विश्वास न्यूज ला आपल्या तपासात समजले कि हा दावा चुकीचा आहे. छायाचित्र जानेवारी २०१८ चे आहे, जेव्हा ऋतिक रोशन मुंबई मध्ये गुरु गोविंद सिंह जी यांच्या ३५१ व्या जयंती मध्ये सहभागी झाले होते. आम्हाला इंटरनेट वर ऋतिक रोशन हे शेतकरी आंदोलनात सहभागी झाल्याचे कुठलेच वृत्त मिळाले नाही.
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): शेतकरी आंदोलन चालू असतानाच सोशल मीडिया वर सध्या एक छायाचित्र व्हायरल होत आहे, ज्यात अभिनेता ऋतिक रोशन एका मंच वर सिख पंथ च्या काही लोकांसोबत उभे असताना दिसतात. छायाचित्रात ऋतिक रोशन यांच्या हातात एक तलवार असल्याचे दिसतं आणि डोक्यावर शीख धर्माचा केसरी कापड बांधलेला देखील दिसतो. या पोस्ट सोबत दावा करण्यात येत आहे कि ऋतिक रोशन हे शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी गेलेत.
विश्वास न्यूज ला आपल्या तपासात कळले कि हा दावा चुकीचा आहे. आमच्या तपासात असे समजले कि, हे छायाचित्र जानेवारी २०१८ चे आहे जेव्हा ऋतिक रोशन मुंबई मध्ये गुरु गोविंद सिंह जी यांच्या ३५१ व्या जयंती च्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. आम्हाला इंटरनेट वर ऋतिक रोशन हे शेतकरी आंदोलनात सहभागी झालेत हे सांगणारी कुठलीच बातमी मिळाली नाही.
काय होत आहे व्हायरल?
Anjali Singh नावाच्या फेसबुक यूजर ने हि पोस्ट शेअर केली होती. या छायाचित्रात, अभिनेता ऋतिक रोशन यांना एका मंच वर काही शीख समुदायाच्या लोकांसोबत उभे असलेले दिसतात. छायाचित्रात लिहले आहे, “Kangana Ranaut के भूतपूर्व #प्रेमी #आशिक Hrithik Roshan पहुंचे #किसान_आंदोलन समर्थन में“
या फेसबुक पोस्ट चे आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
या छायाचित्राचा तपास सुरु करताना आम्ही सगळ्यात आधी या छायाचित्राला गूगल रिव्हर्स इमेज मध्ये अपलोड करून सर्च केले. सर्च च्या वेळी आम्हाला Bollwood Spy नावाच्या युट्युब चॅनेल वर ६ जानेवारी २०१८ रोजी एक विडिओ मिळाला. व्हिडिओ च्या डिस्क्रिप्शन मध्ये लिहले होते, “Hrithik Roshan ATTENDS Celebrations Of Guru Gobind Singh Birth Anniversary“
आम्हाला या समारोहाचा व्हिडिओ Bollywood Scanner नावाच्या युट्युब पेज वर पण मिळाला. ७ जानेवारी २०१८ रोजी अपलोड केलेल्या या व्हिडिओ च्या डिस्क्रिप्शन मध्ये लिहले होते. “Hrithik Roshan, Ayushman Khurana And Urvashi Rautela Visit Gurudwara In Mumbai.“
आम्हाला ऋतिक रोशन ची २०१८ मध्ये गुरु गोविंद सिंह यांच्या जयंती मध्ये सहभागी होण्याला घेऊन आम्हाला एक बातमी dailysikhupdates.com वर पण मिळाली.
तपासाच्या पुढच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती (एसजीपीसी) अमृतसर चे इन्फॉर्मशन ऑफिसर जसविंदर सिंह जस्सी यांना संपर्क केला. त्यांनी सांगितले, “हे छायाचित्र २०१८ चे आहे, जेव्हा ऋतिक रोशन मुंबई मध्ये गुरु गोविंद सिंह जी यांच्या ३५१ व्या जयंती च्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. हा कार्यक्रम एसजीपीसी मुंबई आणि एसजीपीसी अमृतसर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बरेच मोठे बॉलीवूड कलाकार सहभागी झाले होते.”
या नंतर आम्ही इंटरनेट वर बऱ्याच कीवर्डस च्या मदतीने बातमीचा शोध घेतला, आम्हाला कुठेच ऋतिक रोशन हे शेतकरी आंदोलनात सहभागी झाल्याची बातमी मिळाली नाही.
तपासाच्या शेवटच्या टप्प्यात आम्ही त्या यूजर चा तपास केला ज्याने हि पोस्ट शेअर केली. आम्हाला कळले कि फेसबुक पेज Anjali Singh चे १,२९,८३२ फोल्लोवेर्स आहेत.
निष्कर्ष: विश्वास न्यूज ला आपल्या तपासात समजले कि हा दावा चुकीचा आहे. छायाचित्र जानेवारी २०१८ चे आहे, जेव्हा ऋतिक रोशन मुंबई मध्ये गुरु गोविंद सिंह जी यांच्या ३५१ व्या जयंती मध्ये सहभागी झाले होते. आम्हाला इंटरनेट वर ऋतिक रोशन हे शेतकरी आंदोलनात सहभागी झाल्याचे कुठलेच वृत्त मिळाले नाही.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923