Fact Check: RSS प्रमुख मोहन भागवत ह्याचे चित्र वापरून फेक ट्विट बनवून व्हायरल

विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल ट्विट चा स्क्रीनशॉट खोटा असल्याचे समजले. हा ट्विट मोहन भागवत ह्यांनी केलेला नाही, हे एका फॅन अकाउंट वरून बनवण्यात आले आहे जे 2019 साली केले गेले.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्या नावाने केलेल्या ट्विटचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या स्क्रिनशॉटमध्ये मोहन भागवत यांचा फोटो असून ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘एक तासभर मनोरंजन करणाऱ्या अभिनेत्याचे तुम्ही कौतुक करू शकता, दिवसात फक्त 6-7 तास खेळणारा खेळाडू त्याला आयकॉन बनवू शकतो, मग आमचे पंतप्रधान वयाच्या ६७ व्या वर्षी देशासाठी १५-१६ तास काम करणाऱ्यांना आपण आदर्श का मानू शकत नाही?’

विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट चा तपास केला, त्यात हा ट्विट खोटा असल्याचे समजले. हा ट्विट मोहन भागवत ह्यांनी केला नसून त्यांच्या फॅन अकाउंट द्वारे केलेला जुना ट्विट आहे, जो 2019 मध्ये केला गेला.

काय होत आहे व्हायरल?

दीपक चतुर्वेदी, फेसबुक यूजर ने 15 मे रोजी हा ट्विट शेअर केला आणि लिहले: आप एक घंटा मनोरंजन करने वाले अभिनेता को सराहा सकते हैं, एक खिलाड़ी जो सिर्फ़ 6-7 घंटा दिन में खेलता है उसको आइकॉन बना सकते हैं तो हमारे प्रधानमंत्री जी जो 67 साल की उम्र में देश के लिए 15-16 घंटे काम करते हैं,उनको अपना आदर्श क्यों नहीं मान सकते.वन्देमातरम्’

वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील इतर अनेक वापरकर्ते देखील अशाच दाव्यासह हे चित्र शेअर करत आहेत. पोस्टमधील मजकूर वस्तुस्थिती तपासण्याच्या उद्देशाने लिहिला गेला आहे. पोस्टचा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:

व्हायरल ट्विटचे सत्य जाणून घेण्यासाठी विश्वास न्यूजने सर्वप्रथम व्हायरल ट्विटचा स्क्रीनशॉट काळजीपूर्वक पाहिला. ज्या ट्विटर अकाऊंटवरून हे ट्विट ट्विट करण्यात आले होते, त्याचे युजरनेम @MohanBhagwat_ असे लिहिले होते. आम्ही ट्विटरवर हे खाते शोधू लागलो. शोध घेत असताना आम्हाला हे अकाऊंट सापडले पण या अकाऊंटमध्ये ‘मोहन भागवत फॅन’ असे लिहिलेले आहे आणि हे मोहन भागवत यांचे पेरोडी अकाउंट असल्याचे ट्विटरच्या बायो सेक्शनमध्ये स्पष्टपणे लिहिले आहे.

आम्ही या खात्याचा सखोल शोध घेतला आणि आम्हाला 11 मार्च 2019 रोजी या खात्यावर व्हायरल झालेले ट्विट आढळले.

आम्हाला ट्विटरवर मोहन भागवत यांचे सत्यापित अधिकृत खाते देखील सापडले. व्हायरल दाव्याबाबत आम्ही मोहन भागवत यांच्या खात्याची कसून तपासणी केली. असे कोणतेही ट्विट आम्हाला येथे आढळले नाही.

मोहन भागवत यांनी अनेकवेळा पीएम मोदींचे कौतुक केले आहे, परंतु व्हायरल दाव्याशी संबंधित अशी कोणतीही बातमी आम्हाला सापडली नाही, ज्यामध्ये त्यांनी पंतप्रधान मोदींना आयकॉन बनवण्याबद्दल बोलले आहे.

अधिक माहिती साठी आम्ही आरएसएस चे अखिल भारतीय सह प्रचार प्रमुख नरेंद्र कुमार ह्यांना संपर्क केला. त्यांनी सांगितले कि मोहन भागवत ह्यांनी असे ट्विट केले नाही. हा एका खोट्या अकाउंट वरून केला गेला आहे असे देखील त्यांनी स्पष्ट केले.

तपासाच्या शेवटच्या टप्प्यात, आम्ही फेसबुकवर बनावट ट्विटचा स्क्रीनशॉट शेअर करणाऱ्या युजरचे सोशल स्कॅनिंग केले. फेसबुक यूजर दीपक चतुर्वेदी हा हरियाणातील रेवाडी येथील रहिवासी आहे.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल ट्विट चा स्क्रीनशॉट खोटा असल्याचे समजले. हा ट्विट मोहन भागवत ह्यांनी केलेला नाही, हे एका फॅन अकाउंट वरून बनवण्यात आले आहे जे 2019 साली केले गेले.

False
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट