Fact Check: राहुल गांधी यांचे वक्तव्य सांगून व्हायरल होत आहे ग्राफिक प्लेट

विश्वास न्यूज च्या तपासात राहुल गांधी यांच्याशी संबंधित व्हायरल दावा खोटा असल्याचे समोर आले. एबीपी च्या नावावर देखील खोटी ग्राफिक प्लेट व्हायरल होत आहे.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर एक न्यूज चॅनेल च्या नावाने ग्राफिक प्लेट व्हायरल केली जात आहे. या ग्राफिक प्लेट च्या मदतीने असे दर्शवण्यात येत आहे कि राहुल गांधी पाकिस्तान आणि इस्लाम वर वक्तव्य करत आहे. विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल दावा खोटा असल्याचे समजले. या दाव्यासोबत एबीपी न्यूज च्या नावाची खोटी ग्राफिक प्लेट देखील व्हायरल होत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी नि हे वक्तव्य दिले नाही.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर Girish Kamdar यांनी 4 जुलाई 2021 रोजी व्हायरल ग्राफिक प्लेट शेअर केली. यावर एबीपी चा लोगो होता. ग्राफिक प्लेट वर राहुल गांधी चा नाव घेऊन लिहले आहे, “हमारी सरकार बनते ही पाकिस्तान को 5 हजार करोड़ कर्ज देंगे बिना ब्याज 50 साल के लिए।’ या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तसेच फेसबुक यूजर Batchu Venkateswara Rao ने देखील वेग वेगळ्या ग्राफिक प्लेट शेअर केल्या आहेत. यात देखील राहुल गांधी चे नाव वापरले गेले आहे, याप्रमाणे काँग्रेस नेता स्वतःला आणि पार्टी ला मुसलमानांसोबत जोडत आहेत. या ग्राफिक प्लेट ला खाली बघू शकता.

तपास:
विश्वास न्यूज ने सगळ्यात आधी व्हायरल प्लेट ला निरखून बघितले. आम्हाला यात भाषेच्या चुका आढळल्या. जसे एका जागी कांग्रेस ला कोंग्रेस लिहले आहे. व्याकरणाच्या देखील चुका आहे. याला खाली बघा.

विश्वास न्यूज ने ओपन सर्च चा वापर करून शोधले कि खरंच राहुल गांधी ने असे वक्तव्य केले का. आम्हाला अशी कुठलीच प्रामाणिक रिपोर्ट मिळाली नाही, जी या दाव्याची पुष्टी करेल. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर बऱ्याच न्यूज बनवलय जातात. अश्यात हे शक्य नाही कि राहुल गांधी चे हे वक्तव्य न्यूज मध्ये राहणार नाही.

विश्वास न्यूज ने आपल्या तपासात पुढे अजून इंटरनेट वर सर्च केले. आम्हाला Scroll च्या वेबसाइट वर १२ नोव्हेंबर २०१८ रोजी प्रकाशित एक बातमी मिळाली. त्यात व्हायरल ग्राफिक प्लेट दिसते. या रिपोर्ट मध्ये सांगितले आहे कि एबीपी ने तेव्हा स्पष्ट केले होते कि हे प्लेट खोटे आहे. एबीपी ने अशी कुठलीच रिपोर्ट दिली नाही. त्यात वेरिफाइड ट्विटर हॅन्डल ची लिंक देखील आहे.

विश्वास न्यूज ने व्हायरल दाव्यावरून एबीपी न्यूज च्या एडिटोरिअल जर्नालिस्ट सोबत शेअर केले. त्यांनी याला खोटे सांगितले आणि सांगितले कि आता त्यांची स्टाईलशीट बदलली आहे. व्हायरल ग्राफिक प्लेट मध्ये भाषा आणि व्याकरणाच्या चुका आहे. आणि फॉन्ट पण वेगळा आहे. त्यांनी हे पण सांगितले कि हि बातमी एबीपी न्यूज ची नाही.

विश्वास न्यूज ने व्हायरल दावा उत्तर प्रदेश चे काँग्रेस कमेटी चे सोशल मीडिया चे स्टेट को-आर्डिनेटर रनीश जैन यांच्या सोबत देखील हा दावा शेअर केला. त्यांनी देखील सांगितले कि हे जाणून बुजून राहुल गांधी यांच्या विरोधात शेअर केले आहे. फेक न्यूज नेहमीच याच्या विरोधात प्रचलित आहे. काँग्रेस पार्टी आणि गांधी परिवारासोबत संबंधित अधिकृत बातम्या उपलब्ध आहे. त्यांनी देखील हे वक्तव्य खोटे असल्याचे सांगितले.

विश्वास न्यूज ने दावा शेअर करणाऱ्या यूजर Girish Kamdar यांचे सोशल बॅकग्राऊंड चेक केले. यूजर ने पर्सनल इन्फॉर्मेशन शेअर केली नाही आहे.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात राहुल गांधी यांच्याशी संबंधित व्हायरल दावा खोटा असल्याचे समोर आले. एबीपी च्या नावावर देखील खोटी ग्राफिक प्लेट व्हायरल होत आहे.

False
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट