Fact Check: जमिनी वर झोपून फोटाग्राफर मोदींचे चित्र काढत असल्याचे छायाचित्र एडिटेड आहे

विश्वास न्यूज च्या तपासात पीएम मोदींचे चित्र ज्यात एक फोटोग्राफर जमिनी वर झोपून त्यांचे चित्र घेत आहे, ते एडिटेड असल्याचे समोर आले. व्हायरल दावा खोटा आहे.

विश्वास न्यूज (नवी दिल्ली): विश्वास न्यूज ला एक छायाचित्र सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वर व्हायरल होताना दिसले. ह्या चित्रात एक फोटोग्राफर जमिनी वर झोपून पंतप्रधान मोदी ह्यांचे चित्र काढत असल्याचे त्यात दिसत होते. विश्वास न्यूज च्या तपासात हे चित्र एडिटेड असल्याचे समोर आले. दोन चित्रांना जोडून हे चित्र बनवण्यात आले होते.

काय होत आहे व्हायरल?

ट्विटर यूजर Neha Singh Rathore ने व्हायरल चित्र आपल्या प्रोफाइल वर शेअर केले आणि लिहले, “क्या सीन है”

हि पोस्ट आणि ह्याचा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

https://twitter.com/NehafolksingerI/status/1577100101038018560

तपास:

विश्वास न्यूज ने तपासाची सुरुवात साध्या गूगल रिव्हर्स इमेज सर्च ने केली. त्यावरून आम्हाला परीने मिनिस्टर नरेंद्र मोदी ह्यांच्या ट्विटर अकाउंट वर 2 Oct, 2021 रोजी हे चित्र शेअर केल्याचे समोर आले. हे चित्र गांधी स्मृती, दिल्ली ला झालेल्या प्रार्थना सभेचे होते.

ह्या ट्विट मधील दुसरे चित्र हे व्हायरल चित्र होते. ह्या चित्रात कुठलाही फोटोग्राफर दिसत नाही.

आम्हाला हेच चित्र siasat.com वर देखील सापडले. त्यात कॅप्शन मध्ये लिहले होते: “New Delhi: Prime Minister Narendra Modi at the Gandhi Smriti in Delhi on the occasion of birth anniversary of Mahatma Gandhi. (PTI Photo)

त्यानंतर आम्ही दुसरे चित्र म्हणजेच फोटोग्राफर चे चित्र शोधण्यास सुरुवात केली. रिव्हर्स इमेज सर्च मध्ये जास्ती निकाल न मिळाल्याने आम्ही किवर्ड सर्च ची मदत घेतली.

आम्हाला किवर्ड सर्च ने हे चित्र alamy च्या वेबसाईट वर सापडले. ह्या चित्रात पीएम मोदी कुठेच दिसत नाही.

हे चित्र 15 March, 2017 रोजी पासून वेबसाईट वर आहे. ह्या चित्राच्या कॅप्शन मध्ये लिहले होते, “Photographer lying on the ground while photographing a large building from different perspective. Creative photography style.

हे चित्र ‘Ingemar Magnusson‘ ह्यांनी alamy वर टाकले होते. विश्वास न्यूज ने त्यांना देखील इमेल द्वारे संपर्क केला आहे पण अजून त्यांचे उत्तर आलेले नाही.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही PTI च्या एका पत्रकारासोबत संवाद साधला जे तेथील फोटो डेस्क वर काम करतात. त्यांनी सांगितले कि हा फोटो PIB द्वारे देण्यात आला होता आणि त्यानंतर PTI ने तो रिलीस केला.

विश्वास न्यूज ने तपासाच्या पुढच्या टप्प्यात भाजप चे प्रवक्ता शिवराय कुलकर्णी ह्यांना संपर्क केला. त्यांनी आम्हाला सांगितले कि व्हायरल चित्र एडिटेड आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांची प्रतिमा खराब करण्याचा विरोधकांचा डाव असून त्यांनी हे चित्र व्हायरल केले असावे, असे देखील त्यांनी म्हंटले.

विश्वास न्यूज ने पीएमओ ऑफिस ला देखील ह्या संदर्भात संपर्क केला आहे. त्यांची प्रतिक्रिया येताच हे फॅक्ट चेक अपडेट करण्यात येईल.

तपासाच्या शेवटच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने व्हायरल इमेज शेअर करणाऱ्या यूजर नेहा सिंग राठोर ह्यांचे बॅकग्राउंड चेक केले, त्यात कळले त्यांना 19.7K लोकं फॉलो करतात.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात पीएम मोदींचे चित्र ज्यात एक फोटोग्राफर जमिनी वर झोपून त्यांचे चित्र घेत आहे, ते एडिटेड असल्याचे समोर आले. व्हायरल दावा खोटा आहे.

False
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट