चित्रपट लोकांच्या पसंतीस उतरला आहे.

लोकमत मध्ये देखील 15 मे रोजी हा फोटो प्रकाशित झाला होता. ह्याच्या कॅप्शन प्रमाणे, फोटो मध्ये बाळासाहेबांसोबत आनंद दिघे आहेत.

mpmsu च्या वेबसाईट वरील रिपोर्ट प्रमाणे, धर्मवीर आनंद दिघे ह्यांचे निधन ठाण्यातील एका दवाखान्यात ऑगस्ट 2001 मध्ये मृत्यू झाली. ते ठाण्यातील एका मोठ्या नेत्यांपैकी होते. बाळासाहेब नेहमी ठाण्याला येत असत आणि त्यांच्या संबोधनानेच दिघेंचा कल त्यांच्याकडे झुकला. ह्यानंतर ते शिवसेनेसोबत जुडले.

22 जून 2022 रोजी नवभारतटाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तात असे लिहिले आहे की, लोक आनंद दिघे यांना ठाण्याचे ठाकरे म्हणायचे. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर ते शिवसेनेचे सर्वात उंच नेते मानले जात होते. शिवसैनिकही त्यांना धरमवीर या नावाने हाक मारत. एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांचे शिष्य.

अधिक माहितीसाठी आम्ही शिवसेनेच्या प्रवक्त्याशी संपर्क साधला. त्याच्यासोबतचा व्हायरल फोटो शेअर केला. ते म्हणतात, ‘फोटोत बाळासाहेबांसोबत आनंद दिघे दिसत आहेत.’

आम्ही फेसबुक युजर ‘शंकर सिंह’ चे प्रोफाईल स्कॅन केले ज्याने खोटा दावा करून फोटो शेअर केला आहे. त्यानुसार तो हैदराबादमध्ये राहत असून एका राजकीय पक्षाशी संबंधित आहे.

False
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट