X
X

Fact Check : गुजरातमधील आसाराम आश्रमाचे जुने छायाचित्र आता यूपीच्या नावाने व्हायरल झाले आहे

विश्वास न्यूजच्या तपासात व्हायरल झालेली पोस्ट दिशाभूल करणारी असल्याचे सिद्ध झाले. गुजरातचे एक जुने चित्र आता यूपीच्या नावाने चुकीचा संदर्भ जोडून व्हायरल केले जात आहे.

  • By: Ashish Maharishi
  • Published: Dec 16, 2021 at 02:40 PM
  • Updated: Dec 27, 2021 at 10:53 AM

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सअॅप अशा विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक चित्र मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. पोलिसांच्या क्रूरतेच्या या चित्रात एक पोलिस कर्मचारी एका लांब केसांच्या साधूला रस्त्यावर ओढताना दिसतो. हे छायाचित्र समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांचे वडील मुलायम सिंह यादव यांच्या कारकिर्दीतील असल्याचा दावा सोशल मीडिया यूजर्स करत आहेत. विश्वास न्यूजने व्हायरल चित्राची चौकशी केली. या चित्राचा मुलायमसिंह यादव किंवा यूपीशी काहीही संबंध नसल्याचे दिसून आले. गुजरातमधील आसाराम बापूंच्या आश्रमावर पोलिसांनी केलेल्या कारवाईचे हे जुने चित्र आहे.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक युजर स्वप्नील कुमार शुक्ला याने ६ डिसेंबरला एक फोटो पोस्ट करताना लिहिले: हमारे संतो का बाल पकड़ कर खिंचवाने वाला कोई जेहादी नही था,,,वो अखिलेश यादव का बाप था…याद है ना??

पोस्टचा मजकूर जसा इथे लिहिला आहे तसा आहे. त्याची संग्रहित आवृत्ती येथे पहा. हे खरे आहे असे गृहीत धरून, इतर यूजर्स देखील ते शेअर करत आहेत.

https://twitter.com/Balram_Ayodhya/status/1467458534283497472?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1467458534283497472%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.vishvasnews.com%2Fpolitics%2Ffact-check-an-old-photo-of-asaram-ashram-in-gujarat-has-now-gone-viral-in-the-name-of-up%2F

तपास:
व्हायरल इमेजच्या मागचे सत्य जाणून घेण्यासाठी विश्वास न्यूजने सर्वप्रथम गुगल रिव्हर्स इमेजेस, ऑनलाइन टूल्सचा वापर केला. त्यात अपलोड केलेले व्हायरल चित्र शोधले असता, आम्हाला जुन्या तारखांच्या प्रकाशित आर्टिकल्स मध्ये व्हायरल चित्र सापडले. 25 सप्टेंबर 2010 रोजी ब्लॉगवर प्रकाशित झालेल्या पोलिस अत्याचारांवरील लेखातही ही प्रतिमा वापरली गेली होती. तुम्ही ते इथे वाचू शकता.

त्याचप्रमाणे आम्हाला काही ट्विटही मिळाले ज्यात व्हायरल झालेला फोटो 2008 च्या आसाराम आश्रमाचा असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याआधारे आम्ही आश्रमाच्या प्रवक्त्या नीलम दुबे यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांच्यासोबतचा फोटो शेअर केला. त्यांनी सांगितले की, व्हायरल झालेला फोटो आश्रमातील एका व्यक्तीचा आहे.

विश्‍वास न्यूजने तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही दैनिक जागरण गुजरातचे वरिष्ठ वार्ताहर शत्रुघ्न शर्मा ह्यांना संपर्क केला. गुजरातमधील साबरमती येथील आसाराम आश्रमाद्वारे चालवल्या जाणाऱ्या गुरुकुलमधून दोन मुले बेपत्ता झाल्यानंतर आणि नंतर नदीपात्रातून त्यांचे विकृत मृतदेह सापडल्यानंतर आश्रमाविरोधात आंदोलन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यादरम्यान आश्रमातील रहिवाशांनी सामान्य नागरिक आणि पत्रकारांवर हल्ला केला, त्यानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईत आश्रमात उपस्थित असलेल्या अनेक असामाजिक तत्वांना बाहेर काढण्यात आले. हा फोटो त्यावेळचा आहे.

तपासाअंती विश्वास न्यूजने बनावट पोस्ट करणाऱ्या युजरची चौकशी केली. फेसबुक युजर स्वप्नील शुक्लाच्या सोशल स्कॅनिंगमध्ये 3,000 मित्र असल्याचे समोर आले. युजर कानपूर, यूपीचा रहिवासी आहे. हा वापरकर्ता एका विचारसरणीने प्रभावित आहे.

निष्कर्ष: विश्वास न्यूजच्या तपासात व्हायरल झालेली पोस्ट दिशाभूल करणारी असल्याचे सिद्ध झाले. गुजरातचे एक जुने चित्र आता यूपीच्या नावाने चुकीचा संदर्भ जोडून व्हायरल केले जात आहे.

  • Claim Review : हमारे संतो का बाल पकड़ कर खिंचवाने वाला कोई जेहादी नही था,,,वो अखिलेश यादव का बाप था…याद है ना??
  • Claimed By : फेसबुक यूजर स्‍वप्‍निल शुक्‍ला
  • Fact Check : Misleading
Misleading
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later