विश्वास न्यूजच्या तपासात व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे समजले. व्हिडिओ मध्ये आसाम चे मुख्यमंत्री नाही, पण त्यांच्याजागी गौरव प्रधान नावाचा व्यक्ती या व्हिडिओ मध्ये आहे. हा व्हिडिओ जुना आहे.
विश्वास न्यूज (नवी दिल्ली): सोशल मीडिया वर एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, यात एका व्यक्ती ला भाषण देताना बघितले जाऊ शकते. यूजर्स दावा करत आहेत कि भाषण देणारा व्यक्ती आसाम चा मुख्यमंत्री आहे. विश्वास न्यूज ने जेव्हा व्हायरल पोस्ट चा तपास केला त्यात आम्हाला कळले कि हि पोस्ट खोटी आहे आणि व्हिडिओ मध्ये दिसत असलेला व्यक्ती आसाम चा मुख्यमंत्री नाही. या व्यक्तीचे नाव गौरव प्रधान असे आहे.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर विनोद के भंडारी यांच्या नावाच्या एका ग्रुप मध्ये हा व्हिडिओ अपलोड करून दावा केला गेला कि व्हिडिओ आसाम च्या मुख्यमंत्र्यांचा आहे. त्यांनी त्यासोबत लिहले: ‘आसाम के मुख्यमंत्री का सबसे छोटा भाषण जिसमे की उन्होंने सब कुछ कह दिया। समझिये उनको अगर आपमें समझ है तो।’
पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन तुम्ही इथे बघू शकता. हा व्हिडिओ फेसबुक वर संजीव सेहरावत आणि अशोक अत्री यांच्यासारख्या यूजर्स ने अपलोड केला आहे.
तपास:
विश्वास न्यूज ने व्हायरल व्हिडिओ सगळ्यात आधी InVID टूल मध्ये अपलोड केले आणि त्यातून बरेच स्क्रिनशॉट्स मिळवले. त्यांना आम्ही गूगल रिव्हर्स इमेज सर्च मध्ये अपलोड केले आणि ओरिजिनल छायाचित्र शोधण्यास सुरुवात केली. ओरिजिनल व्हिडिओ आम्हाला समर्थ भारत मंच नावाच्या युट्युब चॅनेल वर मिळाला. याला ३ जानेवारी २०२० रोजी अपलोड केले. व्हिडिओ चे कॅप्शन बघितल्यावर आम्हाला असे कळले कि भाषण देत असलेल्या व्यक्तीचे नाव गौरव प्रधान आहे. ओरिजिनल व्हिडिओ स्कॅन केल्यावर आम्हाला कळले कि 9:40 मिनिटांपासून 10:55 पर्यंत हि क्लिप एडिट करून आसाम चे मुख्यमंत्री यांच्या नावावर व्हायरल होत आहे.
आता आम्हाला हे जाणून घ्यायचे होते कि हे गौरव प्रधान नेमके आहे कोण. आम्हाला सोशल मीडिया वर त्यांची प्रोफाइल मिळाली, त्यात सांगितले होते कि ते गौरव प्रधान फाउंडेशन चे डायरेक्टर आहे आणि ते ग्रेटर नोएडा ला राहतात. याबद्दल अधिक माहिती इथे बघा.
तपासाच्या पुढच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने आसाम भाजपा चे प्रवक्ता सुरंजन दत्ता यांना संपर्क केला. त्यांनी व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे आम्हाला सांगितले. त्यांनी सांगितले कि व्हिडिओ मध्ये दिसत असलेली व्यक्ती हे आमचे मुख्यमंत्री डॉक्टर हेमंत बिस्व सरमा नाहीत.
तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही यूजर चा प्रोफाइल स्कॅन केला ज्यांनी हि व्हायरल पोस्ट शेअर केली. आम्हाला कळले कि फेसबुक यूजर विनोद के भंडारी यांचे ४५०० पेक्षा जास्ती फ्रेंड्स आहेत. यूजर ने हा अकाउंट एप्रिल २००९ मध्ये बनवला होता. सध्या हे यूजर मुंबई येथे राहतात.
निष्कर्ष: विश्वास न्यूजच्या तपासात व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे समजले. व्हिडिओ मध्ये आसाम चे मुख्यमंत्री नाही, पण त्यांच्याजागी गौरव प्रधान नावाचा व्यक्ती या व्हिडिओ मध्ये आहे. हा व्हिडिओ जुना आहे.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923