पेट्रोलियम च्या वाढत्या किमतींना घेऊन व्हायरल होत असलेले छायाचित्र नागरिकता संशोधन कायदा आणि एनआरसी च्या समर्थनाचे जुने छायाचित्र आता व्हायरल होत आहे. ह्या छायाचित्राला एडिट करून खोट्या दाव्यासह आता व्हायरल केले जात आहे.
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): पेट्रोलियम प्रॉडक्ट्स च्या किमती वाढत असताना सोशल मीडिया वर एक छायाचित्र व्हायरल होत आहे ज्यात एक व्यक्ती हातात बॅनर घेऊन दिसतो. बॅनर वर लिहलेल्या मेसेज मध्ये केंद्र सरकार ला इंधन च्या वाढत्या किमतींकर्ता जिम्मेदार ठरवले जात होते.
विश्वास न्यूज च्या तपासात हे छायाचित्र खोटे ठरले. व्हायरल होत असलेले छायाचित्र हे नागरिकता संशोधन कायदा आणि एनआरसी च्या समर्थनार्थ असलेले जुने छायाचित्र आहे, ज्याला आता एडिट करून खोट्या दाव्यासह व्हायरल केले जात आहे. सोशल मीडिया वर हे छायाचित्र नेहमीच वेग-वेगळ्या संदर्भात खोट्या दाव्यासह व्हायरल केले जातात.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर ‘Alok Narayan Verma’ ने व्हायरल छायाचित्र (आर्काइव्ह लिंक) ला शेअर केले, ज्यात लिहले होते: “पेट्रोल डिजल पर मोदी जी 16 रुपये ले रहे हैं और गहलोत 40 रुपये फिर भी 16 रु लेने वाला मोदी इनका दुश्मन है और गहलोत इनका दोस्त।”
तपासपर्यंत त्या छायाचित्राला जवळपास एक हजार लोकांनी शेअर केले होते. सोशल मीडिया वर अन्य यूजर्स या छायाचित्राला याच दाव्यासह व्हायरल करत आहेत.
तपास:
छायाचित्रात केलेल्या दाव्याचा तपास आम्ही गूगल रिव्हर्स इमेज पासून केला. सर्च मध्ये आम्हाला ओरिजिनल हायचित्रं बऱ्याच सोशल मीडिया यूजर्स च्या पोफाईल वर लागलेले मिळाले, त्यांनी वर्ष २०१९ साली आपल्या टाइमलाईन वर शेअर केले होते. आम्हाला मिळालेल्या छायाचित्रात दिसतासलेल्या व्यक्ती च्या हातात दिसत असलेल्या बॅनर वर वेगळाच संदेश लिहला असल्याचा दिसला.
ट्विटर हैंडल ‘@Sidd_180’ ने ओरिजिनल छायाचित्र आपल्या प्रोफाइल वर ३० डिसेंबर २०१९ रोजी शेअर केले, “I support #CAA #IndiaSupportsCAA.”
फेसबुक पेज ‘Crime Petrol’ वर हेच छायाचित्र एक जानेवारी २०२० रोजी शेअर केले गेले, त्या शिवाय अनेक यूजर्स ने हेच छायाचित्र एक वर्ष आधी आपल्या प्रोफाइल वर शेअर केले.
या सगळ्या छायाचित्रात दिसत असलेल्या व्यक्ती च्या हातात दिसत असलेल्या बॅनर वर लिहले होते, “मोदी जी आप चुनौतियों से निपटो…@#@#@ से हम निपट लेंगे!! We Support CAA NRC.” या छायाचित्राला एडिट करून पेट्रोल प्रॉडक्ट्स च्या वाढत्या किमतींबद्दल संदेश बनवून व्हायरल केले जात आहे.
नागरिकता संशोधन कायद्या वेळी झालेल्या विरोध प्रदर्शन कव्हर करणारे आमचे सहयोगी दैनिक जागरण चे सिनिअर रिपोर्टर शुजाउद्दीन ने आम्हाला सांगितले कि हे छायाचित्र सीएए आणि एनआरसी च्या विरोध प्रदर्शनाच्या वेळी सोशल मीडिया वर व्हायरल झाले होते.
सर्च च्या वेळी आम्हाला या छायाचित्राचे ओरिजिनल सोर्स मिळाले नाही. पण हे छायाचित्र नागरिकता संशोधन कायदा आणि एनआरसी च्या समर्थनासोबत जुडलेले आहे, जे सोशल मीडिया वर वेग-वेगळ्या संदर्भासह खोट्या दाव्यासह आधी देखील व्हायरल झाले होते. काही काळ आधी हेच छायाचित्र सुशांत सिंह राजपूत घटनेसोबत मुंबई पोलिसांवर निशाणा साधून व्हायरल केले जात आहे.
व्हायरल छायाचित्र खोट्या दाव्यासह व्हायरल करणाऱ्या यूजर ने स्वतःला झारखंड चा रहिवासी असल्याचे सांगितले आहे.
निष्कर्ष: पेट्रोलियम च्या वाढत्या किमतींना घेऊन व्हायरल होत असलेले छायाचित्र नागरिकता संशोधन कायदा आणि एनआरसी च्या समर्थनाचे जुने छायाचित्र आता व्हायरल होत आहे. ह्या छायाचित्राला एडिट करून खोट्या दाव्यासह आता व्हायरल केले जात आहे.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923