Fact Check: भारत पहिल्यांदा UNSC चा अध्यक्ष झाला नाही, व्हायरल दावा खोटा आहे

विश्वास न्यूज च्या तपासात संयुक्त राष्ट्र आणि भारताबद्दल व्हायरल होत असलेला दावा खोटा असल्याचा कळले. भारत 1950 पासून UNSC चा नॉन पर्मनन्ट सदस्य बनत राहिला आहे, आता पर्यंत एकूण आठ वेळा भारत सदस्य झाला आहे. संयुक्त राष्ट्राच्या नियमांप्रमाणे, UNSC चे अध्यक्ष पद क्रमाने प्रत्येक नॉन पर्मनन्ट सदस्याला एक एक महिन्यासाठी मिळते. भारत आधी देखील आपल्या कार्यकाळात UNSC चा अध्यक्ष होता.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर भारत आणि संयुक्त राष्ट्र संघ (UN) या संबंधित एक दावा व्हायरल होत आहे. सोशल मीडिया यूजर्स एका ग्राफिक द्वारे दावा करत आहेत कि भारत पहिल्यांदाच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (UNSC) ची अध्यक्ष्यता करत आहे. विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल दावा खोटा ठरला. भारत 1950 पासूनच UNSC चा नॉन-पर्मनंट सदस्य आहे आणि आतापर्यंत एकूण आठ वेळा भारत नॉन-पर्मनन्ट सदस्य राहिला आहे.
संयुक्त राष्ट्राच्या नियमांप्रमाणे सुरक्षा परिषद ची अध्यक्ष्य वर्णमाला मध्ये क्रमाने एक-एक महिन्यासाठी नॉन पर्मनंट सदस्यांना देखील मिळते. भारताने आपल्या पहिल्या कार्यकाळातच UNSC चे अध्यक्ष पद भूषविले होते. पण विदेश मंत्रालयाप्रमाणे, पीएम मोदी हे भारताचे पहिले पीएम आहे जे UNSC च्या ओपन डिबेट ची अध्यक्ष्यता करतील.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर Banwari Lal ने 4 ऑगस्ट 2021 रोजी व्हायरल ग्राफिक शेअर केले आणि त्यावर लिहले: ‘आज से दुनियाँ की कमान भारत के हाथों में, भारत बना UNO (UNSC) का अध्यक्ष तुर्की, पाक समेत कई देश बौखलाए, United Nations की अध्यक्षता भारत पहली बार करेगा।’
या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
विश्वास न्यूज ने व्हायरल दाव्याचा तपास करत सगळ्यात आधी हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला कि UNSC ला घेऊन भारताबद्दल इतकी चर्चा का होत आहे. आम्ही महत्वपूर्ण कीवर्डस चा वापर करून इंटरनेट वर ओपन सर्च केले. आम्हाला Mint या वेबसाईट वर प्रकाशित एक रिपोर्ट मिळाली, या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले होते कि भारत ऑगस्ट महिना, UNSC चे अध्यक्ष पद सांभाळेल. याच रिपोर्ट मध्ये पुढे सांगण्यात आले आहे कि हा भार जानेवारी 2021 पासून १० नॉन पर्मनन्ट सदस्यांमध्ये भारत दोन वर्षांसाठी सदस्य झाला आहे. रिपोर्ट प्रमाणे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद मध्ये सगळ्या १५ सदस्य (पाच स्थायी आणि १० अस्थायी) यांना रोटेशन च्या आधारावर अध्यक्ष्य मिळते. हि लिंक इथे क्लीक करून बघा.

ह्या माहिती नंतर आम्ही संयुक्त राष्ट्राची अधिकृत वेबसाईट बघितली. तिथे आम्हाला, 2021आणि 2022 साठी सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षतेसाठी शेड्युल मिळाला. इथे दिलेल्या माहिती प्रमाणे, हा शेड्युल वर्णमाला मध्ये क्रमाच्या हिशोबाने देशांचे नाव दिले होते. इथे सांगितले गेले कि भारत ऑगस्ट 2021 आणि डिसेम्बर 2022 मध्ये अध्यक्ष पद भूषवेल. या माहिती ला इथे क्लीक करून बघा.

याच वेबसाईट वर आम्हाला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद च्या सदस्यांची माहिती देखील मिळाली. या वेबसाईट प्रमाणे, UNSC चे पाच स्थायी सदस्य आहे. यात चीन, फ्रांस, रशियन फेडरेशन, यूनाइडेट किंगडम आणि अमेरिका यांचा समावेश आहे. इथे सांगितले होते कि या शिवाय १० अस्थायी सदस्य देखील आहेत. या लिस्ट मध्ये सध्या, इस्टोनिया, भारत, आयरलैंड, केन्या, मेक्सिको, नाइजर, नॉर्वे, सेंट विंसेंट एंड द ग्रेंडाइंस, ट्यूनिशिया और वियतनाम यांचा समावेश आहे. हि माहिती इथे क्लीक करून बघा.

आता आम्ही हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला कि भारत पहिल्यांदा सदस्य कधी बनला. त्यात आम्हाला हि माहिती संयुक्त राष्ट्राच्या वेबसाईट वरच मिळाली, त्यात सर्च मेम्बरशिप बाई कंट्री च्या टॅब अंतर्गत हि माहिती आम्हाला मिळाली ज्यात सांगितले होते, भारत या आधी, 1950 ते 1951, 1967 ते 1968, 1972 ते 1973, 1977 ते 1978, 1984 ते 1985, 1991 ते 1992 और 2011 ते 2012 मध्ये देखील UNSC चा सदस्य होता, हि माहिती इथे क्लीक करून बघा.

इंटरनेट सर्च च्या वेळी आम्हाला संयुक्त राष्ट्र ने भारताची अस्थायी सदस्य म्हणून घोषणा झाल्याची प्रेस रिलिज देखील याच अधिकृत वेबसाईट वर सापडली. ह्यात सांगितले गेले होते कि भारताला आठव्यांदा राष्ट्र सुरक्षा परिषद मध्ये जागा मिळाली होती. हि प्रेस रिलिज इथे बघा.

आम्हाला इंटरनेट वर तपासादरम्यान नेमके ते वर्ष कीवर्डस म्हणून वापरले, जेव्हा भारत अस्थायी सदस्य बनला. आम्हाला इंटरनेट वर कीवर्डस च्या मदतीने UNSC च्या अध्यक्ष्य सोबत वर्षाचा देखील तपास केला. आम्हाला द हिंदू मध्ये 3 जानेवारी 2011 रोजी प्रकाशित एक बातमी मिळाली. या रिपोर्ट मध्ये सांगितले गेले होते कि भारत त्यावर्षी देखील दोन वर्षाकरिता अस्थायी सदस्य होता. हि रिपोर्ट इथे क्लीक करून बघा.

आम्हाला मनोहर पर्रीकर च्या रक्षा अध्ययन एवं विश्लेषण संस्थान च्या वेबसाइट पर 19 स्पेटम्बर 2011 रोजी प्रकाशित एक लेख मिळाला. या लेखात सांगितले गेले होते कि भारताने ऑगस्ट २०११ मध्ये UNSC ची अध्यक्ष्य सांभाळली आणि त्याआधी डिसेंबर १९९२ मध्ये देखील अध्यक्ष पद भूषवले. हा लेख इथे क्लीक करून वाचा.

विश्वास न्यूज च्या आतापर्यंतच्या तपासात हे कळले होते कि भारताने आधी देखील UNSC चे अध्यक्ष पद भूषवले आहे. विश्वास न्यूज ने व्हायरल दावा, राणा प्रताप पीजी कॉलेज, सुल्तानपुर चे असिस्टेंट प्रोफेसर आणि अंतरराष्ट्रीय घटनांचे माहितीतज्ञ आलोक पांडे यांच्या सोबत शेअर केला. त्यांनी व्हायरल दावा खोटा असल्याचे सांगितले. भारताने याआधी देखील UNSC मध्ये अध्यक्ष पद भूषवले आहे. त्यांनी सांगितले कि संयुक्त राष्ट्रात पाच स्थायी आणि दहा अस्थायी सदस्य मिळून पंधरा सदस्य आहेत. रोटेशन च्या आधारे, सगळे सदस्य एक-एक महिना याचे अध्यक्ष्य पद भूषवतात. भारत आठव्यांदा UNSC चे अध्यक्ष बनले आहे.

विश्वास न्यूज ने हा व्हायरल दावा शेअर करणाऱ्या फेसबुक यूजर Banwari Lal यांचा प्रोफाइल तपासला. यूजर भरतपूर चे रहिवासी आहेत.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात संयुक्त राष्ट्र आणि भारताबद्दल व्हायरल होत असलेला दावा खोटा असल्याचा कळले. भारत 1950 पासून UNSC चा नॉन पर्मनन्ट सदस्य बनत राहिला आहे, आता पर्यंत एकूण आठ वेळा भारत सदस्य झाला आहे. संयुक्त राष्ट्राच्या नियमांप्रमाणे, UNSC चे अध्यक्ष पद क्रमाने प्रत्येक नॉन पर्मनन्ट सदस्याला एक एक महिन्यासाठी मिळते. भारत आधी देखील आपल्या कार्यकाळात UNSC चा अध्यक्ष होता.

False
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट