Fact Check: मध्य प्रदेशचे पूर्व मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांच्या नावाने बनलेल्या खोट्या ट्विटर अकाउंट वरून ट्विट व्हायरल

विश्वास न्यूज च्या तपासात दिग्विजय सिंग च्या नावावर व्हायरल होत असलेला ट्विटर अकाउंट खोटा असल्याचे समजले. हा ट्विटर अकाउंट सस्पेंड करण्यात आला आहे.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर मध्य प्रदेश चे पूर्व मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते दिग्विजय सिंग ह्यांच्या नावाने एक ट्विट चे स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे. स्क्रीनशॉट वर लिहले होते, “मैं चाहता हूं की मेरी मृत्यु राहुल गांधी के प्रधानमंत्री बनने के बाद ही हो”. यूजर्स हा स्क्रीनशॉट खरा समजून त्याला शेअर करत आहे. विश्वास न्यूज च्या तपासात कळले कि दिग्विजय सिंग ह्यांच्या नावावर एक खोटा ट्विटर अकाउंट बनवण्यात आला होता ज्याला आता सस्पेंड करण्यात आले आहे.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर B.N. Choudhary ने 10 जून रोजी व्हायरल स्क्रीनशॉट शेअर केले. स्क्रीनशॉट वर लिहले होते, “मैं चाहता हूँ की मेरी मृत्यु राहुल गांधी के प्रधानमंत्री बनने के बाद ही हो।” कैप्शन में लिखा गया है, “ये आदमी अमर होना चाहता है।”

फेसबुक पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
व्हायरल दाव्याचा तपास करण्यासाठी आम्ही सगळ्यात आधी स्क्रीनशॉट ला निरखून बघितले. ह्या अकाउंट वर ब्लु टिक नव्हती, म्हणजेच हे वेरिफाइड नाही. ह्यानंतर आम्ही @DigvijayaSingh_ हि आयडी सर्च केली. आम्हाला हे अकाउंट सस्पेंड केलेले असल्याचे समजले.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही वेब आर्काइव्ह वर आयडी बद्दल सर्च करण्यास सुरु केले. ह्या वेळी आम्हाला कळले कि हि आयडी वेळो वेळी चेंज करण्यात आली आहे. वे बँक वर मिळालेल्या माहिती प्रमाणे, ह्या आयडी च्या बायो मध्ये लिहले होते कि हा व्यक्ती अजमेर चा रहिवासी आहे. ह्यानंतर आम्ही दिग्विजय सिंग ह्यांचे अधिकृत अकाउंट तपासण्यास सुरु केले आणि ह्यावेळी आम्हाला व्हायरल दाव्यामध्ये असलेला मजकूर दिसला नाही.

संबंधित किवर्ड सर्च केल्यावर आम्हाला व्हायरल दाव्यासंबंधी एक 11 जून 2020 रोजी प्रकाशित रिपोर्ट देखील मिळाली. रिपोर्ट मध्ये दिलेल्या माहिती प्रमाणे दिग्विजय सिंग बद्दल च्या खोट्या अकाउंट बद्दल सायबर सेल मध्ये तक्रार करण्यात आली आहे.

अधिक माहिती साठी आम्ही दिग्विजय सिंग चे ओएसडी भूपेंद्र गुप्ता ह्यांना संपर्क केला. त्यांनी आम्हाला सांगितले, कि व्हायरल दावा खोटा आहे. दिग्विजय सिंग ने असे कुठलेच ट्विट केले नाही. विपक्षीय पार्टी दिग्विजय सिंग ह्यांची प्रतिमा खराब करण्याच्या प्रयत्नात नेहमीच असते आणि म्हणून अश्या खोट्या बातम्या पसरवण्यात येतात.

तपासाच्या शेवटच्या टप्प्यात हा दावा करणाऱ्या फेसबुक यूजर चा तपास केला. त्यात कळले कि फेसबुक यूजर ला 1289 लोकं फॉलो करतात. फेसबुक वर दिलेल्या माहिती प्रमाणे, B.N. Choudhary राजस्थान चे रहिवासी आहेत.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात दिग्विजय सिंग च्या नावावर व्हायरल होत असलेला ट्विटर अकाउंट खोटा असल्याचे समजले. हा ट्विटर अकाउंट सस्पेंड करण्यात आला आहे.

Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट