Fact Check: नागपूरमधील जीएमसी चे चित्र गुजरात च्या नावाने व्हायरल
विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल दावा खोटा निघाला. व्हायरल चित्र गुजरात चे नसून नागपूर च्या जीएमसी दवाखान्यातील आहे.
- By: Pragya Shukla
- Published: May 20, 2022 at 11:24 AM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर एका दवाखान्यातील चित्र शेअर करण्यात येत आहे, ज्यात दवाखान्यातील दुर्व्यवस्था दिसतेय. दावा करण्यात येत आहे कि हे चित्र गुजरात चे आहे. चित्रात एक महिला म्हणजे एकूण ३ पेशंट बेड वर दिसतात. विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल दावा दिशाभूल करणारा निघाला. व्हायरल चित्र गुजरात चे नाही, महाराष्ट्रातील नागपूर मधील दवाखान्यातील आहे.
काय होत आहे व्हायरल?
व्हाट्सअँप वर व्हायरल होत असलेल्या पोस्ट मध्ये लिहले आहे: “दुनिया में सबसे ऊंचा स्टैचू गुजरात में….विकास मॉडल गुजरात के अस्पताल का हालत देखिए….एक महिला के साथ दो पुरुष मरीज एक ही बेड पर।”
तसेच खाली एक लिंक दिसत आहे. आम्हाला हि पोस्ट विश्वास न्यूज च्या टिपलाइन +91 95992 99372 वर देखील फॅक्ट चेक करता मिळाला.
तपास:
व्हायरल फोटोचे सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही गुगल रिव्हर्स इमेजच्या माध्यमातून फोटो शोधण्यास सुरुवात केली. या वेळी आम्हाला 14 एप्रिल 2021 रोजी मेघा प्रसाद नावाच्या पत्रकाराच्या अधिकृत ट्विटर अकाउंट वर अपलोड केलेले व्हायरल चित्र प्राप्त झाले. कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, व्हायरल झालेला फोटो गुजरातचा नसून महाराष्ट्रातील नागपूर येथील सरकारी रुग्णालयाचा आहे.
तपास पुढे नेत, आम्ही काही कीवर्डद्वारे Google वर शोधले. या दरम्यान, आम्हाला 31 मार्च 2021 रोजी न्यूज18 वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या व्हायरल दाव्याशी संबंधित एक बातमी आढळली. रिपोर्ट मध्ये दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या काळात जीएमसी हॉस्पिटलमध्ये एका बेडवर दोन रुग्णांवर उपचार सुरू होते. बातमीतील चित्रांची व्हायरल चित्राशी तुलना केली असता, हे चित्र जीएमसी रुग्णालयाचे असल्याचे आढळून आले. पडद्यापासून ते बेडवरच्या चादरींपर्यंत दोन्ही चित्रात सारखेच आहेत. एवढेच नाही तर पलंगावरचा क्रमांकही मराठी भाषेत लिहिला आहे.
अधिक माहिती साठी आम्ही नागपूर चे ANI कॉरस्पॉण्डेण्ट सौरभ जोशी ह्यांना संपर्क केला, त्यांनी आम्हाला सांगितले कि व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे, चित्र गुजरात मधील नसून नागपूर च्या जीएमसी हॉस्पिटल चे कोरोनाकाळातील आहे.
निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल दावा खोटा निघाला. व्हायरल चित्र गुजरात चे नसून नागपूर च्या जीएमसी दवाखान्यातील आहे.
- Claim Review : दुनिया में सबसे ऊंचा स्टैचू गुजरात में....विकास मॉडल गुजरात के अस्पताल का हालत देखिए....एक महिला के साथ दो पुरुष मरीज एक ही बेड पर....
- Claimed By : amethi raebareli ki kahani
- Fact Check : Misleading
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.